आपल्या इतिहासात अशा काही घटना आहेत ज्या आजही कोणाला माहिती नाहीत. पुराणांमध्ये असे सांगितले जाते की, देवतांच्या सुरक्षितांसाठी सात समुद्राचे पाणी पिणारे भगवान शंकरांचे भक्त ऋषि अगस्त्य (Rishi Agastya) यांनी आपल्या मुलीशीच लग्न केले होते. मात्र अखेर त्यांनी असे का केले असावे? असे नक्की काय झाले होते की, त्यांना त्यांच्याच मुलीशी विवाह करावा लागला होता. तर आज त्याच बद्दल आपण अधिक जाणून घेऊयात.
कोण होते ऋषि अगस्त्य?
ऋषि अगस्त्य हे राजा दथरथ याचे राजगुरु होते. त्यांनी आपल्या तपस्येच्या काळात काही मंत्रांच्या शक्तीला पाहिले होते. त्यांची गणना सप्तर्षिंमध्ये केली जाते. महर्षी अगस्त्य यांना मंत्र दृष्टा ऋषि असे म्हटले जाते. कारण ऋग्वेदातील अनेक मंत्र त्यांच्या द्वारे दृष्टीस पडतात. जेव्हा देवासुर संग्राम होत होते तेव्हा सर्व दानव हरल्यानंतर सुद्धा समुद्राच्या तळाशी जाऊन लपले होते. तेव्हा भगवान शंकराच्या आज्ञेवरुन अगस्त्य ऋषिंनी सात समुद्राचे पाणी प्यायले होते. त्यानंतर राक्षसांचा संहार झाला होता.

ऋषि अगस्त्य यांनी आपल्याच कन्येशी का केला होता विवाह?
एके दिवशी अगस्त यांनी आपल्या तपोबलाने सर्वगुण संपन्न अशा एका नवजात कन्येची निर्मिती केली. या कन्येचे नाव लोपामुद्रा असे ठेवण्यात आले. परंतु जेव्हा त्यांना असे कळले की, विदर्भचा राजा संतान प्राप्तीसाठी तप करत आहे तेव्हा त्यांनी आपल्याच मुलीला त्याला दत्तक दिले.
जेव्हा त्यांची कन्या तरुण झाली तेव्हा त्यांनी त्याच कन्येसोबत विवाह करण्यासाठी ऋषि अगस्त्य (Rishi Agastya) यांनी राजाकडे तिचा हात मागितला आणि राजाने सुद्धा या विवाहाला नकार दिला नाही. कारण राजाला माहिती होते की, जर त्याने असे करण्यास नकार दिला असता तर ऋषि अगस्त्यांनी त्याला अत्यंत खतरनाक श्राप देऊन भस्म केले असते. त्यामुळे राजाने ऋषि अगस्त्य यांना नकार दिला नाही.
हे देखील वाचा- जगातलं सर्वात मोठं विष्णू मंदिर भारतात नाही, तर आहे ‘या’ देशामध्ये…
ऋषि अगस्त्य आणि त्यांच्या पत्नीची पुत्रं
ऋषि अगस्त्य यांनी आपली पत्नी लोपामुद्रा (आपली मुलगी) हिच्या पूर्ण सहमतीने लग्न केल्यानंतर दोन मुलांना जन्म दिला. ज्यामधील एका मुलागेच नाव भृंगी ऋषि होते, जे शंकरांचे भक्त होते. तर दुसऱ्या मुलाचे नाव अचुता होते. त्यांच्या लग्नासाठी देवतांनी असे म्हटले होते की, त्यावेळी पृथ्वीवरील मानव नात्यांच्या प्रतिष्ठेकडे न पाहता आत्म्याकडे बघतात.