Home » Johran Mamdani : जोहरन ममदानी न्यूयॉर्कचे महापौर झाले !

Johran Mamdani : जोहरन ममदानी न्यूयॉर्कचे महापौर झाले !

by Team Gajawaja
0 comment
Johran Mamdani
Share

भारतीय वंशाचे डेमोक्रॅटिक उमेदवार जोहरान ममदानी यांनी न्यू यॉर्क शहराच्या मेयरच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर संपूर्ण जगभर त्यांच्या विजयाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.कारण नुकत्याच पार पडलेल्या अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील महापौर पदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.  (Zohran Mamdani)

भारतीय चित्रपट निर्मात्या मीरा नायर यांचा मुलगा असलेले जोहरान ममदानी हे निश्चित विजयी होणार, असा अंदाज आहे. हे ममदानी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रमुख विरोधक आहेत. २००२ च्या गुजरात दंगलींमध्ये मुस्लिमांवरील हिंसाचारासाठी मोदी जबाबदार असल्याचे वादग्रस्त विधान त्यांनी केले होते. शिवाय अलिकडेही प्रचारादरम्यान त्यांनी मोदींविरोधात वक्तव्य केल्यानं मोठा गदारोळ उठला होता. मात्र या ममदानींना डोनाल्ड ट्रम्प यांचा विरोध आहे. त्यांनी थेट धमकी दिली आहे की, ममदानी न्यू यॉर्कचे महापौर झालेच तर मी शहाराला देण्यात येणारा निधी बंद करणार आहे. (International News)

ममदानी डेमोक्रॅटिक पक्षाकडून महापौरपदाची निवडणूक लढवत असले तरी त्यांची उमेदवारीही अशा अनेक कारणांनी सुरुवातीपासून वादग्रस्त ठरली. त्यांची सीरियन पत्नी रामा दुवाजी हिच्यावरही अनेक आरोप आहेत. त्यामुळे सुरुवातीपासून ममदानी यांची उमेदवारी वादग्रस्त ठरली तरी त्यांना मिळणारा पाठिंबा मोठा आहे. स्थलांतरितांना अनेक मोफत योजनांचा फायदा मिळवून देणारे ममदानी याच स्थलांतरितांच्या मतावर न्यूयॉर्कचे महापौर होण्याची शक्यता अधिक आहे. असे झाल्यास ते न्यूयॉर्क शहराचे सर्वात तरुण आणि पहिले मुस्लिम महापौर असतील. जगभरातील प्रमुख देशांच्या निवडणुका जेवढ्या गाजतात, तेवढीच चर्चा आता अमेरिकेच्या न्यू यॉर्कच्या महापौरपदाची होत आहे. या निवडणुकीसाठी मतदान सुरु झाले असून यात जोहरान ममदानी, अँड्र्यू कुओमो आणि कर्टिस स्लिवा यांच्यात लढत होत आहे. भारतीय वंशाचे ममदानी हे प्रसिद्ध चित्रपट निर्माते मीरा नायर आणि लेखक महमूद ममदानी यांचे पुत्र आहेत. (Zohran Mamdani)

जूनमध्ये झालेल्या डेमोक्रॅटिक प्रायमरीमध्ये ममदानी यांनी कुओमोचा पराभव केला. न्यू यॉर्क शहरात रँक-चॉइस मतदान प्रणाली आहे. मतदार आपल्या पसंतीच्या तीन उमेदवारांचा क्रम निश्चित करतात. या उमेदवारांना ५०% पेक्षा जास्त मते मिळाल्यावर विजयी उमेदवाराची घोषणा करण्यात येते. मतदानानंतर २ दिवसात प्राथमिक निकाल जाहीर होतो. मात्र अंतिम निकाल जाहीर होण्यासाठी एक आठवड्याचा कालावधी लागतो. आत्तापर्यंत झालेल्या सर्वेक्षणामध्ये ममदानी विजयी होण्याची शक्यता अधिक आहे. ममदानीच्या विरोधात दोन उमेदवार आहेत. न्यू यॉर्कचे माजी गव्हर्नर अँड्र्यू कुओमो, हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. ममदानी जिंकले तर शहरातील व्यवसाय उद्ध्वस्त करतील असा कुओमो यांचा दावा आहे. तर रिपब्लिकन उमेदवार कर्टिस स्लिवा हे सुद्धा ममदानींच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. (International News)

स्लिवा यांनीही ममदानी जिंकल्यास न्यू यॉर्कमध्ये स्थलांतरितांचे राज्य येईल, असा दावा केला आहे. न्यूयॉर्क सारख्या अमेरिकेच्या प्रमुख शहराचे भावी महापौर म्हणून ज्यांचा उल्लेख होत आहे, ते ममदानी हे राजकारणात येण्यापूर्वी हिप-हॉप रॅपर होते. त्यांचे सर्वात प्रसिद्ध गाणे, “कांडा”, युगांडामध्ये व्हायरल झाले. या गाण्यात युगांडाची राजधानी कंपालातील जीवन आणि तरुणांसमोरील आव्हानांचे चित्रण केले आले. महाविद्यालयीन शिक्षणानंतर त्यांनी स्थलांतरित, भाडेकरू आणि ब्लॅक लाईव्ह्स मॅटर यांच्या चळवळींमध्ये भाग घेतला. २०१७ मध्ये, ममदानीनी डेमोक्रॅटिक पक्षासोबत त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. २०२० मध्ये, ते न्यू यॉर्क राज्य विधानसभेवर निवडून आले आणि २०२२ आणि २०२४ मध्ये त्यांनी बिनविरोध निवडणुका जिंकल्या. भाडे मर्यादांशी संबंधित विधेयक त्यांनी संसदेत मांडले. त्यामुळे ते शहरातील मध्यमवर्गीय आणि स्थलांतरित वस्तींमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले. सीरियन-अमेरिकन कलाकार रामा दुवाजी हिच्याबरोबर ममदानी यांनी लग्न केले आहे. (Zohran Mamdani)

अर्थात ममदानी यांचे विरोधक याच सर्व कारणांमुळे त्यांच्यावर टीका करत आहेत. ममदानी शहरातील श्रीमंतावर नवीन कर लादून निधी गोळा करण्याचा प्रस्ताव आणू इच्छितात. ममदानी यांच्या याच धोरणामुळे ट्रम्प यांनी ममदानीला वेडा कम्युनिस्ट म्हटले आहे. न्यूयॉर्क हे अमेरिकेच्या श्रीमंतांचे घर म्हणून ओळखले जाते. येथे व्यापारी वर्गाची संख्या मोठी आहे. अनेक व्यापा-यांनी ममदानींचा विजय निश्यित झाल्यावर न्यूयॉर्क शहर सोडून जाण्याची तयारीही केल्याची माहिती आहे. न्यूयॉर्क शहराला अमेरिकेचे हृदय म्हटले जाते. अमेरिकेतील सर्वात प्रभावशाली राजकीय पदांपैकी हे एक पद आहे. न्यूयॉर्कचा वार्षिक जीडीपी अंदाजे $2.3 ट्रिलियन आहे. न्यूयॉर्क शहर हे भारताच्या जीडीपीच्या निम्म्याहून अधिक भागाचे प्रतिनिधित्व करते. (International News)

================

हे देखील वाचा : Zohran Mamdani : ट्रम्पच्या नाकावर टिच्चून भारतीय वंशाचे जोहरान ममदानी बनले न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर

================

न्यूयॉर्कच्या महापौराच्या हातात शहराचे प्रशासन, पोलिस, वाहतूक, गृहनिर्माण, शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था येते. ममदानींसारख्या स्थलांतरितांना पाठिंबा देणा-याच्या ताब्यात हे पद आले तर ट्रम्प यांच्या अमेरिका फर्स्ट या धोरणालाही त्याचा मोठा फटका बसणार आहे. न्यूयॉर्क मध्ये वॉल स्ट्रीट, जगातील मीडिया कंपन्या आणि संयुक्त राष्ट्रांचे मुख्यालय आहे. म्हणूनच या शहराच्या महापौराला लहान देशाचा पंतप्रधानही म्हटले जाते. अशा महत्त्वाच्या पदावर ममदानी आले तर या शहराच्या विकासाला खिळ बसणार असल्याचा दावा कऱण्यात येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर न्यूयॉर्क शहरातील मतदारांना इशाराच दिला आहे. जर ममदानी महापौर झाले तर न्यू यॉर्क, आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या पूर्णपणे उद्ध्वस्त होईल. त्यामुळे मतदारांनी आपल्या भविष्यासाठी मतदान करा, असे ट्रम्प यांनी सांगितले आहे. पुढच्या काही दिवसातच ममदानी जिंकणार की हरणार हे स्पष्ट होणार आहे. (Zohran Mamdani)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.