देशात-जगात तिरुपती शहराला धार्मिक-आध्यात्मिक केंद्राच्या रुपात प्रसिद्धी मिळाली आहे. तिरुपती शहर स्थापन करुन नुकतीच ८९३ वर्ष पूर्ण झाली. याची स्थापना सन् ११३० मध्ये करण्यात आली होती. शहराची स्थापना ऐतिहासिक संदर्भांच्या आधारावर करण्यात आली आहे. आजच्या काळात तिरुपति शहराला भेट देण्यासाठी परदेशातून ही पर्यटक येतात. (Tirupati City)
तिरुपतिला मंदिरांचे शहर असे म्हटले जाते. ८९३ वर्षांपू्र्वी श्री वैष्णव संत भगवद् रामानुजाचार्य यांनी गोविंदरा स्वामी मंदिर उभारले. जे शहराच्या मध्यभागी आहे. यामुळेच शहराला आध्यित्मिक केंद्राच्या रुपात प्रसिद्धी मिळाली. जगभरात येथील मंदिरांसह शहराला विशेष मान्यता आहे.
गेल्या वर्षात तिरुपतिच्या शहराचे आमदार भूमना करुणाकर रेड्डी यांनी गोविंदराजा मंदिराच्या प्राचीन शिलालेखांना समोर ठेवले असता त्यामधून काही ऐतिहासिक गोष्टींचा उलगडा झाला. त्यामधून असे कळले की, रामानुजाचार्य यांनी २४ फेब्रुवारी सन् ११३० रोजी या शहराची आधारशिला ठेवली होती. ऐतिहासिक शिलालेख मिळाल्यानंतर रेड्डी यांनी असे ही म्हटले की, तिरुपतीची स्थापना फाल्गुन पौर्णिला, उत्तर नक्षत्र सोमवरमवर झाली होती. रामानुज यांनी या दिवशी गोविंदराजाच्या पीठासीन देवतांची स्थापना केली.
जगभरात प्रसिद्ध
आपल्या स्थापननेनंतर वर्षानुवर्ष मंदिराच्या आजूबाजूला विविध समुदायाची लोक येत गेली आणि स्थायिक झाली. अशा प्रकारे तिरुपति शहराचा विस्तार झाला. आजच्या तारखेला तिरुपति देशातील हिंदू पूजा पद्धतीसाठी खुप प्रसिद्ध आहे. हे स्थळ जगातील श्रीमंतर मंदिरांपैकी एक आहे.
असे मानले जाते की, श्री वैष्णव संत भगवद् रामानुजाचार्य यांच्या आधी तिरुपति बद्दलची माहिती नाही. दरम्यान, शहराच्या उद्देशाने याची स्थापना करण्यात आली याचे योग्य माहिती आहे.(Tirupati City)
हे देखील वाचा- होळी साजरी करण्यामागील पौराणिक कथा
कोण होते भगवद् रामानुज?
भगवद् रामानुज यांनी समता धर्माची स्थापना केली आणि तिरुमाला मंदिरातील पूजेच्या काही विधी ठरवल्या. ते त्यांच्या काळातील प्रख्यात संत होते. त्यानंतर तिरुपति शहराचे प्रवर्तक ओळखले गेले. हेच कारण आहे की, दीर्घकाळापर्यंत त्याला रामानुज पुरम असे म्हटले गेले होते. भुमना करुणाकर रेड्डी यांच्या मते, या शहराला यापूर्वी गोविंदराजा पट्टम नंतर रामानुज पुरम आणि १३ व्या शतकाताच्या सुरुवातीला याला तिरुपति असे म्हटले जाऊ लागले.
श्रीमंत मंदिरांपैकी एक
येथे वेंकटेश्वर मंदिराचे संचालन तिरुमाला तिरुपति देवस्थानच्या अंतर्गत केले जाते. समितीने अशी माहिती दिली आहे की, २.५ लाख कोटींहून अधिक येथे संपत्ती आहे. वर्ष २०२२-२३ मध्ये समितीने ३१०० कोटी रुपयांचे बजेट सादर केले होते. मंदिरातील जवळजवळ १० टन सोने हे काही बँकांमध्ये ठेवण्यात आले आहे.