सिनेमांमध्ये झॉम्बीला पाहणे हे सर्वांना आवडते. खरंतर हॉलिवूड मधील सिनेमांमध्ये ते सर्वाधिक दिसतात. बॉलिवूड मध्ये ही झॉम्बी संबंधित सिनेमा आला होता. मात्र आता अमेरिकेतील लोक खरोखर झॉम्बी बनत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तसेच त्यांचे व्हिडिओ ही सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. लोक ते व्हिडिओ पाहून हैराण झाले आहेत की नक्की हा काय प्रकार आहे? हे सर्व सध्या अमेरिकेत घडत आहे. (Zombie Drug)
पशूंना बेशुद्ध करण्यासाठी वापरले जाणारे जायलाजिन
असे सांगितले जात आहे की, अमेरिकेतील व्यक्तींने जे ड्रग्ज घेतले ते खरंतर पशूंना बेशुद्ध करण्यासाठी वापरले जाते. मात्र हे ड्रग व्यक्तींना झोंम्बी बनवत आहेत. या औषधाला ट्रँक आणि ट्रँक टोप अथवा झॉम्बी ट्रँक नावाने ओळखले जात आहे. याच्या वापरामुळे त्वचा सडण्यास सुरुवात होते. टाइम मॅगझिन मध्ये आलेल्या एका रिपोर्टनुसार, आता याचा वापर हिरोइन ड्रग्ज सारखा सिथेंटिक कटिंग एजेंटच्या रुपात वापर केला जात आहे. रिपोर्टनुसा, हे ड्रग्ज सर्वात प्रथम फिलाडेल्फियामध्ये जब्त करण्यात आले. त्यानंतर सॅन फ्रांसिस्को आणि लॉस एंजेलिस येथून संपूर्ण देशभरातील विविध शहरात त्याचा पुरवठा वाढला गेला.
व्यक्तींवर होतोय परिणाम
अमेरिकेतील फूड अॅन्ड ड्रग्ज अॅडमिनिस्ट्रेशनने जनावरांवर Xylazine च्या वापरासाठी परवानगी दिली होती. मात्र व्यक्तींसाठी हे ड्रग फार घातक ठरु शकते. या ड्रग्जच्या परिणांबद्दल बोलायचे झाल्यास याचा प्रभाव हा बेशुद्ध करणाऱ्या औषधाप्रमाणे होतो.
हे ड्रग्ज घेणाऱ्या लोकांना झोप येते, श्वास मंदावतो आणि त्याचसोबत त्वचेवर जखमा होऊ लागता. जो याचा वारंवार वापर करतो त्याला याचा सर्वाधिक त्रास होऊ शकतो. अशातच एक वेळ अशी येते की, व्यक्तीची त्वचा सडण्यास सुरुवात होते. परंतु जर योग्य उपचार मिळाले नाही तर व्यक्तीच्या शरिरातील तो अवयव कापावा लागू शकतो. सर्वाधिक चिंतेची बाब अशी की, हे औषध केवळ जनावरांसाठीच्या श्रेणीत ठेवण्यात आलेले नाही. रुग्णालयात याचा तपास ही केला जात नाही. तर न्युयॉर्क शहरातील आरोग्य विभागाने असे म्हटले की, २०२१ मध्ये झॉम्बी ड्रगच्या अधिक सेवनामुळे न्युयॉर्कमध्ये २६६८ लोकांचा मृत्यू झाला होता.(Zombie Drug)
हे देखील वाचा- ऑस्ट्रेलियात बनावट नावाने करायचा स्पर्म डोनेट, बनलाय ६० मुलांचा बाबा
दरम्यान, जाइलाजिन हे फेनटानिलसोबत मिळून ट्रँक डोप तयार केले जात आहेत. ज्यामुळे नशेत धुंद असलेल्या तरुणांकडून त्याचा वापर खुप वाढला गेला आहे. चिंतेचा विषय आहे की, अमेरिकेतील रस्त्यांवर ते अगदी सहज उपलब्ध होत आहे. स्काय न्यूज सोबत बातचीत केलेल्या एका २८ वर्षीय सॅम याने असे म्हटले की, ट्रंक मूळ रुपात लोकांच्या शरिराला झॉम्बीमध्ये बदलत आहे. त्यांनी असे म्हटले की, त्याने वयाच्या १४ व्या वर्षापासून मादक द्रव्यांचे सेवन केल्याने तो आता डिसऑर्डरचा सामना करत आहे.