२०२२ चे वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. त्यानंतर नवं वर्ष २०२३ चे आगमन होणार आहे. प्रत्येकजण आपलं नवं वर्ष आपल्यासाठी कसे असेल, या वर्षात आपली किती प्रगती होईल, आर्थिक स्थिती कशी असेल आणि वर्षभरात आपले नशीब पालटेल का अशा सर्व गोष्टी जाणून घेण्यास उत्सुक असतात. अशातच वास्तु शास्रात नवं वर्ष सुरु होण्यापूर्वी काही गोष्टी घरी आणल्या पाहिजेत त्या संदर्भात उल्लेख करण्यात आलेला आहे. अशी मान्यता आहे की, जर नवं वर्ष सुरु होण्यापूर्वी या गोष्टी घरी आणल्यास तर जीवनात नेहमीच सुख-समृद्धी येते आणि आयुष्य हे आनंदीत राहते. तर जाणून घेऊयात नवं वर्ष सुरु होण्यापूर्वी कोणत्या गोष्टी घरी आणणे शुभ मानल्या गेल्या आहेत. (Vastu Tips for New Year)
घरी आणा तुळशीचे झाडं
शास्रामध्ये तुळशीचे झाड अत्यंत पुजनीय मानले जाते. कारण यामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो. देवी लक्ष्मी ही धनाची देवता मानली जाते. अशातच २०२३ चे वर्ष सुरु होण्यापूर्वी तुम्ही घरात एक तुळशीचे झाडं जरुर लावा. वास्तुच्या या उपायामुळे तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा सदैव राहिल.
एकाक्षी नारळ
एकाक्षी नारळाचे हिंदू धर्मात विशेष महत्व असते. सुख-समृद्धीसाठी घरात एकाक्षी नारळ जरुर ठेवला जातो. नवं वर्ष सुरु होण्यापूर्वी तुम्ही घरी एकाक्षी नारळ घेऊन येऊ शकता. तो तुम्ही लाल रंगाच्या कपड्यात बांधून तुमच्या तिजोरीत ठेवा. अशी मान्यता आहे की, नवं वर्ष सुरु झाल्यास हा उपाय केल्यास तुमच्या धन-संपदेत खुप वाढ होते.
धातुचा कासव आणि हत्ती
वास्तु शास्रानुसार कासव आणि हत्ती हे सुख-समृद्धीचे प्रतीक मानले जाते. अशातच नवं वर्ष २०२३ सुरु होण्यापूर्वी धातुचा कासव आणि हत्ती घरी आणणे शुभ असते. नवं वर्ष सुरु होण्यापूर्वी चांदी, कांस आणि पितळेचा कासव आणि हत्तीची प्रतिमा घरी आणा आणि उत्तर दिशेला असलेल्या कोणत्याही दरवाज्याजवळ लावा.
शंख
हिंदू धर्मात शंखाला फार पवित्र आणि पूजनीय मानले जाते. घरात शंख ठेवल्याने सुख-समृद्धी येते. त्याचसोबत ज्या ठिकाणी तुमचे पैसे असतात तेथे सुद्धा शंख तुम्ही ठेवू शकता. वर्ष २०२३ मध्ये हा उपाय करुन पाहिल्यास तुमच्या घरावर आर्थिक संपन्नता कायम राहिल. तसेच नकारात्मक उर्जा दूर होईल.(Vastu Tips for New Year)
हे देखील वाचा- भारतातील ‘ही’ आहेत भुताटकी मंदिर, तेथे जाणे म्हणजे थरकाप उडवणार अनुभव येणे
लाफिंग बुद्धा
फेंगशुई चीनी वास्तु शास्रात लाफिंग बुद्धाला अत्यंत शुभ मानला जातो. ज्या घरांमध्ये किंवा संस्थांमध्ये लाफिंग बुद्धाची मुर्ती असते तेथे नेहमीच सुख-समृद्धी असते. जर तुम्ही नवं वर्ष सुरु झाल्यानंतर तो खरेदी करुन घरी आणल्यास उत्तर-पूर्व दिशेला ठेवा. यामुळे संपुर्ण वर्षभर आर्थिक वाढ होत राहिल.