सामान्य महिलाच नव्हे तर अमेरिकेच्या सैन्यातील (US Military) महिला सुद्धा सुरक्षित नाहीत. त्यांचे लैंगिक शोषण केले जात असून त्यामध्ये वाढ झाल्याचा धक्कादायक खुलासा अमेरिकेतील सुरक्षा विभाग पेंटागन यांनी नुकत्याच रिपोर्टमध्ये केला आहे. रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेच्या सैन्यात २०२१ मध्ये लैंगिक शोषणाच्या प्रकरणांमध्ये १३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षात अमेरिकेच्या सैन्यासंबंधित लैंगिक शोषणासंबंधित ८,८६६ प्रकरणे दाखल करण्यात आली. तर वास्तविक आकडे यापेक्षा अधिक असू शकतात. तर २०२० मध्ये हा आकडा ७८१३ होता.
पुरुष सुद्धा सुरक्षित नाही
पेंटागनच्या रिपोर्ट्सनुसार, गेल्या १६ वर्षात अमेरिकेच्या सैन्यात महिलांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात रेकॉर्ड उच्च स्तरावर पोहचला आहे. ही आकडेवारी आतापर्यंतची सर्वाधिक आहे. अमेरिकेच्या सैन्यात अशी प्रकरणे दाखल करण्यासाठी २००५ मध्ये स्पेशल डिपार्टमेंटची स्थापना करण्यात आली होती. २००६ पासून अशा घटना रेकॉर्ड करणे सुरु झाले होते. यंदाच्या वर्षात धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. पुरुषांसह लैंगिक शोषण केल्याची सर्वाधिक प्रकरणे २००६ मध्येच समोर आली.
DW च्या रिपोर्ट्सनुसार, सैन्याद्वारे करण्यात आलेला एक सर्वे आणखी धक्कादायक आहे. हा सर्वे ३६ हजार कर्मचाऱ्यांमध्ये करण्यात आला. त्यामध्ये ८.४ टक्के महिला आणि १.५ टक्के पुरुषांनी लैंगिक शोषणाचा सामना केला आहे. वर्षानुवर्षे या प्रकरणात झालेली वाढ असे सांगते की., सैन्यात सुद्धा महिला आणि पुरुष सुरक्षित नाहीत.
हे देखील वाचा- India Navy चा झेंडा शिवरायांना समर्पित, जाणून घ्या नौदलाच्या नव्या ध्वजाबद्दल अधिक
लैंगिक शोषण केल्यानंतर अपराधी घोषित केल्यानंतर काय होते स्थिती?
रिपोर्ट्सनुसार, २०२१ मध्ये अमेरिकेच्या सैन्यात जेव्हा सर्वाधिक २६ टक्के लैंगिक शोषणाची प्रकरणे दाखल करण्यात आली. तर नौसेनेत १९ टक्के आणि मरीनमध्ये मात्र २ टक्के प्रकरणे समोर आली. अमेरिकेत अशा प्रकरणांमध्ये तेव्हा वाढ झाली जेव्हा २०२१ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी सैन्य कायद्याअंतर्गत लैंगिक शोषणाला अपराध म्हणून घोषित केले. अशा प्रकरणांची सुनावणी सैन्याच्या कोर्टात केली जाईल. तर अशा प्रकरणांमध्ये लॉबिंग विशेष वकील करतील, कठोर कायदा लागू केला तरीही प्रकरणे काही कमी झाली नाहीत. तो लागू केल्यानंतर प्रकरणांमध्ये घट होईल असे त्यावेळी म्हटले होते. पण त्याच्या विरुद्धच घडले. २०२१ मध्ये लैंगिक शोषणाची सर्वाधिक प्रकरणे समोर आली.(US Military)
पेंटागनमध्ये ऑफिस ऑफ फोर्स रेजिलिएशनच्या कार्यकारी निर्देशक एलिजाबेथ फॉस्टर अशा म्हणतात की, आकडेवारी सांगते लैंगिक शोषणचा आकडा हा सर्वाधिक वरच्या स्तरावर पोहचला आहे. पुरुष सुद्धा यामध्ये सुरक्षित नाहीत. आकडे निराशाजनक आणि दु:खद आहेत. सैन्यातील तिन्ही विभागात हे प्रकरण खुप त्रासदायक आहे. दरम्यान, एजिलाबेथ फॉस्टर यांचे कार्यालय सैन्यातील कर्मचाऱ्यांची देखभाल करण्यासाठी काम करते. त्यानंतर सुद्धा अशा प्रकारच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होत आहे.