खतना संदर्भात सामान्य समज असा आहे की, ते फक्त मुस्लिम बांधवांमध्येच त्याची परंपरा आहे. मात्र हे यहूगदियांमध्ये सुद्धा एक प्रचलित परंपरा आहे. अन्य धर्मातील लोक सुद्धा मेडिकल कारणास्तव खतना करतात. एअर फोर्समधून निवृत्त झालेले आणि बायलॉजीचे जाणकर अनिल मिश्रा यांनी काही आकडेवारीचा हवाला देत असे म्हटले की, खतना केलेल्या पुरुषांमध्ये ६८ टक्के लोक ही मुस्लिम आहेत. (Khatana in Muslims)
खतनाच्या प्रक्रियेबद्दल आपल्याला अधिक माहिती नसते. या प्रक्रियेत खरंतर लिंगाच्या पुढील बाजूवरील अतिरिक्त त्वचा कापली जाते. खरंतर लहानपणीच मुलांचे खतना केला जातो. खतना केवळ पुरुषांमध्येच नव्हे तर काही समुदायातील महिलांचा सुद्धा करण्याची परंपरा आहे.
मेडिकल सायन्सच्यानुसार, खतना ही प्रक्रिया वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहिली तर ही योग्य आहे. याच्यामुळे एचआयवी आणि सेक्शुअली पसरणारे दुसरे आजार हे कमी होतात. सामान्यत: असे म्हटले जाते की,लिंगाच्या स्वच्छतेसाठी हे फायदेशीर असते. संक्रमण, खाज येणे अशा समस्या ही कमी होतात. यौन संबंधादरम्यान याचा परिणाम होतो. तर खतना ही प्रक्रिया वैद्यकिय दृष्टीकोनातून समजून घेऊयात.

कोणत्या आजारांपासून होतो बचाव?
-युटीआयपासून बचाव
जागतिक आरोग्य संघटनाच्या एका रिपोर्ट्सनुसार, खतना केल्याने युटीआय म्हणजेच युरिनरी ट्रॅक्ट इंफेक्शनचा धोका कमी केला जाऊ शकतो. रिसर्चच्या मते, खतना केल्याने संपूर्ण आयुष्यभर युटीआयचे इंफेक्शनचा धोका हा २३.४ टक्के असतो.
-सिफलिसपासून बचाव
रिसर्चच्या मते, मुलांचे खतना केल्याने सिफलिस सारखे यौन संचारित संक्रमणापासून बचाव होतो. खतना सिफलिसची समस्या ३३ टक्के कमी करु शकतो. पुरुषांचा खतना त्याची महिला यौन पार्टनरमध्ये सुद्धा सिफलिसचा धोका ५९ टक्के कमी करतो. सिफलिस, एचआयवी संक्रमणाचा धोका वाढवतो.
-एचआयवीचा धोका सुद्धा कमी होतो
रिसर्च असे सुद्धा सांगते की, या प्रक्रियेमुळे एचआयवीचा धोका सुद्धा ५०-६० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो. (Khatana in Muslims)
-पॅपिलोमा वायरस आणि कॅंन्सर पासून बचाव
खतना करणाऱ्या पुरुषांमध्ये आणि महिला पार्टनरमध्ये यौन संबंधादरम्यान पॅपिलोमा वायरपासून बचाव होऊ शकतो. या पॅपिलोमा वायरसच्या कारणास्तव महिलांमध्ये सर्वाइकल आणि योनी कँन्सर, तर पुरुषांमध्ये लिंग कॅन्सरचा धोका वाढतो. म्हणजेच खतना या धोक्यापासून बचाव करतो.
हे देखील वाचा- जन्मावेळी मुलं का रडते?
-अन्य आजारांपासून बचाव
खतना करण्याचे आणखी काही फायदे आहेत. या प्रक्रियेमुळे फोरस्किन संबंधित समस्या बॅलेनाइटिस आणि पोस्टहाइटिसचा धोका कमी होतो. वेसिकोयुरेटरल रिफ्लक्स पासून बचाव करण्यासाठी ही मदत होते.
खतना केल्याने होणारे काही उलटे परिणाम
प्रत्येक सर्जिकल प्रक्रियेत काही ना काही नुकसान होते. खतनाचे सुद्धा आहेत. जसे सर्जरी दरम्यान, कमी अधिक चामडी निघणे किंवा सर्जरी केली आहे तेथील घाव लवकर बरा न होणे. या व्यतिरिक्त हाइस्पोस्पॅडिया, एपिस्पॅडिया, संक्रमण, ब्लिडिंग होणे, लिंगाच्या छिद्रात सूज येणे अशा समस्या सुद्धा उद्भवू शकतात.