गुजरातच्या विधानसभा निवडणूकीत पुन्हा एकदा भाजपचा दणदणीत विजय झाला आहे. भाजपने एक्झिट पोलच्या अंदाजानुसार खरोखर या निवडणूकीत बाजी मारली. भाजपला १५० हून अधिक जागांवर विजय मिळवता आला आहे. या विजयामुळे भाजपकडून जोरदार जल्लोष साजरा केला जात आहे. भाजपचा गुजरातच्या विधानसभेत विजय झाल्यानंतर काँग्रेस आणि आम आदमी पार्टीची वाईट स्थिती झाली आहे. गुजरात मध्ये गेल्या २७ वर्षांपासून सत्ता ही भाजपकडेच आहे. यंदा गुजरात मध्ये भाजपने विजयाचा रेकॉर्डच ब्रेक करणार आहे. यावेळी गुजरात मध्ये दोन टप्प्यांत मतदान झाले. मात्र मतदानाची टक्केवारी यावेळी थोडी घसरली गेली. पहिल्या टप्प्यात केवळ ६०.२ टक्के मतदान झाले तर दुसऱ्या टप्प्यात ६४.३९ टक्के लोकांनी मतदान केले. अशातच आम्ही तुम्हाला गुजरातच्या अशा एका मुख्यमंत्र्यांबद्दल सांगणार आहोत ज्यांचा भारत-पाकिस्तान युद्धाच्या कारणास्तव मृत्यू झाला होता. देशातील असे एकमेव मुख्यमंत्री आहेत ज्यांना पाकिस्तानच्या युद्धामुळे आपला जीव गमवावा लागला होता. (1965 War)
कोण होते ते मुख्यमंत्री
गुजरातमध्ये पंचायत राजचे पितामह बळवंत राय मेहता राज्याचे दुसरे मुख्यमंत्री झाले होते. १९६५ मध्ये झालेल्या पाकिस्तानची गोष्ट आहे. तत्कालीन मुख्यमंत्री बळवंत राय मेहता यांची १९ सप्टेंबर १९६५ रोजी अहमदाबाद येथे रॅली होती. त्याच वेळी जिल्ह्यातील ते मीठापुर येथे थांबले होते. तेथून पत्नी सरोजबेन, तीन असिस्टंट, गुजरात समाचारचे एक रिपोर्टर यांच्यासह हेलीकॉप्टरच्या माध्यमातून त्यांन कच्छच्या खाडीतील दक्षिणेला असलेल्या एका लहान विमानतळावर त्यांना पोहचायचे होते.

पाकिस्तानने हेलिकॉप्टरवर केला हल्ला
मुख्यमंत्री बळवंत राय यांचे हेलिकॉप्टर हवेत उड्डाण करत असतानाच पाकिस्तानला वाटले की, भारताचे एखादे विमान आपल्यावर हल्ला करणार आहे. यामुळेच कराचीतील मौरीपुर एयरबेस येथून फ्लाइट लेफ्टिनेंट बुखारी आणि फ्लाइंग अधिकारी कॅस हुसैन हे विविध फायटर विमानात बसले. याच दरम्यान, फ्लाइट लेफ्टिनेंट बुखारी यांच्या विमानात अचानक बिघाड झाल्याने ते परतले.(1965 War)
हे देखील वाचा- मंत्री पद सोडण्याच्या एका निर्णयामुळे ‘हा’ नेता भारतीय राजकरणाचा देव झाला
पाकिस्तानने हेलिकॉप्टरला निशाणा बनवले
याच दरम्यान दुसऱ्या विमानात असलेले फ्लाइंग अधिकारी कॅस हुसैन यांनी मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचा मागोवा घेण्यास सुरुवात केली. जेव्हा त्यांना कळले की, हे सैन्याचे नव्हे तर नागरिकाचे विमान आहे तेव्हा त्याची माहिती कंट्रोल रुमला दिली. त्याचवेळी कंट्रोल रुमने त्यांना हेलिकॉप्टरवर हल्ला करण्याचे आदेश दिले. हुसैन यांनी हेलिकॉप्टरवर हल्ला केला आणि त्यामध्ये असलेल्या मुख्यमंत्र्यांसह अन्य सर्व लोकांचा मृत्यू झाला.