शेक्सपियर म्हणून गेले आहेत “नावात काय आहे?” पण नावात बरंच काही असतं. आपल्याकडे एक काय तर दोन दोन नावं ठेवण्याची प्रथा आहे. एक पाळण्यातलं, एक टोपण, एक कागदोपत्री असे नावांचे बरेच वेगवेगळे प्रकार असतात. शिवाय एकमेकांना नावं ठेवली जातात ती वेगळीच. हे तर काहीच नाही. परवा तर माझ्या एका मैत्रिणीने तिला तिचं नाव आवडत नाही म्हणून ते बदलून घेतलं. आता बोला!(Brands – Rebranded Their Names)
आता हे झालं माणसांचं. पण तुम्हाला माहीत आहे का ,की हे असं नाव बदलण्याचे प्रकार मोठ मोठ्या ब्रॅंड्सच्या बाबतीतही होतात / झाले आहेत. अनेक मोठ्या ब्रॅंड्सची नावं तो ब्रॅंड फेमस होण्याआधी वेगळीच होती. तुम्हाला जाणून घ्यायचंय हे ब्रॅंड्स नेमके कोणते आहेत? तर पुढे वाचा..
१. इंस्टाग्राम
आपल्या सगळ्यांचं लाडकं, हक्काचं, जवळचं आणि सगळ्यात आवडतं हे ॲप. हे ॲप सुरवातीला सुरू करण्यात आलं ते लोकेशन शेअर करण्यासाठी, वेगवेगळे फोटो शेअर करण्यासाठी. आणि हे ॲप सुरवातीला फक्त आयफोन वापरकर्त्यांसाठी बनविण्यात आलं होतं. या ॲपवर तुम्ही तुमचं चेक इन टाकलं की, तुम्हाला त्यावेळी पॉईंट्ससुद्धा मिळायचे. या ॲपचे मालक होते केविन सिस्ट्रोम (Kevin Systrom) आणि माइक क्रीगर (Mike Krieger).
इंस्टाग्रामचं आधीचं नाव होतं Burbn
विन सिस्ट्रोम आणि माइक क्रीगर या दोघांनी ॲपमधल्या फीचर्समध्ये बरेच प्रयोग करून पाहिले, पण कुठलेच प्रयत्न यशस्वी होत नव्हते. शेवटी त्यांनी ठरवलं की हे ॲप फक्त फोटो शेअरिंग ॲप म्हणून ठेवायचं आणि ॲपचं नाव बदलायचं. यानंतर या ॲपचं नाव Burbn वरुन Instagram झालं.(Brands – Rebranded Their Names)

२. झोमॅटो
आजही आपल्याला ऑनलाइन फूड डिलेव्हरी म्हटलं की, सर्वात आधी झोमॅटो ब्रॅंड हमखास आठवतो. आणि हेच या ब्रॅंडचं सगळ्यात मोठं यश आहे, असं म्हणावं लागेल.
झोमॅटोचं सुरवातीला नाव होतं Foodiebay
२०१० साली Foodiebay नावाची फूड डीरेक्टरीची एक वेबसाइट होती. Zomato ब्रॅंडचे फाऊंडर दिपंदर गोयल आणि को फाऊंडर पंकज चब्बा यांनी सलग दोन वर्षांच्या यशानंतर ब्रॅंडचं नाव Foodiebay वरून Zomato केलं. शिवाय हा ब्रॅंड भारतातला पहिला फूडटेक यूनिकॉर्न ब्रॅंड ठरला. (Brands – Rebranded Their Names)

३. ट्विटर
ट्विटर म्हणजे सेलिब्रिटी लोकांचं आणि विशेष म्हणजे राजकारण्यांचं हत्यार. देशात किंवा राज्यात कुठलीही महत्त्वाची घटना घडली की, त्याचे अपडेट्स आपल्याला थेट ट्विटरवर मिळतात. ट्विटरच्या ट्रेंडिंगवर असणाऱ्या हॅशटॅग्जमध्ये सापडतात.
ट्विटरचं आधीचं नाव होतं ते म्हणजे Odeo
आता आपण ज्या ॲपला ट्विटर म्हणतो ते ॲप आधी एक पॉडकास्टचा प्लॅटफॉर्म म्हणून वापरलं जात असे. पण नंतर त्याचं रूपांतर विशेष टिपणी आणि स्टेटमेंट करणाऱ्या मायक्रोब्लॉगिंग ॲपमध्ये झालं. नंतर बरीच उलाढाल झाली आणि आता हे ॲप एलॉन मस्कच्या ताब्यात आहे. ट्विटरचं नामांतर म्हणजे सोशल मिडियाच्या इतिहासातला एक मोठा बदल समजला जातो.(Brands – Rebranded Their Names)

====
हे देखील वाचा – आपण फक्त ४% इंटरनेट वापरतो; उर्वरित इंटरनेटची ही भयाण काळी बाजू तुम्हाला माहिती आहे का?
====
४. टिंडर
आता तुम्ही लग्न झालेले असाल, तर तुम्हाला हे ॲप काय आहे ते माहीत नसेल. पण तुमचं लग्न झालेलं नसेल आणि तुम्ही तुमच्या पार्टनरच्या शोधात असाल, तर तुम्हाला हे ॲप हमखास माहीत असणार. टिंडर म्हणजे तरुणांचं ‘शादी डॉट कॉम’ आहे असं समजा. या ॲपवर तुम्ही तुमचा लाइफ पार्टनर नाही, पण डेट पार्टनर शोधू आणि निवडू शकता.(Brands – Rebranded Their Names)
टिंडरचं आधीचं नाव होतं Matchbox (मॅचबॉक्स)
हे एक अमेरिकन ॲप असून २०१६ साली ते भारतात सुरु करण्यात आलं. आता भारतातही डेटिंगची हवा असल्यामुळे ‘डेटिंग ॲप’ इंडस्ट्रीला इथे भलतीच डिमांड आली आहे, असं म्हणायला हरकत नाही.

५. गूगल
आता गूगलची काही वेगळी ओळख तर सांगायची गरज नाही. गूगल म्हणजे जगातल्या प्रत्येकाचा डिजिटल एनसायक्लोपीडिया आहे.

गूगलचं सुरवातीचं नाव होतं BackRub
Larry Page आणि Sergey Brin यांनी गूगलची स्थापना केली. आणि गूगलने कमावलेलं यश तर आपण सगळे जाणतोच. आज गुगल आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे.