Home » ‘लिझ ट्रस यांनीच स्वतः राजीनामा द्यावा’ अशी मागणी

‘लिझ ट्रस यांनीच स्वतः राजीनामा द्यावा’ अशी मागणी

by Team Gajawaja
0 comment
British Prime Minister
Share

ब्रिटनमध्ये चाललंय काय….हा प्रश्न जगभरात विचारला जात आहे.  त्याला कारण आहे, अवघ्या चाळीस दिवसांपूर्वी ब्रिटीश पंतप्रधानपदाची शपथ (British Prime Minister) घेतलेल्या लिझ ट्रस…ब्रिटनच्या जनतेला अनेक आश्वासनं देत पंतप्रधान झालेल्या आणि भारतीय मूल वंशाचे ऋषी सुनक यांचा पराभव करुन चर्चेत आलेल्या लिझ ट्रस यांना आता त्यांच्याच पक्षाचा विरोध होऊ लागला आहे.  त्यामुळे येत्या ख्रिसमसपर्यंत तरी लिझ ब्रिटनच्या पंतप्रधानपदी राहतील का हा प्रश्न ब्रिटनच्या जनतेला पडला आहे.  अवघ्या सहा आठवड्यांच्या लिझ यांच्या कार्यकालात आर्थिक नियोजन आणि खासदारांची नाराजी यामुळे लिझ यांची खुर्ची धोक्यात आली आहे.  

ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी  राजीनामा दिल्यानंतर लिझ ट्रसने यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा(British Prime Minister) कारभार हाती घेतला.  त्यांनी नवीन मंत्रिमंडळाची घोषणा केली तेव्हा तिने अनेक आर्थिक आश्वासने दिली होती. त्यासाठी काही मोठे आर्थिक निर्णय घेतले.  मात्र लिझ यांचे हेच निर्णय त्यांच्यासाठी आणि ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेसाठी मारक ठरले आहेत. उदारमतवादी आर्थिक धोरणे, आणि त्यावर घेतलेले यू-टर्न यामुळे आता ब्रिटनमध्ये केवळ आर्थिक संकटच नाही तर राजकीय संकटही निर्माण झाले आहे.  टाइम्सने केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार लिझ ट्रसची हकालपट्टी करण्यासाठी आणि त्यांच्या जागी पेनी मॉर्डाउंट आणि ऋषी सुनक यांच्यापैकी एकाला संधी देण्यासाठी प्रयत्न करत आहेत.  या दरम्यान वाढत्या टीकेच्या पार्श्वभूमीवर, लिझ यांनी ब्रिटनच्या चॅन्सेलर ऑफ द एक्स्चेकर, क्वासी क्वार्टेंग यांची हकालपट्टी केली.  मात्र या हकालपट्टीनं लिझ यांच्याविरोधात तापलेलं वातावरण अधिकच गरम झालं आहे.  ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर जवळपास 40 दिवसांनी लिझ ट्रस यांना या पदामागची धग जाणवायला लागली आहे.  पक्षांतर्गत बंडखोरांचा आवाजही तीव्र झाला आहे.  काही वृत्तपत्रांच्या सर्वेक्षणानुसार ट्रस यांना 24 ऑक्टोबरला पंतप्रधान पदावरून हटवले जाऊ शकते. त्यांच्याविरोधात पक्षाचे 100 सदस्य लवकरच अविश्वास प्रस्ताव आणणार असल्याची चर्चा आहे.  याला कारण म्हणजे लिझ यांनी घेतलेल्या निर्णयामुळे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ब्रिटनचे चलन नीचांकी पातळीवर घसरले आणि सरकारवर कर्ज घेण्याची वेळ आली.  हे व्यापक आर्थिक संकट थांबवण्यासाठी बँक ऑफ इंग्लंडला हस्तक्षेप करावा लागला.(British Prime Minister)

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) नेही  लंडनमधील लिझ सरकारला धोरण बदलण्याचे आवाहन केले.  यासर्वांवर लिझ यांनी आपल्या धोरणांचा बचाव करत आर्थिक उलाढाल  ही युक्रेन युद्धामुळे झाल्याचे कारण पुढे केले.  आपल्या योजना या आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या असल्याचा युक्तीवादही त्यांनी केला आहे. आता ब्रिटनमध्ये पुन्हा पंतप्रधानपदासाठी (British Prime Minister)चर्चा सुरु झाली आहे.  यात भारतीय वंशाचे खासदार ऋषी सुनक यांचा दावा भक्कम झाला आहे. सुनक हेच ब्रिटनचे पुढचे पंतप्रधान असल्याचा दावा तेथील बुकींनीही व्यक्त केला आहे.  सुनक यांना पाठिंबा देणाऱ्या खासदारांचे म्हणणे आहे की, सध्या कोणताही कंझर्व्हेटिव्ह खासदार सुनक यांच्या आर्थिक बाबी आणि त्यांची धोरणे यांच्याशी बरोबरी करू शकत नाही. अशा परिस्थितीत केवळ सुनकच ब्रिटनला आर्थिक संकटातून बाहेर काढू शकतील.  ब्रिटिश पाउंड डॉलरच्या तुलनेत नीचांकी पातळीवर आहे. इंधनाच्या वाढत्या दरामुळे मध्यमवर्गीयांमध्ये संतापाचे वातावरण आहे. रशियाकडून होणारा इंधनाचा पुरवठा आणि येणारा हिवाळी हंगाम पाहता या प्रकरणी तातडीने कार्यवाही करण्याची गरज आहे. लिझ सरकारच्या आर्थिक आघाड्यांवरील यू-टर्नमुळे हे सर्व प्रश्न अधिक जटील झाले आहेत. अशा स्थितीत पक्षाने ट्रसऐवजी ऋषी सुनक यांच्याकडे नेतृत्व सोपवणे योग्य ठरेल, अशी खासदारांची मागणी आहे.  याबरोबरच लिझ यांनीच स्वतः राजीनामा द्यावा अशी मागणी काही कायदेतज्ञांनीही केली आहे.  लिझ ट्रस यांच्या पंतप्रधानपदाबाबत (British Prime Minister) सर्वेक्षणही करण्यात आले त्यात 62% लोकांनी लिझ यांची निवड चुकीची असल्याचे मत नोंदविले आहे.  

===========

हे देखील वाचा : फेसबुक आणि इंस्टाग्रामवर रशियाने लावले दहशतवादी संघटनेचा आरोप

==========

खासदार ऋषी सुनक यांना त्यांच्या पक्षाच्या 250 मतदान खासदारांपैकी 137 खासदारांचा पाठिंबा आहे, तर ट्रस समर्थक 113 खासदार आहेत.  सुनक यांना वाढता पाठिंबा मिळत असला तरी सुनक अत्यंत शांत आहेत.  त्यांनी या सर्वांवर कोणतीही प्रतिक्रीया व्यक्त केली नाही.  एकूण काय 42 वर्षाचे ऋषी सुनक ब्रिटनच्या 10 डाउनिंग स्ट्रीटवर आले तर तमाम भारतीयांसाठी ती अभिमानाची गोष्ट आहे.  मात्र यावेळी सुनक म्हणूनच सबुरीचे धोरण घेत असावेत.  गेल्यावेळी सोशल मिडीयावर नको तेवढा त्यांचा भारतीयत्वाचा मुद्दा गाजला आणि त्यामुळे ब्रिटीश मुल खासदारांनी त्यांना नाकारले.  यावेळी तसा कोणताही धोका घेण्यास सुनक तयार नाहीत, हे स्पष्ट होत आहे.  

सई बने…


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.