काही वेळेस असे होते की. आपल्याला पैशांची खुप गरज भासते पण आपल्याला खात्यात पैसेच नसतात. म्हणजेच खात्यात झिरो बॅलेंन्स असतो. त्यामुळे अशावेळी नक्की काय करावे हे कळत नाही म्हणून आपण पैसे हे एखाद्याकडून उधार घेतो. परंतु तुम्हाला उधार पैसे कसे मागायचे याची सुद्धा लाज वाटत असेल तर घाबरु नका यावर ही एक सोप्पा तोडगा आहे. खरंतर तुम्ही खात्यात झिरो बॅलेंन्स असला तरीही ओव्हरड्राफ्टच्या सुविधेचा फायदा घेऊ शकता. तर जाणून घेऊयात ओव्हरड्राफ्ट सुविधेचा वापर करुन तुम्ही पैसे कसे मिळवू शकता.(Zero balance in account)
ओव्हऱड्राफ्ट ही सुविधा एक लहान काळासाठी कर्जाप्रमाणे समजली जाते. त्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या खात्यातील पैसे काढू शकता. जरी तुमचा बँकेचा बॅलेंन्स झिरो असेल तरी सुद्धा. जवळजवळ सर्व शासकीय आणि खासगी बँकांमध्ये ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळते. बहुतांशकरुन बँकांमध्ये ही सुविधा करंट खाते, सॅलरी अकाउंट किंवा फिक्स्ड डिपॉझिटवर दिली जाते. काही बँकांमध्ये शेअर, बॉन्ड, सॅलरी, इंन्शुरन्स पॉलिसी, घर, संपत्ती सारख्य़ा गोष्टींवर ही ओव्हरड्राफ्ट मिळतो.
किती असते ओव्हरड्राफ्टची मर्यादा
ओव्हरड्राफ्टसाठी तुम्हाला किती रक्कम मिळाली हे तुम्ही काय गहाण ठेवले आहे त्याच्यावर अवलंबुन असते. ओव्हरड्राफ्टसाठी बँकेकडे काही ना काही तरी गहाण ठेवावे लागते. जसे की, फिक्स्ड डिपॉजिट किंवा अन्य मौल्यवान वस्तू. याच आधारावर तुमचे व्याज ही ठरले जाते. जर बँकेत तुमची २ लाखांची एफडी आहे. तर जवळजवळ १.५० लाखांपर्यंत तुम्हाला ओव्हरड्राफ्ट मिळते. शेअर, बॉन्ड आणि डिबेंचरच्या प्रकरणांमध्ये ही रक्कम कमी जास्त होऊ शकते.
हे देखील वाचा- वीजेच्या अधिक बिलामुळे त्रस्त आहात? ‘हा’ बदल करुन पहा
कर्जाप्रमाणेच तुम्हाला अप्लाय करावे लागते
सर्वसाधारणपणे बँक आपल्या ग्राहकांना मेसेज किंवा ई-मेलच्या माध्यमातून तुम्ही ओव्हरड्राफ्टची सुविधा घेऊ शकता की नाही हे सांगते. बँकेकडून दिल्या जाणाऱ्या या ओव्हरड्राफ्टची मर्यादा ही आधिच ठरवण्यात आलेली असते. आपत्कालीन काळात जर पैशांची गरज असेल तर बँकेत ओव्हरड्राफ्टसाठी सुद्धा एखाद्या कर्जाप्रमाणे अप्लाय करावे लागते. ओव्हरड्राफ्ट अंतर्गत बँकेकडून तुम्हाला गरजेचे वेळी पैसे जरुर मिळतील. पण लक्षात असू द्या की सुविधा सुद्धा एखाद्या कर्जाप्रमाणेच असून त्यावरचे व्याज ही तुम्हाला द्यायचे आहे.(Zero balance in account)
कोणासोबत मिळून घेऊ शकता ओव्हरड्राफ्टच्या सुविधेचा लाभ
ओव्हरड्राफ्टची सुविधा ही एखाद्या सोबत मिळून जॉइंटमध्ये सुद्धा केले जाऊ शकते. अशातच पैसे फेडण्याची जबाबदारी फक्त तुमच्यावरच नसेल. दरम्यान, जर तुम्ही पैसे फेडू शकला नाहीत तर तुम्हाला दुसऱ्याला संपूर्ण रक्कम द्यावी लागते. या व्यतिरिक्त तुम्ही ओव्हरड्राफ्टचे पैसे न दिल्यास तर तुम्ही गहाण ठेवलेले सामान हे बँक आपल्याकडे ठेवते. त्याचसोबत ओव्हरड्राफ्टची रक्कम जर तुम्ही गहाण ठेवलेल्या सामानाच्या किंमतीपेक्षा अधिक असेल तर तरीही तुम्हाला पैसे बँकेला द्यावे लागणार आहेत. ओव्हरड्राफ्टची सुविधा ही सॅलरी अकाउंट असलेल्या लोकांना अगदी सहज मिळते. त्यासाठी तुम्ही नियमित ६ सॅलरी या क्रेडिट झाल्याचे दाखवावे लागले. त्याचसोबत एफडीवर सुद्धा तुम्हाला ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळू शकते.