गाझियाबाद मध्ये एका पिटबुल कुत्रा (Pitbull Dog) एका मुलाला अत्यंत क्रुरपणे चावल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे मुलाच्या संपूर्ण चेहऱ्यासह शरिरावर जखमा झाल्या आहेत. मुलाला १२५ टाके यामुळे घालावे लागले आहेत. या प्रजातीचे कुत्रे अत्यंत भयानक आणि आपल्या मालकांनाच चावल्याची प्रकरण आधीसुद्धा समोर आली आहेत. लखनौ मध्ये सुद्धा काही दिवसांपूर्वी पिटबुलने आपल्या मालकाच्या आईच्या शरिरावर ठिकठिकाणी चावा घेत मारुन टाकले होते. या घटनेची सुद्धा जोरदार चर्चा झाली होती.
कुत्रे का पाळले जातात?
कुत्रे पाळण्यासंदर्भात असा समज आहे की, त्यांचा मालकांसोबत ते खुप इमानदारीने वागतात. मात्र रानटी कुत्र्यांसोबत असे म्हटले जाते की, ते पाळण्यायोग्य नसतात. या व्यतिरिक्त कुत्रे ठेवण्यामागे एक कारण असे ही की, त्यांना सुरक्षिततेच्या कारणास्तव ते पाळतात. काही कुत्रे केवळ पशूंवरील प्रेम आणि स्नेहाच्या उद्देशाने पाळले जातात. तर काही दुर्लक्ष प्रजातीचे कुत्रे फक्त शो ऑफसाठी पाळले जातात.
पिटबुल कुत्रे
पिटबुल हा शब्द अमेरिकेतील बुलडॉग आणि टेरियर्सच्या वंशांची ब्रिड असते. जस की, युके सारख्या दुसऱ्या देशात काही अमेरिकन बिट बुल टेरियर म्हणजेच एपीबीटी नावाने ओळखले जातात. वास्तवात कुत्र्यांच्या काही प्रजाती या संकरित रुपात मानल्या जातात. परंतु इंग्लंडमध्ये त्यांना बुल अॅन्ड टेरियर डॉगसह अमेरिकन बुली टाइप डॉगच्या संकरपासून बनवले गेले होते. अशा प्रकारचे कुत्रे आपल्या पिसाळण्याच्या सवयीमुळे अमेरिका आणि जगातील काही अन्य देशांमध्ये बदनाम आहेत.

लढाई करण्यात तरबेज
पिटबुल कुत्रे (Pitbull Dog) सामान्य कुत्र्यांपेक्षा अधिक तगडे असल्याचे मानले जाते. ते अत्यंत सक्रिय, शक्तीशाली आणि मजबूत जबड्याचे असल्याचे सांगितले जाते. साहरी, निडर आणि लढाई करण्यात ते तरबेज असतात. जगभरातील काही ठिकाणी त्यांना डॉगफाइटिंगच्या खेळासाठी सुद्धा उपयोगी मानले जाते. अमेरिकेसारख्या देशात सुद्धा डॉगफाइटिंगवर जरी बंदी असली तरीही हा खेळ होते त्यामध्ये प्रथम पिट डॉगला पसंदी दिली जाते.
हे देखील वाचा- जनावरांप्रमाणेच चालतात तुर्की मधील ‘या’ घरातील मंडळी, वैज्ञानिक ही चक्रावले
या देशामध्ये बंदी
हे सुद्धा खरे आहे की, देशात पिटबुल कुत्र्यांवर बंदी घालण्यात आली आहे. त्याचसोबत इंग्लंड, फ्रान्स, कॅनडा, डेनमार्क, फिनलॅंन्ड, नॉर्वे, न्युझीलंड, इज्राइल, मलेशिया यांचा सुद्धा समावेश आहे. या व्यतिरिक्त बेल्जियमस जापान, जर्मनी, चीन आणि ब्राझीलच्या काही भागात ही बंदी आहे. या देशांमध्ये पिटबुल कुत्रा पाळणे, त्यांचा व्यवसाय करणे किंवा त्यांच्या प्रजननावर ही बंदी घालण्यात आली आहे.
या कुत्र्यांवर बंदी घालण्यामागे काही कारण आहेत. परंतु तज्ञांचे असे मानणे आहे की, त्यांचे पालनपोषण सुद्धा काही वेळेस नीट केले जात नाही. त्यांच्याबद्दल काही भ्रम ही आहेत. काही लोक मानतात की, ते फक्त लढाई करण्यासाठीच बनले आहेत. मात्र हे खरं आहे की, ते दुसऱ्या कुत्र्यांपेक्षा अधिक खतरनाक असतात. जर त्यांना योग्य ती ट्रेनिंग दिल्यास ते आपले व्यक्तिमत्व सुद्धा बदलू शकतात.