जग अद्याप कोरोनाच्या महारोगातून व्यवस्थित बाहेर आलेले नाही अशातच आता नव्या महारोगाचा धोका सतावत आहे. वैज्ञानिकांच्या मते, ग्लोबल वॉर्मिगच्या कारणास्तव माणसांवर मोठा धोका निर्माण होणार आहे. संशोधकांच्या मते, ग्लोबल वॉर्मिंगच्या कारणास्तव जलवायु परिवर्तन वेगाने प्राचीन पर्माफ्रॉस्टला वितळवत आहे. असा दावा करण्यात आला आहे की, ग्लोबल वॉर्मिंगच्या कारणास्तव प्राचीन पर्माफ्रॉस्ट वितळण्याची घटनेने जवळजवळ दोन डझन विषाणुंना पुर्नजिवित केले आहे. हा व्हायरस माणसांसाठी धोका निर्माण करु शकतो. तर असा ही दावा केला गेला आहे की, या झऱ्याखाली ४८,५०० पेक्षा अधिक वर्षांपूर्वी जमा झालेला जॉम्बी व्हायरस (Zombie virus) आता जिवंत झाला आहे. हा व्हायरस माणसांसाठी नवा धोका निर्माण करण्याची शक्यता आहे.
रशियात जीवंत झालाय जॉम्बी व्हायरस
ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार, युरोपीय संशोधकांनी रशियातील सायबेरिया क्षेत्रात पर्माफ्रॉस्टचे काही प्राचीन नमूने एकत्रित केले आणि त्याचा तपास केला. रिपोर्टनुसार, वैज्ञानिकांनी १३ रोगजनक व्हायरसची विशेषता सांगत त्यांना जीवंत केले. त्यांना आता जॉम्बी व्हायरस असे सांगितले जात आहे. वैज्ञानिकांना असे आढळून आले की, काही शकतांपर्यंत जमिनीखाली बर्फात दाबून राहिल्यानंतर सुद्धा व्हायरचे संक्रमण निर्माण झाले.
४८,५०० वर्षांपासून बर्फाखाली दबला गेला होता व्हायरस
रिपोर्टनुसार, जुना व्हायरस ज्याला पॅंडोराव्हायरस येडोमा असे म्हटले जाते. त्याचे वय ४८,५०० वर्षांपेक्षा अधिक आहे. या व्हायरसने या टीमद्वारे २०१३ मध्ये शोधलेल्या व्हायरसचा ही रेकॉर्ड ब्रेक केला आहे. या व्हायरसचे वय ३० हजारांपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जात आहे. रिपोर्टमध्ये असे म्हटले गेले आहे की, हा प्राचीन व्हायरस पुन्हा एकदा जिवंत करण्यामुळे झाडं, पशु आणि माणसं यांना या रोगामुळे फार त्रास होऊ शकतो.
माणसांना-प्राण्यांना करु शकतो संक्रमित
रशिया, जर्मनी आणि फ्रांन्सच्या संशोधकांच्या टीमने असे म्हटले आहे की, त्यांच्या रिसर्चमध्ये व्हायरला पुर्नजिवीत करण्यासाठी जैविव जोखिम पूर्णपणे नगण्य होती, त्यांच्या लक्षित तणावांच्या कारणास्तव तो पुर्नजिवित झाला आहे. वैज्ञानिकांनी असे मानले आहे की, हा व्हायरस अत्यंत धोकादायक आहे. तो माणसांसह प्राण्यांना झाल्यास अधिक भयंकर स्थिती निर्माण होऊ शकते.(Zombie virus)
हे देखील वाचा- ‘झीरो कोविड पॉलिसी’मुळे चीनमध्ये वादळ…
ग्लोबल वार्मिंगच्या कारणास्तव वाढतोय धोका
वैज्ञानिक दीर्घकाळापासून इशारा देत आहेत की, ग्लोबल वार्मिंगच्या कारणास्तव जमलेला बर्फ वितळल्याने जववायू परिवर्तन बिघडेल. जर जमीन दबला गेलेला मिथेन विघटित झाल्यास त्याचा ग्रीनहाऊसवर परिणाम होईल. रिपोर्टमध्ये असे ही म्हटले आहे की, ग्लोबल वॉर्मिंगमुळे अशी शक्यता व्यक्त केली जात आहे की, प्राचीन परमाफ्रॉस्ट वितळल्याने अज्ञात व्हायरस सुद्धा बाहेर येतील.
वैज्ञानिक दीर्घकाळापासून इशारा देत आहेत की, ग्लोबल वार्मिंगच्या कारणास्तव जमलेला बर्फ वितळल्याने जववायू परिवर्तन बिघडेल. जर जमीन दबला गेलेला मिथेन विघटित झाल्यास त्याचा ग्रीनहाऊसवर परिणाम होईल. रिपोर्टमध्ये असे ही म्हटले आहे की, ग्लोबल वॉर्मिंगमुळे अशी शक्यता व्यक्त केली जात आहे की, प्राचीन परमाफ्रॉस्ट वितळल्याने अज्ञात व्हायरस सुद्धा बाहेर येतील.