प्रॉपर्टी संदर्भातील फर्म नाइट फ्रंक यांची जाहीर केलेल्या एका रिपोर्ट्सनुसार यंदाच्या वर्षात घराच्या विक्रीत जबरदस्त वाढ झाली आहे. त्यामुळे प्रॉपर्टी बाजारात पुन्हा एकदा जोर आला आहे. अशातच तुम्ही सुद्धा एखादे नवे घर किंवा जमिनीचे रजिस्ट्रेशन करणार असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा. अन्यथा तुम्हाला त्याचा फटका बसू शकतो. (Property Registration Tips)
खरंतर जमीन किंवा घराचे रजिस्ट्रेशन करणे ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे. ज्यामध्ये एखादी प्रॉपर्टी खरेदी करणारा मालक ती संपत्ती आपल्या नावे करतो. या प्रक्रियेत कायद्याअंतर्गत त्या प्रॉपर्टीचे स्थायी मालकी हक्क मिळतात. यामध्ये काही महत्वाची कागदपत्रं सुद्धा आवश्यक असतात. लक्षात असू द्या की, रजिस्ट्रेशनच्या वेळी विक्रेत्याकडून दिली गेलेली कागदपत्र ही योग्य असावीत.

सर्वात प्रथम मालकाचा शोध घ्या
तुम्हाला माहिती असले पाहिजे की, जो व्यक्ती जमिनीची विक्री करत आहे तोच त्या जमिनीचा खरा मालक आहे का? यासाठी तुम्ही वकिल किंवा त्या संबंधित तज्ञांची मदत घेऊ शकता. त्याचसोबत वकिलाच्या माध्यमातून सेल्स डीड आणि प्रॉपर्टी टॅक्सच्या रिसिप्टची तपासणी सुद्धा करा. याच्या माध्यमातून संपत्ती संदर्भातील गेल्या ३० वर्षांची माहिती मिळवू शकता.
सार्वजनिक नोटीस जाहीर करा
कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करण्यापूर्वी त्याबद्दल स्थानिक न्यूजपेपर किंवा पत्रकात त्याबद्दल माहिती छापावी.जर ती जमिन वादाच्या भोवऱ्यात अडकली असेल तर कोण त्यावर दावा करत आहे हे शोधून काढा. त्याचसोबत तुम्हाला कळेल की, त्या जमिनीवर थर्ड पार्टीचा हात तरी नाही ना हे सुद्धा कळणार आहे.(Property Registration Tips)
हे देखील वाचा- Cryptocurrency मध्ये गुंतवणूक करत असाल तर व्हा सावध, अॅपच्या माध्यमातून अशा पद्धतीने होतेय नागरिकांची फसवणूक
पॉवर ऑफ अटॉर्नीची तपासणी करा
काही वेळेस जमिन किंवा प्रॉपर्टीची विक्री पॉवर ऑफ अटॉर्नीच्या माध्यमातून केली जाते. या पद्धतीत फसवणूक होण्याची सर्वाधिक शक्यता असते. अशातच तुम्ही एखाद्या तज्ञाशी याबद्दल माहिती घेऊन पुढील व्यवहार करु शकता. तर जी प्रॉपर्टी तुम्हाला विक्री केली जात आहे त्याचा उल्लेख पॉवर ऑफ अटॉर्नीमध्ये आहे का हे सुद्धा तपासून पहा. या प्रक्रियेत काही कागदपत्रांची अदलाबदली सुद्धा केली होती.
त्याचसोबत सर्वात प्रथम ज्या प्रॉपर्टीसाठी रजिस्ट्रेशन करणार आहात त्या व्यक्तीच्या नावावर आहे का जो तुम्हाला विक्री करत आहे.