जगभरातले मानाचे राजघराणे म्हणून ब्रिटीश राजघराण्याकडे बघितले जाते. मात्र आता ब्रिटनमध्ये बिघडलेल्या अर्थव्यवस्थेची झळ या राजघराण्यालाही बसायला सुरुवात झाली आहे. त्यासंदर्भात एक बातमी नुकतीच आली असून त्यामुळे ब्रिटनच्या राजघराण्यातील (British Royal Family) खर्चाबाबत चर्चा सुरु झाली आहे. ब्रिटीश राजकुमाराला (British Royal Family) आता त्याच्या आजारपणाचा आणि उपचाराचाही खर्च स्वतःचा स्वतःलाच करावा लागणार आहे. ब्रिटीश राजकुमार अँड्र्यू यांच्या आजारपणाचा खर्च आतापर्यत राणी एलिझाबेथ करत होती, मात्र राणीनंतर हा खर्च करण्यासाठी राजा चार्ल्स यांनी नकार दिला आहे. यासाठी त्यांनी वाढत्या खर्चाचे कारण पुढे करत राजकुमार अँड्र्यू यांना स्वतःच खर्च स्वतःच करायला सांगितले आहे. राजकुमार अँड्र्यू गेली अनेक वर्ष एका भारतीय योगींकडून उपचार घेत आहेत. त्यासाठी त्यांना वर्षाची लाखोंच्या घरात फी भरावी लागते. पण या राजकुमार अँड्र्यूकडे ते पैसेही नसल्यामुळे त्यांना त्यांच्या मोठ्या भावाकडे राजा चार्ल्स यांच्याकडे हात पसरायची वेळ आली आहे.
ब्रिटीश राजघराच्या राजकुमार (British Royal Family) अँड्र्यू हे गेली काही वर्षे आजारी आहेत. त्यांच्यावर एक भारतीय योगी उपचार करीत आहेत. मनशांतीसाठी त्यांच्यावर उपचार होत आहेत. त्यात योगासने आणि आयुर्वेद यांचा समावेश आहे. मात्र या उपचारासाठी आता खर्च कोण करणार हा प्रश्न त्या राजकुमारसमोर उभा राहिला आहे आणि ब्रिटनचे राजे चार्ल्स यांनी प्रिन्स अँड्र्यूच्या उपचाराचे शुल्क भरण्यास नकार दिल्यावर आता राजघराण्यातील या खर्चाचे हिशोब जगासमोर आले आहेत. राजकुमार अँड्र्यू यांना त्यांच्या उपचारासाठी वर्षभरात 32 लाख फी भरावी लागणार आहे. आतापर्यंत राजकुमार अँड्र्यू यांचा हा खर्च राणी एलिझाबेथ आपल्या कमाईतून देत असत. पण त्यांच्या पश्चात हा खर्च कोण करणार हा प्रश्न राजघराण्यासमोर उभा राहिला आहे. वर्षाचे 32 लाख रुपये सुद्धा राजकुमाराकडे नसल्याची चर्चाही ब्रिटनमध्ये सुरु झाली आहे. (British Royal Family)
राजकुमार अँड्र्यू यांच्यावर भारतीय योगी अनेक वर्षांपासून मंत्र, मसाज आणि ध्यानाद्वारे उपचार करीत आहेत. यासाठी हे योगी अजूनही अँड्र्यूच्या रॉयल लॉजच्या घरात राहत आहेत. राजकुमार अँड्र्यू यांच्यावर होणा-या या उपचाराचे बील राणी एलिझाबेथ या गेल्या वर्षी सप्टेंबर पर्यंत तिचा मृत्यू होईपर्यंत देत होत्या. हा खर्च ब्रिटिश राजाच्या कमाईतून देण्यात आला होता. मात्र ब्रिटनमधील वाढती महागाई पाहता राजा चार्ल्स यांनी हा खर्च करण्यास नकार दिला आहे. हा नकार देताना राजा चार्ल्स यांनी सांगितले की, असाच खर्च करत राहिला तर त्याबद्दल अन्य कुटुंबियांकडे चुकीचा संदेश दिला जाईल आणि प्रत्येकाचा खर्च करण्याची जबाबदारी घ्यावी लागले. त्यामुळे वेळीच राजघराण्यातील (British Royal Family) खर्चावर वेळीच कपात करण्याचा निर्णय घेतल्याचे राजा चार्ल्स यांनी स्पष्ट केले आहे.
राजकुमार अँड्र्यू हे ब्रिटीश राजघराण्यातील (British Royal Family) वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणून परिचीत आहेत. अँड्र्यूवर माजी मॉडेल व्हर्जिनिया गिफ्रेने गंभीर आरोप केले आहेत. या आरोपावर कारवाई करत राजा चार्ल्सने त्यांना राजघराण्यातून काढून टाकले. त्यांची सुरक्षाही काढून घेण्यात आली होती. पण आता राजा चार्ल्स यांनी प्रिन्स अँड्र्यूला नवीन घर दिले आहे. प्रिन्स हॅरी आणि मेघन यांचे घर अँड्र्यू यांना मिळणार आहे. प्रिन्स हॅरी यांचे पुस्तक आल्यापासून त्यांच्यावर राजघराण्याचा (British Royal Family) राग आहे. त्यातून त्यांना त्यांचे घर खाली करण्याचे फर्मान काढण्यात आले होते. या घराचा काही भाग अँड्र्यू यांनी निवासस्थानासाठी मिळणार आहे. यासर्वांमुळे या दोन भावांमध्ये पुन्हा सलोख्याचे संबंध झाले असल्याची चर्चा आहे. मात्र आता त्यातच अँड्र्यू यांच्या उपचाराचा खर्चाचा हिशोब आला आहे.
=======
हे देखील वाचा : इस्रायल आंदोलनांच्या मागे नक्की आहे तरी काय?
=======
प्रिन्स अँड्र्यू हे राणी एलिझाबेथ द्वितीय आणि प्रिन्स फिलिप, यांचे तिसरे अपत्य आणि राजा चार्ल्स यांचे लहान भाऊ आहेत. ब्रिटीश सिंहासनाच्या उत्तराधिकार्यांमध्ये अँड्र्यू आठव्या क्रमांकावर आहेत. अँड्र्यू यांनी रॉयल नेव्हीमध्ये हेलिकॉप्टर पायलट आणि प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. 1986 मध्ये, त्यांनी सारा फर्ग्युसन यांच्याबरोबर लग्न केले. त्यांना राजकुमारी बीट्रिस आणि राजकुमारी युजेनी या दोन मुली आहे. अँड्र्यू आणि त्यांची पत्नी सारा यांचा घटस्फोट झाला आहे. अँड्र्यू यांनी आंतरराष्ट्रीय व्यापार आणि गुंतवणुकीसाठी ब्रिटनचे विशेष प्रतिनिधी म्हणून काम केले आहे.
सई बने