Common Mistakes in Relationship: प्रत्येक व्यक्तीची एकमेकांशी वागण्याची पद्धत ही वेगळीच असते. काही लोक खुप मित्रत्वाच्या नात्याने बोलतात तर काही जण चुकीच्या सवयींमुळे लवकर मित्र बनवू शकत नाहीत. नकळत आपल्या काही सवयी या एखाद्या नात्यात फूट सुद्धा पाडू शकतात. काही वेळा आपल्या चुकीच्या सवयींमुळे त्याचा नात्यावर ही परिणाम होते. त्यामुळेच लोक तुमच्यापासून दूर राहणे पसंद करु लागतात. आपल्याला नात्यात दूरावा नको असला तरीही तुमच्या सवयींमुळे ते होतेच. अशातच तुम्ही तुमच्या वाईट सवयी बदलल्या तर नाती ही दीर्घकाळ टिकू शकतात. तर जाणून घेऊयात तुमच्या अशा कोणत्या गोष्टींमुळे नात्यात फूट पडू शकते.
कूल आणि बोरिंगची व्याख्या बदला
आयुष्यात कूल आणि बोरिंगची व्याख्या आणि त्यानुसार वागण्याची पद्धत ही प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते. अशातच काही लोक लेटेस्ट फॅशन ट्रेंन्ड फॉलो करणे आणि दारु पिणे, सिगरेट ओढणे अशा काही सवयींचे चाहते होत स्वत:ला कूल समजू लागतात. याच तुमच्या सवयी काही जणांना पटणार ही नाही आणि ते तुमच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतील. अशातच आता तुम्ही ठरवा कूल आणि बोरिंगची तुमची व्याख्या कशी असली पाहिजे.
डबल स्टँडर्ड ठेवू नका
काही वेळेस लोकप परिवार आणि मित्रांसोबत प्रेम, दया आणि योग्य पद्धतीने वागण्याचा सल्ला देतात. पण जेव्हा गरज भासते तेव्हा चुकीचे वागण्याकडे मात्र दुर्लक्ष करतात. अशातच तुमचे असे वागणे दुसऱ्यांना अजिबात आवडणार नाही. अशातच तुम्ही दुसऱ्यांच्या नजरेत वाईट होणार नाही याची काळजी घ्या.
दुसऱ्यांच्या चुका काढण्यापासून दूर रहा
काही लोकांना दुसऱ्यांच्या चूका दाखवण्याची फार सवय असते. तुमचे असे एखाद्याबद्दलचे वागणे निगेटिव्ह विचाराचे तुम्ही असल्याचे दर्शवते. त्यामुळे इतरांच्या प्रति नेहमीच सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. त्याचसोबत इतरांशी बोलताना अपशब्द वापरण्यापासून दूर रहा. (Common Mistakes in Relationship)
एकमेकांची चहाडी करण्याची सवय सोडा
काही लोकांना आपल्या मित्रमैत्रणींची किंवा परिवारातील नातेवाईकांना एकमेकांची चहाडी करण्याची सवय असते. अशा माणसांपासून लोक चार हात दूर राहणेच पसंद करतात. त्यामुळे चहाड्या करणे किंवा एखाद्याच्या पाठीमागे बोलण्याची सवय सोडून दिलेलीच बरी.
हे देखील वाचा- महिलांच्या तुलनेत पुरुष मंडळी लवकर वृद्ध होतात, पहा काय सांगतो रिपोर्ट
एकमेकांची तुलना करु नका
काही लोकांना एका व्यक्तीची दुसऱ्या व्यक्तीसोबत तुलना करण्याची ही सवय असते. मात्र तुमची ही सवय तुमच्या जवळच्या व्यक्तींना दुखावू शकते. वारंवार दुखावल्याने माणसं तुमच्यापासून दूर जाऊ लागतात. अशातच मित्रपरिवारात किंवा घरातील मंडळींमध्ये एकमेकांची तुलना करण्यापासून दूर रहा.