जर तुम्ही एखाद्या छान ठिकाणी सहलीला जाण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही लडाखला भेट दिलीच पाहिजे. लडाख हे भारतातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक आहे, जे उंच पर्वत, तलाव, नद्या, बौद्ध मठ आणि धार्मिक स्थळांनी परिपूर्ण आहे. लडाखमधील प्रत्येक ठिकाणाचे स्वतःचे महत्त्व आहे. तुम्हालाही उन्हाळ्यात लडाखला भेट द्यायची असेल, तर सर्वप्रथम इथल्या काही अद्भुत ठिकाणांबद्दल जाणून घ्या.
पॅंगॉन्ग तलाव
पॅंगॉन्ग तलाव हे लडाखमधील सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे. याला पोकळ तलाव किंवा पँगॉन्ग त्सो असेही म्हणतात. हा तलाव आशियातील सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याच्या तलावांपैकी एक आहे. हा तलाव सुमारे १०० किमी परिसरात पसरलेला आहे. या तलावाचा दोन तृतीयांश भाग तिबेटमध्ये आहे, तर एक तृतीयांश पूर्व लडाखमध्ये आहे. हा तलाव अतिशय सुंदर आहे. हिवाळ्याच्या काळात हा तलाव पूर्णपणे गोठतो.
मॅग्नेटिक हिल
मॅग्नेटिक हिलला चुंबकीय पर्वत देखील म्हणतात. कारण इथे बंद कार देखील स्वतःहून चालू लागते. असं म्हटलं जातं की, जर एखादी कार इथे सुरू न करता सोडली तर ती गाडी आपोआप ताशी २० किलोमीटर वेगाने सुसाट जाऊ लागते. त्यामुळेच हे दृश्य स्वत:च्या डोळ्यांनी पाहण्यासाठी आणि त्याचे रहस्य जाणून घेण्यासाठी पर्यटक येथे येतात.
झंस्कर व्हॅली
झंस्कर व्हॅली हे लडाखमधील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. हे ठिकाण हिमालय पर्वतरांगात येते. ही दरी चारही बाजूंनी डोंगरांनी व्यापलेली आहे. जिथे तुम्हाला एक वेगळीच शांतता मिळेल. जून ते सप्टेंबर हा येथे भेट देण्याचा उत्तम काळ आहे. या सीझनमध्ये बर्फ स्वच्छ असतो.
कारगिल
तुमची लडाखची ट्रिप कारगिलशिवाय अपूर्ण आहे. हे लडाखमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. येथे तुम्ही साहसाचा आनंद घेऊ शकता. येथे तुम्ही ट्रेकिंगलाही जाऊ शकता. मे ते जुलै हा येथे भेट देण्याचा उत्तम काळ आहे.
=====
हे देखील वाचा – रोड ट्रिप करायची आहे? मग निवडा भारतातील ‘ही’ 5 ठिकाणे
=====
रॉयल लेह पॅलेस
तुम्ही लडाखला जात असाल, तर या पॅलेसला नक्की भेट द्या. हा पॅलेस स्वत: मध्येच एक खास वास्तू आहे. यासोबतच इथे बसवलेल्या बुद्धाच्या मूर्तीमुळे इथल्या सौंदर्यात भर पडली आहे.