Home » Rashi Bhavishya : राशिभविष्य! आजचा शुक्रवार ‘या राशींसाठी असेल खास

Rashi Bhavishya : राशिभविष्य! आजचा शुक्रवार ‘या राशींसाठी असेल खास

by Jyotsna Kulkarni
0 comment
Rashi Bhavishya
Share

आज ०९-०१-२०२६ शुक्रवार. देवीचा वार असल्याने आजच्या दिवशी तिची कृपा कोणत्या राशीला मिळणार हे पाहूया. त्या आधी आजची तिथी कृष्ण षष्ठी असून, आजचे नक्षत्र उत्तराफाल्गुनी आहे. आजच्या दिवसभरातील अमृतकाळ हा सकाळी ०८:३४ ते ०९:५७ पर्यंत असेल. तर राहूकाळ हा ११:२० ते १२:४३ पर्यंत आहे. आज सकाळी सुर्योदय हा ०७:११ झाला तर सुर्यास्त संध्याकाळी ०६ वाजून १४ मिनिटांनी होणार आहे. आजचा दिवस बारा राशींसाठी कसा असेल याचा आढावा आपण दैनिक राशी भविष्यमधून घेऊया.

मेष
आजचा दिवस आर्थिक आणि व्यावसायिकदृष्टया लाभदायक आहे. आर्थिक लाभ होतील. आज मेष राशीचे लोक प्रवास करतील या प्रवासात काही अडचणी येण्याची शक्यता आहे. तुमच्या मानसिक स्वास्थ्यात थोडाफार बदल जाणवेल. तुमच्या व्यवसायाची स्थिती मध्यम राहील. तुमच्या आजूबाजूच्या नकारात्मक गोष्टींचा परिणाम तुमच्यावर होऊ शकतो. तुमच्या ओळखी वाढतील आणि तुम्ही काही महत्त्वाचे लोकांशी संपर्क साधू शकाल.

वृषभ
पचनक्रियेची समस्या उदभवुन प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी आपल्या आरोग्याची कसलीही काळजी करण्याची गरज नाही. आपल्या सभोवतालचे लोक आपले मनोधैर्य आणि चैतन्य वाढवतील. कामानिमित्त खाजगी कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी आज तुमचा सगळ्यांवर प्रभाव राहील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला मुलांकडून काहीतरी चांगली बातमी ऐकायला मिळेल.

मिथुन
आजचा दिवस उत्तम जाणार. जी कामं अडकली आहेत ती सगळी काम आज कदाचित पूर्ण होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या संधी मिळू शकतात. आर्थिक परिस्थितीही आधपेक्षा सुधारेल. विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना चांगली नोकरीची ऑफर मिळू शकते. तुम्ही ऑफिसमधील सहकाऱ्यांसोबत जेवण्यासाठी बाहेर जाण्याचा प्लान आखाला.

कर्क
आज तुमच्या वैयक्तिक आयुष्यात सर्व काही ठीक राहील. गुंतवणूक करण्यापूर्वी आणि कोणताही शब्द देण्यापूर्वी तज्ञांशी बोलून घ्या. कामाच्या ठिकाणी प्रत्येक जण तुमचे म्हणणे मनापासून ऐकेल. मित्राचा सहवास आपणाला आनंद देईल. जवळचे प्रवास होतील.

सिंह
तुमच्या भागीदाराशी काहीही व्यवहार करणे, त्याच्याशी बोलणे कठीण होऊन बसेल. अविवाहित मंडळींना आज आनंदाची बातमी मिळू शकते. कुटुंबात सुख शांती नांदेल. निर्धारित कामात यश मिळेल. तुमची कमाई वाढेल आणि तुम्हाला आर्थिक लाभ मिळवण्याचे नवीन मार्ग देखील सापडतील.

Rashi Bhavishya

कन्या
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार सतर्कतेचा असणार आहे. तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील नव्या घडामोडीमुळे तुम्ही आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आनंद होईल. पुढील काही दिवसांत चांगल्या संधी तुम्हाला मिळतील.

तुळ
आज तुम्ही दिवसभर विविध कामांमध्ये व्यस्त राहाल आणि सर्वात कठीण कामेही पूर्ण दृढनिश्चयाने पूर्ण कराल. व्यावसायिक क्षेत्रात फायद्यापेक्षा मेहनतीची अधिकता राहील. परदेशात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आज चांगली बातमी मिळेल. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी विचार करा.

वृश्चिक
वृश्चिक राशीसाठी देखील आजचा दिवस शुभदायी असणार आहे. आज घरगुती कामांमध्ये तुम्ही व्यस्त राहाल.विवाहेच्छुक तरूण तरूणींसाठी चांगली संधी आहे. संतती किंवा पत्नीकडून लाभ होईल. गरजू लोकांना मदत करून तुम्हाला समाधान मिळेल.

धनु
आर्थिक स्थिती चांगल्या प्रमाणात सुधारेल, मात्र त्याचवेळी खर्चाचे प्रमाण देखील वाढलेले असेल. आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षाही मजबूत होईल. आज तुमचे आरोग्य चांगले राहील.दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक क्षेत्रात तुमची प्रतिष्ठा वाढेल.

मकर
गुंतवणुकीसाठी देखील आजचा दिवस योग्य नाही. ग्रहांची स्थिती तुमच्या राशीसाठी अनुकूल नाही. व्यवसायात नवे विचार प्रवाह आणल्याने आपल्या कामाला नवे स्वरूप येईल. व्यवसाय क्षेत्रातील प्रतिकूल वातावरण मनाला अस्वस्थ करेल. शारीरिक थकवा जाणवेल.विद्यार्थ्यांना आजच्या दिवशी अभ्यासात समस्या येऊ शकतात.

कुंभ
तुम्ही निर्णय घेण्यापूर्वी त्याच्या सर्व पैलूंचा काळजीपूर्वक विचार कराल. सर्व व्यावसायिक गोष्टींवर नीट लक्ष द्या. तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. वर्क फ्रॉम होम करणाऱ्या लोकांचे काम वेळेवर पूर्ण होईल.आज अवैध काम व नकारात्मक विचारांपासून दूर राहावे.

मीन
मीन राशीसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. आज तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली काही महत्त्वाची कामे पार पडू शकतात. शारीरिक व मानसिकदृष्टया आज दिवसभर प्रफुल्लित राहाल. संवाद साधा आणि स्वतःला आराम देण्यासाठी थोडा वेळ काढा. कोणत्याही गोष्टीत घाई करू नका, नाहीतर ते काम बिघडेल.

( टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.