Makeup Look : सण-समारंभ, लग्नसराई किंवा ऑफिस पार्टी… मेकअप हा आज प्रत्येक महिलांच्या स्टाईलचा महत्त्वाचा भाग बनला आहे. ट्रेंडी लुक्समुळे व्यक्तिमत्त्व अधिक खुलून दिसते आणि आत्मविश्वासातही भर पडते. आजकाल सोशल मीडियावर दिसणारे मेकअप ट्रेंड्स तरुणींना विशेष भावत आहेत. चला तर जाणून घेऊया असे 7 ट्रेंडी आणि स्टायलिश मेकअप लुक्स, ज्यामुळे तुम्ही कोणत्याही पार्टीची शान बनू शकता. ( Makeup Look)

Glossy Makeup
ग्लॉसी मेकअप चमचमतं सौंदर्य : ग्लॉसी मेकअप हा हलका आणि आकर्षक दिसणारा ट्रेंड मानला जातो. या लुकमध्ये ड्युई फाऊंडेशन, शायनिंग हायलाइटर आणि न्यूड टोन लिप ग्लॉसचा वापर केला जातो. यामुळे त्वचेवरून नैसर्गिक चमक खुलून दिसते. नाईट पार्टी किंवा कॉकटेल फंक्शनसाठी हा परफेक्ट पर्याय आहे.

Smokey Eyes
स्मोकी आय लुक डोळ्यांची जादू : क्लासिक स्मोकी आयज लुक आजही ट्रेंडमध्ये कायम आहे. ब्लॅक, ग्रे किंवा ब्राऊन शेड्सच्या मदतीने आयशॅडो ब्लेंड करून डोळ्यांना बोल्ड आणि ड्रॅमॅटिक इफेक्ट दिला जातो. लाँग आयलॅशेस आणि विंग्ड लाइनरसोबत हा लुक अधिक ग्लॅमरस दिसतो. वेस्टर्न तसेच पारंपरिक आउटफिटसह हा लुक एकदम सूट होतो. ( Makeup Look)

Monochrome Makeup
मोनोक्रोम मेकअप एकाच रंगाची जादू : या लुकमध्ये आयशॅडो, ब्लश आणि लिपस्टिकमध्ये एकाच रंगाच्या परिवारातील शेड्स वापरल्या जातात. पीच, पिंक किंवा रोझ टोन या लुकसाठी उत्तम पर्याय. मिनिमलिस्ट पण ट्रेंडी दिसण्याची इच्छा असल्यास हा मेकअप नक्की ट्राय करा. ( Makeup Look)

Bold Lips
बोल्ड लिप्स लुकमध्ये ठळक बदल जर तुम्हाला साध्या मेकअपमध्येही भारी इम्प्रेशन करायचे असेल, तर बोल्ड लिप्सपेक्षा उत्कृष्ट पर्याय नाही. रेड, वाईन, बरगंडी किंवा प्लम लिपस्टिकमुळे चेहरा लगेच उठून दिसतो. पार्टीतील सर्वांचे लक्ष तुमच्याकडे वेधण्यासाठी हा लुक पुरेसा आहे.

Matte Makeup
मॅट मेकअप क्लासी आणि लॉन्ग लास्टिंग मॅट फाऊंडेशन, मॅट आयशॅडो आणि मॅट लिप्स… हा लुक त्वचा ऑयली असेल तर जास्त योग्य. दिवसभरातही मेकअप उतरल्यासारखा दिसत नाही. क्लासी आणि एलिगंट दिसण्यासाठी मॅट मेकअप हा एक सर्वोत्तम पर्याय आहे.( Makeup Look)

Glitter Makeup
ग्लिटर आय मेकअप पार्टी स्पेशल डोळ्यांवर ग्लिटर आयशॅडो लावल्याने तुमचा पार्टी लुक लगेचच स्पार्कल होतो. गोल्ड, सिल्वर किंवा कॉपर ग्लिटर हे सणावारी आणि नाईट इव्हेंटमध्ये अप्रतिम दिसतात. हा लुक वेडिंग रिसेप्शनसाठी विशेष लोकप्रिय आहे.

Coloured Eyeliner
कलर्ड आयलाइनर फंकी आणि यंग वाइब ब्लॅक लाइनरशिवाय रंगीत आयलाइनर्सने आजकाल धुमाकूळ घातला आहे. ब्लू, ग्रीन, पर्पल आयलाइनर्सने डोळ्यांना वेगळा वाइब मिळतो. कॅज्युअल पार्टी किंवा फ्रेंड्स गेटटुगेदरसाठी हा लुक एकदम क्यूट!
================
हे देखील वाचा:
Diwali Shopping : दिवाळीसाठी साडी खरेदी करण्याआधी ‘या’ टिप्स नक्कीच वाचा
Glowing Tips : दिवाळीत चेहऱ्यावर येईल ग्लो, वाचा करीना कपूरच्या न्यूट्रिशनिस्टच्या खास टिप्स
===================
योग्य मेकअप लुक निवडताना तुमच्या त्वचेचा टोन, आउटफिट आणि प्रसंग लक्षात घेणे महत्त्वाचे. ट्रेंडसोबत स्वतःला कम्फर्टेबल ठेवणे हाच यशस्वी मेकअपचा मुख्य मंत्र आहे. या 7 ट्रेंडी मेकअप लुक्सपैकी कोणताही एक लुक निवडा आणि पार्टीत चमक कारण स्पॉटलाइट तुमचाच आहे.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
