२५ ऑक्टोंबर २०१७ ही ती तारीख आहे, जी अमेरिकन एजेंसी FBI कधीच विसरु शकत नाही. हा तोच दिवस आहे जेव्हा क्रिप्टोक्वीन म्हणून ओळखली जाणारी रजा इग्नातोवा (Ruja Ignatova) शेवटची दिसली होती. जर्मनीच्या पासपोर्टवर तिने बुल्गारियाच्या सोफिया येथून ग्रीसची राजधानी एथेंससाठी उड्डाण केले खरं, पण ती गायब झाली. गेल्या पाच वर्षांपासून एफबीआयकडून तिचा तपास केला जात आहे. खास गोष्ट अशी की रुजा एफबीआयच्या टॉप टेन मोस्ट वॉटेंड लिस्टमधील एकमेव महिला आहे. रुजावर जवळजवळ ४ बिलियन डॉलर म्हणजेच ३१५८० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. अमेरिकाच नव्हे तर युरोत ही तिला फरार आरोपी घोषित करण्यात आले आहे.
अत्यंत चालाख आहे रुजा
रुजा इग्नातोवाने (Ruja Ignatova) क्रिप्टोकरेंसी कंपनी वनकॉइनच्या माध्यमातून ४ बिलियन डॉलरचा घोटाळा केला. खरंतर क्रिप्टोमध्ये सातत्याने होणारी वाढ पाहता तिने वनकॉइन नावाने २०१६ मध्ये एक कंपनी स्थापन केली. तिने असा दावा केला की, एक दिवस वनकॉइन अन्य क्रिप्टो करेंसीला मागे सोडेल. रुजाच्या कंपनीत बहुतांश लोकांनी गुंतवणूक केली होती. १६ महिन्यानंतर ऑक्टोंबर २०१७ मध्ये ती बेपत्ता झाली. त्यावेळी एफबीआयने रुजाच्या अटकेसाठी तयारी ही केली होती. अटक वॉरंट ही इश्यू केले गेले होते. पण रुजाला याची आधीच माहिती मिळाली. गेल्या वर्षांपासून तिचा शोध घेतला जात आहे. पण अद्याप तिच्याबद्दल कोणालाच काही कळलेले नाही.

लोकांना लुटण्यासाठी बनवली होती कंपनी
रुजाने वनकॉइन कंपनीची स्थापना करतेवेळी दावा केला होता की, एकेदिवशी ही कंपनी बिटकॉन संपुष्टात आणले. तसेच सर्वाधिक लाभ मिळवून देणारी बनेल. रुजाच्या दाव्याला खरं मानत हजारो लोकांनी कंपनीत गुंतवणूक केली आणि अचानक ती गायब झाली. न्यूयॉर्यकच्या टॉप प्रीसीक्युटर डेमियन विलियम यांनी असे म्हटले की, कंपनीची स्थान लोकांना लुटण्यासाठीच केली होी. यामध्ये लोकांनी आपल्या मेहनतीचा पैसा लावला होता. पण त्यांना ही तिने चुना लावला.
हे देखील वाचा- बेनजीर भुट्टो: पाकिस्तानच्या सैन्याविरोधात आवाज उठवणाऱ्या देशाच्या पहिल्या पंतप्रधान
जर्मनीची स्थानिक होती रुजा
रुजा इग्नातोवा जर्मन नागरिक आहे. तिचा जन्म बुल्गारियात झाला होता. रुजाचे वडिल इंजिनिअर होते आणि तिची आई एक शिक्षिका. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतून युरोपिनय लॉ ची डिग्री घेतल्यानंतर इग्नातोवा बुग्लेरियाती सोफियात गेली. तेथे मँकिंसी अॅन्ड कंपनीत कंसल्टेंटची नोकरी केली. ही एक कंसल्टंट फर्म होती. नंतर येथून नोकरी सोडल्यानंतर रुजाने वनकॉइन कंपनीची स्थापना करत लोकांना लुटले.