जेव्हा आपम विमानाने एखाद्या ठिकाणी प्रवास करतो तेव्हा फ्लाइट अटेंडेंटकडून आपल्याला काही सुचना दिल्या जातात. त्यानुसार आपल्याला आपला फोन हा फ्लाइट मोडवर (Flight Mode) ठेवण्यास सांगितले जाते. ही सुचना विमानातील प्रत्येक व्यक्तीसाठी असते. फ्लाइट मोडवर जेव्हा तुम्ही तुमचा फोन ठेवता तेव्हा त्याचे नेटवर्क ऑफ होते. परंतु विमानात आपल्याला फोन फ्लाइट मोडवर का ठेवण्यास सांगितला जातो? यावर कधी विचार केलाय का? तर आज आपण याच विषयाबद्दल बोलणार आहोत.
फ्लाइट मोड म्हणजे काय?
आपल्या सर्वांच्या फोनमध्ये फ्लाइट मोड नावाचे एक ऑप्शन दिले जाते. हे ऑन केल्यानंतर तुमच्या मोबाईलचे नेटवर्क जाऊन तुमच्या क्रमांकावर कोणीही मेसेज अथवा फोन केल्यास तो लागणार नाही. ऐवढेच नव्हे तर इंटरनेटचा सुद्धा यावेळी आपण वापर करु शकत नाहीत. दरम्यान, फ्लाइट मोड ऑन केल्यानंतर तुम्ही डाउनलोडेड व्हिडिओ पाहणे, गाणी एकणे किंवा गेम खेळू शकता. तर काही मोबाईल मध्ये वायफाय आणि ब्लुटूथचा सुद्धा वापर करु शकता.

विमानात फ्लाइट मोड का ऑन केला जातो?
जर विमानात तुम्ही फ्लाइट मोड ऑन नाही केल्यास आणि त्याचा संपर्क विमानाच्या कम्युनिकेशन सिस्टिमवर प्रभाव पडल्यास पायलटला विमान चालवण्यास समस्या येऊ शकते. उड्डाणावेळी पायलट नेहमीच कंट्रोल रुमच्या संपर्कात राहतो. जर फोनचे नेटवर्क ऑन असेल तर पायलटला सुचना स्पष्टपणे मिळू शकत नाही. रेडिओ फ्रिक्वेंसीमध्ये बाधा येऊ शकते. त्यामुळेच विमानातून प्रवास करताना नेहमीच फ्लाइट मोड ऑन ठेवण्यास सांगितले जाते.(Flight Mode)
हे देखील वाचा- वाहनातील एअर बॅगला कसे कळते अपघात झाल्याचे, जाणून घ्या अधिक
त्याचसोबत फ्लाइट मोडच्या वापराने तुम्ही बॅटरी पॉवर ही Save करु शकता. डिवाइसमध्ये फ्लाइट मोड ऑन केल्यानंतर सर्व प्रकारचे रेडिओस डिसेबल होतात. तर लक्षात असू द्या की, इन्कमिंग फोन आणि एसएमएस सुद्धा तुम्हाला आलेले फ्लाइट मोड ऑफ केल्यानंतर कळतील. मात्र फ्लाइट मोडवर फोन असेल तर अन्य काही गोष्टी करता येत नसल्याने त्याचा आपण वापर ही कमी करतो. अशातच तुमच्या फोनची बॅटरी ही दीर्घकाळ टिकते. शक्यतो फ्लाइट मोड हा तुम्ही तुम्हाला एखाद्या महत्वाच्या कामामध्ये कोणाचा व्यत्यय नको असेल किंवा आपण जसे वर पाहिले की, विमानातून प्रवास करताना फ्लाइट मोडवर फोन ठेवतो त्या पद्धतीने वापर करु शकता.