प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला कोणत्या ना कोणत्या नियमांत बदल केले जातात. पण १ एप्रिल हा दिवस खास असून या दिवसापासून नवे आर्थिक वर्ष ही सुरु होते. त्यामुळे सामान्य नियम नव्हे तर काही टॅक्स संबंधित काही नियमांत याच दिवशी बदल केले जातात. तर याच बद्दल अधिक जाणून घेऊयात. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी याच वर्षात फेब्रुवारी महिन्यात आपला अर्थसंकल्प सादर केला होता. तेव्हा आयकर संबंधित नियमांमध्ये व्यापक रुपात बदल करण्याची घोषणा केली होती. हे सर्व नियम १ एप्रिल २०२३ पासून लागू होणार आहेत. (1st April New Rules)
७.५ लाख रुपयांच्या उत्पन्नावर टॅक्स नाही
अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पात देशात नव्या कर व्यवस्थेअंतर्गत ७ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर टॅक्स लागणार नाही असे जाहीर केले होते. तर नव्या कर व्यवस्थेत सुद्धा ५० हजार रुपयांच्या मानक कपातीचा सुद्धा लाभ मिळणार आहे. अशा प्रकारे सर्व सामान्य व्यक्तीला ७.५ लाखांच्या उत्पन्नावर कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही.
नवी कर व्यवस्था होणार डिफॉल्ट
अर्थ मंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करताना असे म्हटले होते की, आतापासून नवी आयकर व्यवस्था एक डिफॉल्ट व्यवस्था असणार आहे. म्हणजेच जेव्हा आयकर विभागाच्या साइटवर इनकम टॅक्स रिटर्न फाइल करण्यासाठी जाणार असाल तेव्हा आधीपासूनच नवी कर व्यवस्था निवडलेली असणार आहे. दरम्यान तुम्ही जुनी कर व्यवस्था ही निवडू शकता.
हॉलमार्क संबंधित नियमात बदल
सरकारने सोन्याच्या हॉलमार्किंग बद्दलच्या नियमातील कंफ्युजन दूर करण्यासाठी आता यामध्ये एक युनिफॉर्मिटी आणण्याचा प्लॅन तयार केला आहे. त्यामुळे नवे नियम १ एप्रिल २०२३ पासून लागू होणार आहे. आता देशात ४ अंकी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन असणारे दागिने मिळणार नाहीत. तर केवळ ६ अंकी एचयूआय़ी असणारे दागिने खरेदी-विक्री केले जातील.
आधार-पॅन कार्ड अनिवार्य
जर तुम्ही ३१ मार्च २०२३ पर्यंत आधार कार्ड-पॅन कार्डला लिंक केले नसेल तर तुमचा पॅन क्रमांक निष्क्रिय होईल. (1st April New Rules)
घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ
सर्वसामान्यपणे संपूर्ण देशात प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला एलपीजी गॅस सिलिंडरचे दर वाढतात. कधी-कधी सरकार असे करत ही नाही. जसे फेब्रुवारी महिन्यात केले होते. मार्च मध्ये मात्र १४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ५० रुपये आणि कमर्शियल गॅस सिलिंडरची किंमत ३५० रुपयांनी वाढवली होती.
एमिशन संदर्भातील नियमात बदल
सरकार देशात १ एप्रिल २०२३ पासून बीएस-६ उत्सर्जन मानकांचा दुसरा टप्पा सुरु करणार आहे. त्यामुळे गाड्यांमध्ये काही बदल केले जाऊ शकतात. जसे की, दुचाकी वाहनांसठी ऑन बोर्ड डायग्नॉस्टिकचा दुसरा टप्पा सुरु होणार आहे. तर चारचाकी वाहनांसाठी रियल ड्रायविंग एमिशन आणि कॉर्पोरेट एवरेज फ्युल इकोनॉमीसारखे मानक लागू होतील.
हे देखील वाचा- मेडिकल इंन्शुरन्स क्लेमसाठी रुग्णालयात भर्ती होणे गरजेचे नाही, कंज्युमर फोरमचा मोठा निर्णय
वाहनांच्या किंमती वाढणार
पुढील महिन्याच्या १ तारखेपासून महागाई वाढणार आहे. त्यामुळे वाहनांच्या किंमतीत ही वाढ झाल्याचे दिसून येण्याची शक्यता आहे. हिरो मोटोकॉर्पने दुचाकीच्या मॉडलची किंमत २ टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा सुद्धा केली आहे.