Home » गुगल चक्क बकऱ्यांना देते पगार! गुगलचा ‘हा’ किस्सा वाचून तुम्हीपण कराल गुगलचे कौतुक…

गुगल चक्क बकऱ्यांना देते पगार! गुगलचा ‘हा’ किस्सा वाचून तुम्हीपण कराल गुगलचे कौतुक…

by Correspondent
0 comment
Google | K Facts
Share

अगदी कोणत्याही प्रकारची माहिती आपल्याला गूगल शोधून देऊ शकतो. गूगल (Google) हे इंटरनेट संबंधी सर्व्हिस आणि प्रोडक्ट पुरवणारे जगातील सर्वात लोकप्रिय सर्च इंजिन आहे.

नेहमीच गुगल विषयी नवीन आणि इंटरेस्टिंग गोष्टी समोर येत असतात. त्यांची क्लाउड सर्व्हिस, ऍडव्हरटाईझिंग टेक्नॉलॉजी, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर तसेच गुगलची ऑफीसेस आणि ते देत असलेल्या सोयीसुविधा!!! हे सर्व काही गुगुलच्या ग्राहकांना आश्चर्याचे धक्के देत असतात.

गुगल जगभरातून अगदी काळजीपूर्वक माणसांची निवड करते. गुगलला माणसे आणि मशीन्स या दोनच गोष्टींची आवश्यकता असते. मात्र याच गुगलमध्ये २०० बकर्‍या अगदी पगारी कामगार आहेत याची अनेकांना माहिती पण नसेल. या बकर्‍या दररोज कामावर येतात आणि त्या बदल्यात त्यांना जेवण आणि पगार दिला जातो.

या बकर्‍यांचे काम म्हणजे गुगल कार्यालयातील विशाल लॉनवर हिंडणे आणि तेथे असलेले लुसलुशीत गवत दिवसभर चरत राहणे हे आहे. थोडक्यात काय तर, लॉन कापण्यासाठी या बकर्‍यांचा उपयोग केला जातो. 

या अशा कामामुळे बकर्‍यांचे पोट ही भरते आणि कंपनीचा लॉन कापण्याचा खर्च ही वाचतो. मशीनमुळे होणारे ध्वनी आणि वायुप्रदूषण टाळले जाते. त्याशिवाय लॉन कापायच्या  मशीनचा आवाज व धूर यामुळे कर्मचार्‍यांच्या तब्बेतीवर विपरीत परिणाम पण होत नाही. परिणामी बकऱ्यांमुळे गवत कापले सुद्धा जाते आणि प्रदूषण सुद्धा टाळले जाते.

गुगलला २००९ साली ही कल्पना सुचल्यानंतर तेव्हा पासून आजपर्यंत गुगल हा प्रयोग करत आहे. या बकऱ्या एका एजन्सीकडून मागवल्या जातात. बकऱ्यांचा सगळा पगार या एजन्सीला दिला जातो.

बकऱ्यांनी पार्क मधील फक्त गवत खावे यासाठी बकर्‍यांना लॉन मध्ये रांगेत चरण्याचे प्रशिक्षणही दिले जाते. ट्रेनिंग आणि त्यांच्या देखरेखीसाठी येथे प्रशिक्षित मेंढपाळही ठेवले गेले आहेत.

पण या कामासाठी बकर्‍यांना कामावर ठेवणारी गुगल ही पहिली कंपनी नाही. यापूर्वी याहू या कंपनीने सन २००० साली असेच त्यांच्या कंपनीच्या आवारातील लॉन मेंटेन ठेवण्यासाठी बकर्‍या तैनात केल्या होत्या.

– निवास उद्धव गायकवाड


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.