प्रत्येक व्यक्तीसाठी तिच्या कामाबद्दल मिळणारी शाबासकी खूपच महत्वाची असते. ऑफिसमधील कामासाठी असो किंवा घर कामासाठी ही शाबासकी त्या व्यक्तीला अधिक चांगल्या कामासाठी प्रेरणा देते. कलाकारांसाठी देखील अशी शाबासकी गरजेची असते. प्रेक्षकांकडून प्रत्येक कलाकाराला तोंडी कौतुकाचे शब्द मिळतच असतात. मात्र यासोबतच एक पुरस्कार ट्रॉफी देखील आवश्यक असते. कलाकारांच्या कामाचा कौतुक सोहळा म्हणजे पुरस्कार सोहळा. चित्रपट, नाटक, मालिका अशा सर्वच माध्यमातील कलाकृतींची पुरस्कार सोहळे संपन्न होतात. या सोहळ्यांमध्ये कलाकरांना त्यांच्या कामाची पोच पावती दिली जाते.
असाच एक मोठा आणि प्रेक्षकांकडून नेहमीच प्रेम मिळवणारा एक पुरस्कार सोहळा संपन्न झाला. झी मराठी वाहिनीचा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित असणारा ‘झी मराठी पुरस्कार’ मोठ्या दणक्यात पार पडले. कायमच हे पुरस्कार प्रेक्षकांच्या खूप जवळचे राहिले आहे. यंदा हे पुरस्कार खूपच खास होते. कारण वाहिनीचे हे २५ वर्ष होते. झी मराठी सुरु होऊन २५ वर्ष झाल्याने यंदाच्या पुरस्कारांवर या रौप्य महोत्सवाची छाप दिसून आली. सोबतच झी ची पहिली मालिका असलेल्या ‘आभाळमाया’ या मालिकेचे देखील हे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने ते देखील विशेष सेलिब्रेशन यावेळी झाले.
झी च्या या सोहळ्यांमध्ये मराठी कलाविश्वातील अनेक दिग्गज कलाकारांना आमंत्रित करण्यात आले होते. सर्वच कलाकारांनी त्यांच्या झी च्या आठवणींना उजाळा देत त्यांचे आणि झी चे नाते कसे खास आहे याबद्दल भावना व्यक्त केल्या. वाहिनीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने यंदाचा ‘झी मराठी पुरस्कार’ सोहळा दोन दिवस साजरा करण्यात आला. चला तर जाणून घेऊया यंदाच्या झी पुरस्कार विजेत्या कलाकारांबद्दल.
‘झी मराठी’ पुरस्कार सोहळा भाग – १ विजेते
– सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री – दुर्गा ( नवरी मिळे हिटलरला )
– सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष – प्रितम ( पारू )
– सर्वोत्कृष्ट मैत्री – शिवा, पाना गँग ( शिवा )
– सर्वोत्कृष्ट आजी – बाई आजी ( शिवा )
– सर्वोत्कृष्ट बालकलाकार – अमोल, गनी, बनी, चिनू-मनू, बटर
– सर्वोत्कृष्ट सासरे – रामभाऊ ( शिवा )
– सर्वोत्कृष्ट जावई – ए.जे. ( नवरी मिळे हिटलरला )
– झी मराठी रायझिंग स्टार – सूर्या दादा ( लाखात एक आमचा दादा )
– सर्वोत्कृष्ट मुलगी – पारू ( पारू )
– सर्वोत्कृष्ट मुलगा – अधिपती ( तुला शिकवीन चांगलाच धडा )
– सर्वोत्कृष्ट सून – लीला ( नवरी मिळे हिटलरला )
– सर्वोत्कृष्ट सासू – लीला ( नवरी मिळे हिटलरला )
– विशेष लक्षवेधी चेहरा – लीला ( नवरी मिळे हिटलरला )
– ‘झी मराठी’ जीवनगौरव पुरस्कार – श्रीरंग गोडबोले
– सर्वोत्कृष्ट शायनिंग पुरस्कार – भुवनेश्वरी ( तुला शिकवीन चांगलाच धडा )
– Zee 5 लोकप्रिय व्यक्तिरेखा पुरुष – आशू ( शिवा )
– Zee 5 लोकप्रिय व्यक्तिरेखा स्त्री – पारू ( शिवा )
– Zee 5 लोकप्रिय मालिका – शिवा
– विशेष योगदान पुरस्कार – संदीप रसाळ
‘झी मराठी’ पुरस्कार सोहळा भाग – २ विजेते
– सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा स्त्री – दामिनी ( पारू )
– सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा पुरुष – चंदन ( शिवा )
– सर्वोत्कृष्ट बाबा – आकाश ( पुन्हा कर्तव्य आहे )
– सर्वोत्कृष्ट आई – अहिल्यादेवी ( पारू )
– सर्वोत्कृष्ट बहीण – तेजश्री, धनश्री, भाग्यश्री, राजश्री ( लाखात एक आमचा दादा )
– सर्वोत्कृष्ट दादा – सूर्या दादा ( लाखात एक आमचा दादा )
– सर्वोत्कृष्ट खलनायिका – भुवनेश्वरी ( तुला शिकवीन चांगलाच धडा )
– सर्वोत्कृष्ट खलनायक – डॅडी ( लाखात एक आमचा दादा )
– विशेष सन्मान – मालिका आभाळमाया
– सर्वोत्कृष्ट अनुरुप जोडी – एजे आणि लीला ( नवरी मिळे हिटलरला )
– सर्वोत्कृष्ट लोकप्रिय जोडी – अप्पी आणि अर्जुन ( अप्पी आमची कलेक्टर )
– सर्वोत्कृष्ट नायिका – शिवा ( शिवा मालिका )
– सर्वोत्कृष्ट लोकप्रिय नायिका – अप्पी ( अप्पी आमची कलेक्टर )
– सर्वोत्कृष्ट नायक – आदित्य ( पारू )
– सर्वोत्कृष्ट लोकप्रिय नायक – एजे ( नवरी मिळे हिटलरला )
– लोकप्रिय कुटुंब – एजे कुटुंब ( नवरी मिळे हिटलरला )
– सर्वोत्कृष्ट कुटुंब – किर्लोस्कर कुटुंब ( पारू )
– लोकप्रिय मालिका – नवरी मिळे हिटलरला
– सर्वोत्कृष्ट मालिका – पारू