जैसलमेर हे राजस्थान मधील एक असे ऐतिहासिक शहर आहे ज्याला सौंदर्य आणि प्राचीन वारला लाभला आहे. येथे दरवर्षी लाखो पर्यटक फिरण्यासाठी येतात. भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरवर असल्याने जैसलमेर पर्यटकांना फार आकर्षित करते. येथे असलेले प्रसिद्ध किल्ले आणि पॅलेस बद्दल सर्वांनाच माहिती आहे. त्यांना आवर्जून ही भेट दिली जाते. मात्र या शहरात असे काही भुताटकी किल्ले आहेत तेथे जाण्यासाठी पर्यटकांना वारंवार विचार करावा लागतो. तर पाहूयात जैसलमर मधील भुताटकी किल्ले कोणते आहेत.(Jaisalmer Haunted Forts)
-खाबा फोर्ट
जैसलमेर मधील या किल्ल्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे. परंतु जैसलमरसह संपूर्ण राजस्थानात हा किल्ला भुताटकी म्हणून प्रसिद्ध आहे. या फोर्टबद्दल असे म्हटले जाते की, काही वर्षांपूर्वी येथे जवळजवळ ८० पेक्षा अधिक पालीवाल ब्राम्हण रहायचे. मात्र एका रात्री अचानक जवळजवळ सर्व ब्राम्हण किल्ला सोडून अन्य शहरात निघून गेले.
काही लोकांचे असे मानणे आहे की,या किल्ल्याला ब्राम्हणांनी श्राप दिला होता की, कोणीही या किल्ल्यात राहण्यास आले तर तो जीवंत राहणार नाही. यानंतर तेथे कोणीही राहिले नाही. स्थानिक लोक असे मानतात की, रात्रीच्या वेळीस येथे विचित्र आवाज ही येतात.
-गोल्डन किल्ला
सोन्यासारखा चमकणारा किल्ला म्हणून अशी गोल्डन किल्ल्याची ओळख होती. पण आज हा किल्ला एका खडकात रुपांतर झाला आहे. स्थानिक लोकांचे असे मानणे आहे की, या किल्ल्यात आज ही खुप गुप्त खोल्या आहेत.
या जगप्रसिद्ध फोर्टवर राजपूत शासक रावल, अलाउद्दीन खिलजी आणि हुमायूचे शासन होते. मात्र किल्ल्याबद्दलच्या भूताटकी कथा प्रचलित आहेत. काही लोकांचे असे मानणे आहे की, मध्यरात्री येथून मुलं, वृद्ध आणि महिलांच्या रडण्याचा आवाज येतो.
सलीम सिंह यांची हवेली
खाबा किल्ला आणि गोल्डन फोर्ट व्यतिरिक्त सलीम सिंह यांची हवेली सुद्धा फार भुताटकी फोर्टमध्ये सहभागी आहे. जैसलमर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या सलीम सिंह यांनी जवळजवळ १८१५ मध्ये तो बनवला होता. स्थानिक लोक त्याला जैसलमरचा ताजमहाल असे ही म्हटले जायचे. पण आता त्याला भुताटकी ठिकाण मानले जाते.(Jaisalmer Haunted Forts)
काही लोकांचे असे मानणे आहे की, या हवेलीच्या खाली असे काही गुप्त खोल्या बनवल्या होत्या जेथे कोणी जायचे नाही. पण काहीजण त्या खोल्या शोधण्यासाठी गेले खरे मात्र कधीच परत आले नाहीत.
हे देखील वाचा- काय सांगता! चक्क १०२ बायका आणि ५७८ मुलं एकाच व्यक्तीची?
जैसलमेर मधील अन्य भूताटकी ठिकाणं
सलीम सिंह यांच्या हवेलीच्या मुख्य शहरापासून काही दूर असलेल्या कुलधारा गाव सुद्धा या शहरातील सर्वाधिक भुताटकी ठिकाण मानले जाते. येथे ब्राम्हणांचा श्राप आहे आणि म्हणूनच आज ही कोणीही तेथे राहण्याची हिंम्मत करत नाही. या व्यतिरिक्त येथे एक तलाव ही आहे. तो सुद्धा भुताटकी असल्याचे मानले जाते.