Home » थंडीच्या दिवसात लोकरीचे कपडे स्वच्छ करण्यासाठी ‘या’ सोप्प्या टीप्स पहा

थंडीच्या दिवसात लोकरीचे कपडे स्वच्छ करण्यासाठी ‘या’ सोप्प्या टीप्स पहा

by Team Gajawaja
0 comment
Woolen Clothes Wash
Share

थंडीच्या दिवसात लोकरीचे कपडे आपल्याला ऊब देतात. त्याचसोबत ते स्टाइलिश ही दिसतात. परंतु लोकरीच्या कपड्यांची एक समस्या सर्वसामान्य आहे. ती म्हणजे त्यांची काळजी घेतली नाही तर ते फाटू शकतात किंवा त्यामधून एक वेगळा वास येऊ लागतो. असे कपडे स्वच्छ केल्यानंतर ही त्या मध्ये वास राहतो. बाजारात लोकरीचे कपडे धुण्यासाठी सुद्धा आता विविध डिटर्जेंट किंवा लिक्वीड्स येतात. परंतु घरच्या घरी तुम्ही लोकरीचे कपडे काही घरगुती उपायांनी सुद्धा स्वच्छ करु शकता. अशातच थंडीच्या दिवसात लोकरीचे कपडे तुम्ही घालणार असाल तर ते स्वच्छ करण्यासाठी पुढील काही टीप्स तुम्ही जरुर पहा. (Woolen Clothes Wash)

सर्वात प्रथम हे काम करा
लोकरीच्या कपड्यांमधून वास येणे ही सर्वसामान्य गोष्ट आहे. परंतु तुम्हाला काही गोष्टींकडे लक्ष द्यावे लागणार आहे. त्यासाठी तुमचे जे काही लोकरीचे कपडे असतील ते थोडावेळ उन्हात ठेवा.

Woolen Clothes Wash
Woolen Clothes Wash

एसेंशियल ऑइलचा वापर करा
आपल्या दररोजच्या कपड्यांसह ते लोकरीच्या कपड्यांमधील दुर्गंध घालवण्यासाठी तुम्ही एसेंशियल ऑइलचा वापर करु शकता. ते वापरल्यानंतर त्याचा सुवास एक दिवस नव्हे तर काही आठवड्यांपर्यंत राहतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीचे एसेंशियल ऑइल निवडून कपड्यांसाठी वापरु शकता. तर आपण नेहमी कपडे धुतो तसेच करायचे आहे. पण त्यावेळी डिजर्टेंज पावडरच्या पाण्यात एसेंशियल ऑइलचे ३-४ थेंब टाकून ते व्यवस्थितीत मिक्स करा.

बेकिंग सोड्याचा वापर
खाण्यामध्ये असो किंवा घरात लावलेल्या टाइल्सवरील डाग स्वच्छ करणे असो त्यासाठी आपण एकदाच नव्हे तर वारंवार बेकिंग सोडाचा वापर आपण करतो. अशातच दुर्गंध येणाऱ्या लोकरीच्या कपड्यांसाठी तुम्ही बेकिंग सोड्याचा वापर करु शकता. त्यावेळी सर्वात प्रथम डिटेर्जेंट पावडरचे पाणी तयार करुन त्यात २-३ चमचे बेकिंग सोडा टाका. आता त्यात तुमचे कपडे टाकून ते १० मिनिटे तसेच ठेवा आणि स्वच्छ पाण्याने धुवा.(Woolen Clothes Wash)

हे देखील वाचा- हिवाळ्यात तुमचे पाय अधिक थंड पडतात का? ‘हे’ असू शकते कारण

विनेगरचा वापर
लोकरीचे कपडे स्वच्छ धुण्यासाठी तुम्ही विनेगरचा वापर करु शकता. याचा वापर तुम्ही स्वेटर, जॅकेट, कंबल किंवा बेडशीट सारख्या गोष्टींसाठी वापरु शकता.यावेळी सुद्धा तुम्ही डिटर्जेंटच्या पाण्यात २-३ थेंब विनेगर टाका. आता यामध्ये १०-१५ मिनिटांसाठी तुमचे लोकरीचे कपडे ठेवून द्या. त्यानंतर १५ मिनिटांनी ते कपडे स्वच्छ पाण्याने धुवा.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.