रिलेशनशिपमध्ये असणे ही एक वेगळीच भावना असते. आपल्याला नेहमीच वाटत असते पार्टनरने आपल्यासोबत उत्तम वेळ घालवावा आणि आयुष्य हे आठवणींच्या क्षणांनी भरुन जावे. पण कधी कधी असे दिसते की, पार्टनर तुम्हाला अचानक दुर्लक्षित करु लागतो. यामुळे आपण चिंता व्यक्त करतो आणि हे होणे साहजिकच आहे. तर जाणून घेऊयात यामागे काय कारणं असू शकतात आणि ते कशा पद्धतीने ठिक केले जाऊ शकते त्याबद्दल अधिक. (Love Affair Problem)
नाराजी
कपल्समध्ये लहानमोठी भांडण आणि वाद होतच राहतात आणि ही गोष्ट सामान्य आहे. पण पार्टनर जर दुखावला गेला तर तो तुम्हाला हळूहळू दुर्लक्षित करण्यास सुरुवात करु शकतो. नाराजी व्यक्त करण्याचा हा सुद्धा एक मार्ग असू शकतो. त्यामुळे जे काही भांडण झाले आहे ते तेथच सोडवण्याचा प्रयत्न करा.
अटेंशन न मिळणे
प्रत्येक व्यक्तीला वाटते की, जेव्हा तो रिलेशनशिप मध्ये असतो तेव्हा त्याच्या पार्टनरने त्याच्याकडे पूर्ण लक्ष द्यावे. मात्र असे काही वेळेस न झाल्याने दुसरा व्यक्ती चिंता व्यक्त करण्यास सुरुवात करतो.
आपल्याला वेळ दिला पाहिजे अशी अपेक्षा
जेव्हा तुम्ही रिलेशनशिपमध्ये असता तेव्हा आपला प्रियकर किंवा प्रेयसीने एकमेकांसोबत वेळ घालवावा असे वाटत राहते. प्रत्येक वेळी सोबत राहणे योग्य नव्हे पण दिवसातून थोडा वेळ तरी आपल्या पार्टनरला दिला पाहिजे. कारण कोणीही दिवसभरात पूर्णपणे व्यस्त नसते. थोडा तरी वेळ पार्टनरसाठी काढून त्याच्याबद्दल विचारपूस करण्याची अपेक्षा ही केली जाते. (Love Affair Problem)
हे देखील वाचा- महिला असो वा पुरुष, कोणीही करु शकतं का लिंग परिवर्तन?
अफेयर
जर तुमचा पार्टनर अधिक दुर्लक्ष करत असेल तर त्याचे एखाद्यासोबत अफेअर असू शकते. जेव्हा रिलेशनशिपमध्ये एखाद्या तिसऱ्याच व्यक्तीची एन्ट्री होते तेव्हा पार्टनर तुमच्यामध्ये कमी इंट्रेस्ट दाखवण्यास सुरुवात करतो.
या व्यतिरिक्त जरी पार्टनर तुम्हाला इग्नोर करत असेल तर एकमेकांना थोडा वेळ ही देऊन पहा. जर हेल्थी रिलेशनशिप ठेवायचे असेल तर असे करा. अशावेळी पार्टनरला जबरदस्तीने बोलण्यासाठी प्रवृत्त करु नका. यामुळे तुमच्यामधील वाद हा अधिकच वाढू शकतो. त्यावेळी स्थिती ही बिघडू शकते. त्याचसोबत कोणत्याही निष्कर्षावर लगेच येऊ नका. शांत रहा आणि प्रथम स्थिती समजून घेऊन विचार करा आणि वागा.