भारतातून फरारी घोषित करण्यात आलेला झाकीर नाईक सध्या पाकिस्तान सरकारचा पाहुणचार झोडत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान आणि त्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ झाकीर नाईकचे स्वागत करण्यात गुंग आहेत. त्याच्यासाठी खास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. मात्र पाकिस्तानचे सरकार जरी झाकीरच्या स्वागतामध्ये मशगुल असले तरी पाकिस्तानी जनतेनं झाकीर नाईकला त्याची जागा दाखवण्यात कुठेही कमी केले नाही. झाकीरचे आत्तापर्यंत जे जे कार्यक्रम झाले आहेत, त्यामध्ये त्याच्यावर टिका करण्यात आली आहे. जाहीर परिसंवादात त्याला असे काही प्रश्न विचारण्यात आले की झाकीर नाईकही काही क्षण स्तब्ध झाला. शेवटी यातून मार्ग काढण्यासाठी त्यानं पुन्हा धर्माबाबत त्याच्या जहरी बोलांचा आधार घेतला. (Zakir Naik)
पण झाकीर नाईकला पाकिस्तानी जनतेचा पाठिंबा मिळेल असा जो अंदाज होता, तो साफ चुकल्याचे यातून स्पष्ट होत आहे. काही कार्यक्रमात तर झाकीर नाईकला पाकिस्तानी नागरिकांनी अक्षरशः शिव्या दिल्या आहेत. एवढेच नाही तर भारतानं झाकीर सारख्या अडाणी माणसाला आपल्या देशात बंदी घातली हे खूप चांगले केले आहे, याला पाकिस्तानात कधीही बोलवू नका अशी ओरड तेथील सोशल मिडियातही सुरु झाल्यानं झाकीर हैराण झाला आहे. त्यामुळे झाकीरनं आपला हा पाकिस्तानी दौरा आवरता घेतल्याची बातमी आहे. (International News)
भारतातून फरार झालेला झाकीर नाईक मोठ्या ऐटीत पाकिस्तानात दाखल झाला. त्याचे स्वागत करण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफही हजर होते. झाकीरच्या उपस्थितीत अनेक कार्यक्रम आयोजीत केले आहेत. या कार्यक्रमातून झाकीरनं केलेल्या विधानांना मात्र पाकिस्तानी जनतेनं विरोध केला आहे. झाकीरला पाकिस्तानच्या सोशल मिडियातून आरसा दाखवण्यात आला आहे. झाकीरच्या स्वागतासाठी जो पहिला कार्यक्रम झाला, त्यातही झाकीरनं त्याच्या स्वभावाप्रमाणे खूप नाटक केले. या क्रार्यक्रमात मंचावर ज्या महिला होत्या, त्यांना अपमानास्पद वागणूक दिली. त्यामुळे काही क्षण पाकिस्तानचे पंतप्रधानही गोंधळलेले दिसले. यापासूनच पाकिस्तानी मिडीयामध्ये त्याला ट्रोल करण्यात येऊ लागले आहे. (Zakir Naik)
त्यात झाकीरच्या वादग्रस्त वक्तव्यांनी अधिक भर टाकली आहे. झाकीर पाकिस्तान सरकारच्या आमंत्रणातून गेले आहेत. मात्र सरकारी पाहुणे असूनही विमान कंपन्यांनी त्यांच्या सामानाचे पैसे वसूल केले. याबाबत झाकीरनं जाहीर कार्यक्रमात नाराजी व्यक्त केली. तसेच भारतात माझी अशी अडवणूक केली नसती असेही लिहिले. यावर त्याला पाठिंबा मिळण्याऐवजी, अशा अडाणी लोकांना इस्लामाबादमध्ये कशाला बोलवले आहे, असेच प्रश्न विचारण्यात येत आहेत. त्यानंतर झाकीरनं एका सभेत महिलांबाबात आक्षेपार्ह विधान केलं. एकतर विवाहित पुरुषाशी लग्न करा किंवा बाजारी औरत व्हा. या त्याच्या वक्तव्यामुळे पाकिस्तानी तरुणवर्गानं त्याला चांगलेच फैलावर घेतले आहे. शिवाय महिला संघटनांनीही त्याच्यावर टिका केली आहे. (International News)
शिवाय भारतानं या व्यक्तीला खूप काळ सहन केलं, आणि शेवटी त्याच्यावर बंदी का आणली हे आत्ता समजलं असेही लिहिण्यात आले आहे. झाकीर नाईक सारख्या व्यक्तीला व्हीआयपी वागणूक दिल्याबद्दल आणि त्याला असहिष्णुता, कट्टरता पसरवण्याची परवानगी दिल्याबद्दल आमच्या नेत्यांना लाज वाटली पाहिजे असे तिखट बोलही काढण्यात येत आहेत. एका व्यक्तीनं तर झाकीरला ज्यांनी आमंत्रित केले आहे, त्यांनी पुन्हा त्याला बोलवू नये, झाकीरला विशेष सवलती हव्या आहेत आणि कोणताही खरा इस्लामी धर्मोपदेशक कधीही विशेष सवलतींची मागणी करणार नाही असे सांगून झाकीरच्या ज्ञानावरच आक्षेप घेतला आहे. झाकीरच्या एका सभेत एका पश्तून मुलीने तिच्या परिसरात पसरलेल्या वाईट गोष्टींबाबत प्रश्न विचारला. आपल्या परिसरातील नागरिक धर्माचे पालन करतात पण तरीही आपल्या भागात मारामा-यांचे प्रमाण वाढले असून लोक वाईट प्रवृत्तीकडे अधिक ओढले गेल्याचे सांगितले. असे का होते, असा प्रश्न या मुलीनं झाकीरला विचारल्यावर झाकीर भर सभेत या तरुणीवर चिडला. त्यानं उलट त्या मुलीलाच खोटा प्रश्न विचारल्याबद्दल माफी माग म्हणून ओरडायला सुरुवात केली. झाकीरचा हा व्हिडिओही पाकिस्तानात चांगलाच व्हायरल झाला आहे. (Zakir Naik)
======
हे देखील वाचा : पाकिस्तानी भिका-यांना आवरा
======
या धर्मउपदेशकाला सध्या प्रश्नांचेही उत्तर देता येत नसल्याची टिका त्याच्यावर करण्यात आली. झाकीरचा हा पाकिस्तान दौरा 28 ऑक्टोबरपर्यंत आहे. मात्र त्याच्यावर होत असलेल्या टिकेमुळे तो हा दौरा लवकर आटोपण्याच्या तयारीत आहे. झाकीर नाईक हा भारतातील वाँटेड फरारी असून तो अनेक वर्षांपासून मलेशियामध्ये राहत आहे. भारतात एनआयए ने त्याच्यावर बेकायदेशीर कृत्यांमध्ये गुंतल्याचा आणि धार्मिक द्वेषाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला. तेव्हापासून नाईक फरार झाला. त्याला मलेशियाच्या सरकारने आश्रय दिला आहे. (International News)
सई बने