Home » Zomato ची युपीआय सर्विस लॉन्च

Zomato ची युपीआय सर्विस लॉन्च

by Team Gajawaja
0 comment
Zomato
Share

ऑनलाईन फूड डिलिवरी पार्टनर झोमॅटोवरुन (Zomato) आपण प्रत्येकजण ऑर्डर करतो. काहीजण कॅश ऑन डिलिव्हरीचा ऑप्शन निवडतात तर काही ऑनलाईन पेमेंट. परंतु जेव्हा ऑनलाईन पेमेंटचा ऑप्शन निवडला जातो तेव्हा गुगल पे अथवा फोन पे वर तुम्हाला रिडायरेक्ट केले जाते. पण आता असे होणार नाहीय. कारण झोमॅटोने भारतात आपल्या काही युजर्ससाठी युपीआय सर्विस सुरु केली आहे. ही सुविधा देणारी झोमॅटो हा पहिलाच ऑनलाईन फूड आणि ग्रोसरी डिलिवरी अॅप बनला आहे. झोमॅटोने युपीआय सर्विसची सुविधा देण्यासाठी आयसीआयसीआय बँकेसोबत पार्टनरशीप केली आहे. त्याचसोबत झोमॅटोने आपल्या युजर्ससाठी युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसाठी थर्ट पार्टी प्रोवाइरच्या रुपात लाइव्ह झाले आहेत.

झोमॅटोचे युजर्सला अॅपवर नवे युपीआय आयडी तयार करण्यासाठी साइन अप करावे लागणार आहे. यामुळे असे होणार आहे की, ते झोमॅटोच्याच माध्यमातून फूड ऑर्डर करतील आणि तेथूनच त्यांना पेमेंट करता येईल. पेटीएम, गुगल पे आणि फोनपे सारख्या अन्य युपीआय आयटीवर रिडायरेक्टर करावे लागणार नाही.

Zomato UPI असे करा अॅक्टिव्हेट
-आपल्या डिवाइसवर Zomato App सुरु करा
-येथे प्रोफाइल सेक्शनवर क्लिक करा
-जो पर्यंत तुम्हाला झोमॅटो युपीआयचा ऑप्शन मिळत नाही तो पर्यंत खाली स्क्रोल करत रहा
-अॅक्टिव्हेट झोमॅटो युपीआयवर क्लिक करा
-आपल्या आवडीचा झोमॅटो युपीआय आयडी निवडा
-आपला मोबाईल क्रमांक निवडा
-मोबाईल क्रमांकाशी संबंधित आपले बँक खाते लिंक करा (Zomato)

झोमॅटो युपीआय लॉन्च करत कंपनी आपले लक्ष्य कॅश ऑन डिलीवरी ऑर्डरवरील आपली निर्भरता कमी करणार आहे. कॅश ऑन डिलिवरीसाठी आव्हानात्मक आहे आणि कॅश सांभाळण्यासाठी अतिरिक्त खर्च येतो. त्यामुळेच झोमॅटोने अशा मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी आणि आपल्या ग्राहकांना एक सोप्प्या पेमेंटची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी युपीआयची सेवा सुरु केलीय.

हेही वाचा- केवळ कोल्ड ड्रिंकवर जगतीये ‘ही’ व्यक्ती

झोमॅटोने ई-वॉलेट, पेमेंट गेटवे सेवा आणि इतर यांसारख्या डिजिटल पेमेंट सेवांना सहकार्य करण्यासाठी ऑगस्ट 2021 मध्ये झोमॅटो पेमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक उपकंपनी सुरु केली होती. स्विगीने २०२० मध्ये आपल्या डिजिटल वॉलेट, स्विगी मनीला लॉन्च करत आयसीआयसीआय बँकेसोबत हातमिळवणी केली होती. झोमॅटोकडे २०२२ मध्ये ५८ मिलियन वार्षिक युजर्स होते. एनपीसीआय युपीआय नेटवर्कला नियंत्रित करतात. वॉलमार्टचे मालकी हक्क असणाऱ्या फोनपे आणि गुगल पे वर डिपेंसी कमी करण्यासाठी एनपीसीआय दुसऱ्या इंटरनेट कंपन्यांना नेटवर्कमध्ये आणत युपीआय क्षेच्रात विविधता आणण्याचा प्रयत्न करत आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.