ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटो लिमिडेटचे को-फाउंडर आणि चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर गुंजन पाटीदार यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कंपनीने शेयर बाजाराला दिलेल्या सुचनेत असे म्हटले की, पाटीदार झोमॅटोच्या सुरुवातीच्या काही कर्मचाऱ्यांचा समावेश होता आणि त्यांनी कंपनीसाठी कोर टेक्नॉलॉजी सिस्टिमची निर्मिती केली होती. झोमॅटोने असे म्हटले आहे की, कंपनीला पुढे वाढवण्याचे त्यांचे योगदान अमूल्य राहिले आहे. (Zomato Co-Founder Resign)
यापूर्वी सुद्धा काहींनी राजीनामे दिले
दरम्यान, कंपनीने त्यांच्या राजीनाम्याबद्दल अधिक माहिती दिलेली नाही. गेल्या वर्षात नोव्हेंबर मध्ये कंपनीचे आणखी एका को-फाउंडर, मोहित गुप्ता यांनी राजीनामा दिला होता. गुप्ता साडेचार वर्षापूर्वी झोमॅटोमध्ये सहभागी झाले होते. त्यांना २०२० मध्ये कंपनीच्या खाद्य वितरण व्यवसायच्या सीईओ पदावरुन प्रमोशन देत सह-संस्थापक बनवण्यात आले होते.
मोहित गुप्ता यांनी साडे चार वर्ष झोमॅटो मध्ये काम केल्यानंतर कंपनी सोडली. त्याच महिन्यात झोमॅटोचे नवे प्रोग्रामचे हेड आणि माजी फूड डिलिव्हरी चीफ राहुल गांजू यांनी सुद्धा राजीनामा दिला होता. तर त्यांच्या इंटरसिटी लेडेंड्स सर्विसचे हेड यांनी एका आठवड्यापूर्वी कंपनी सोडण्याची घोषणा केली होती.
कंपनीचा सेल उत्तम राहिला नाही
नुकत्याच ऑनलाईन फूड एग्रीगेटर झोमॅटोने कंपनीच्या स्टाफमधील तीन टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्यास सुरुवात केली होती. कंपनीने असे म्हटले होते की, हा निर्णय रेग्युरल परफॉर्मेंन्सच्या आधारावर घेतला गेला. सप्टेंबर तिमाहीसाठी झोमॅटोचा एकूण तोटा कमी होऊन २५०.८ कोटी रुपयांवर पोहचला होता. गेल्या आर्थिक वर्षाच्या तिमाहीत कंपनीचा तोटा ४३४.९ कोटी रुपये होती. याच दरम्यान कंपनीचे ऑपरेशंन्समुळे रेवेन्यू ६२.२० टक्के वाढून १६६१.३ कोटी रुपये झाला आहे.
हे देखील वाचा- फ्रोजन भाज्यांचा वापर करत असाल तर कधीच करु नका ‘ही’ चूक
कंपनीच्या फूड डिलिव्हरी बिझेनेस सप्टेंबर तिमाहीचा सेल्स केवळ २२ टक्क्यांनी वाढला होता. तर गेल्या वर्षाच्या तुलनेत समान तिमाही ५४१० कोटी रुपयांनी वाढून ६६३१ कोटी रुपये झाला होता.(Zomato Co-Founder Resign)
दरम्यान, नव्या वर्षाच्या वेळी खुप ऑर्डर पाहता कंपनीचे फाउंडर आणि सीईओ दीपेंदर गोयल यांना सुद्धा फूड डिलिवरी एजेंट बनावे लागले होते. गोयल यांनी ३१ डिसेंबरला ट्विटरवर माहिती दिली की, त्यांनी स्वत:हून कशा पद्धतीने ऑर्डर देण्यास गेले. त्याचसोबत आता मी स्वत:च्या मनाने फूड डिलिव्हरी करण्यात जात असल्याचे ही म्हटले होते.