सध्या क्रिकेटमध्ये जितक्या चर्चा रेकॉर्ड्सच्या होत आहेत, तितक्याच चर्चा घटस्फोटांच्याही होत आहेत. जवागल श्रीनाथ नंतर घटस्फोटांची ही मालिका रवी शास्त्री, विनोद कांबळी, दिनेश कार्तिक, मुहम्मद शमी, हार्दिक पांड्या, वीरेंद्र सेहवाग आणि आता थेट युझवेंद्र चहलवर येऊन थांबली. भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांनी अखेर घटस्फोट जाहीर केला आहे. पण या दोघांमध्ये नेमकं काय बिनसलं? जाणून घेऊया… (Dhanashri Chahal Divorce)
युझवेंद्र चहल हा गाजलेला क्रिकेटपटू… त्यामुळे त्याला सगळेच ओळखतात. दुसरीकडे धनश्री वर्मा ही डेंटिस्ट, डान्सर, कोरीओग्राफर आणि सोशल मीडिया सेन्सेशन आहे. दोघांनी २२ डिसेंबर २०२० ला गुडगावमध्ये लग्न केलं. त्यावेळी त्यांच्यावर शुभेच्छांचा भरभरून वर्षाव झाला होता. इंडस्ट्रीला एक नवं सेलिब्रिटी कपल मिळालं . यानंतर दोघेही सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करायला लागले, रिल्स बनवायला लागले. या कपलला विविध ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात आलं. पापाराजींनाही कंटेंट मिळाला. धनश्री अनेकदा युझवेंद्रचा उत्साह वाढवण्यासाठी त्याची मॅच पाहण्यासाठीही पोहोचायची, तर चहल तिच्यासाठी डान्स शिकायचा आणि तसे व्हिडिओदेखील पोस्ट करायचा. धनश्री इतर क्रिकेटर्ससोबतही डान्स रील्स बनवायची. यामध्ये जॉस बटलर, श्रेयस अय्यर असे अनेक क्रिकेटपटू होते. यामुळे सोशल मिडियावर अनेकदा धनश्रीचं नाव श्रेयससोबत जोडलं जात होतं.
मात्र २०२३ पासून त्यांच्यामध्ये काहीतरी बिनसलं. दोघेही एकत्र दिसत नव्हते. धनश्रीने सोशल मीडियावरून चहलसोबतचे सर्व फोटो डिलीट करून टाकले आणि यासोबतच तिने तिच्या इन्स्टाग्रामवरील चहल हे आडनाव काढून टाकलं, यानंतर चहलनेही धनश्रीसोबतचे सर्व फोटो डिलीट केले. त्यामुळे नेटीजन्स संभ्रमात होते. इथून दोघांमध्ये काहीतरी वाद झालाय, अशा चर्चा सुरु झाल्या. त्यातच गेल्या काही महिन्यांपासून धनश्री आणि चहल वेगळे राहत होते. याला जवळपास १८ महिने झाले होते. सोशल मीडियावर ते active होते, मात्र एकमेकांना अनफोलो करून ! त्यातच अनेकदा चहल हा सोशल मीडियावर एखादी दु:खी पोस्ट शेअर करताना दिसायचा. (Dhanashri Chahal Divorce)
त्यातच अचानक यावर्षी त्यांच्या घटस्फोटासंदर्भात अनेक वावड्या उठल्या. सोशल मीडियावर त्यांच्या घटस्फोटाची चर्चा होऊ लागली. दोघांचंही सोशल मीडियावर काही न काही पोस्ट टाकण्याचं सत्र सुरूच होतं. यानंतर धनश्रीचा कोरिओग्राफर प्रतीक उतेकरसोबतचा एक फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. यावेळी धनश्रीला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. त्यामुळे तिचं नाव या प्रतिकसोबत जोडलं गेलं आणि चहलसोबत वाद घालण्यात हीच जबाबदार आहे, अशा कमेंट्स सोशल मीडियावर पहायला मिळाल्या. मात्र याच दरम्यान युजवेंद्र चहलसुद्धा एका मिस्ट्री गर्लसोबत दिसून आला. यावेळी चहल कॅमेराकडे पाहून आपला चेहरा लपवताना दिसला. युजवेंद्रसोबत दिसलेली मुलगी कोण होती याची माहिती समोर आलेली नाही.
त्यामुळे यांच्यात वाद नेमका कोणामुळे सुरु झाला, असा प्रश्न उभा राहिला होता. यानंतर आता थेट २१ फेब्रुवारी २०२५ ला त्यांनी घटस्फोटच जाहीर करून टाकला. त्यातच कुटुंबियांच्या संमतीने हा निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं. याआधी २० फेब्रुवारीला गुरुवारी चहलने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं की, ‘देवाने मला अनेकदा संकटातून बाहेर काढलं आहे. त्याने मला किती वेळा तारलं आहे याची मी मोजदादही ठेऊ शकत नाही. देवा, तुझे खरंच आभार. तू नेहमीच माझ्या पाठीशी ठामपणे उभा असतोस. अनेकदा तुझं असणं मला जाणवतही नाही पण हीच तुझी ताकद आहे.’ यावेळी चहलने घटस्फोटाचा किंवा धनश्रीचा उल्लेख केला नव्हता. (Dhanashri Chahal Divorce)
=================
हे देखील वाचा : Champions Trophy : इंडिया टीम चॅम्पियन्स ट्रॉफीचा गड राखणार का ?
=================
दुसरीकडे धनश्रीनेही इन्स्टाग्रामवर पोस्ट करत, ‘आत्यंतिक तणावातून आता मुक्त वाटत आहे. देव आपल्याला संकटातून बाहेर काढतो आणि मार्ग दाखवतो हे किती छान आहे. तुम्ही आज एखाद्या गोष्टीची चिंता करत असाल, तुम्ही चिंता करत राहू शकता किंवा देवावर विश्वास ठेऊन वाटचाल करू शकता. देवाप्रति श्रद्धेत प्रचंड ताकद आहे. तो तुमच्यासाठी सगळं काही जुळवून आणू शकतो’, असं म्हटलं. दरम्यान याच्या दुसऱ्याच दिवशी दोघांनी घटस्फोट घेतला. पण दोघांच्याही घटस्फोटाचं मूळ कारण अजूनही समजलं नाही.
त्यातच धनश्रीने तब्बल ६० कोटींच्या पोटगीची मागणी केल्याचीही बातमी आहे, ज्यामुळे धनश्रीवर प्रचंड टीका होत आहे. गेल्या १० वर्षात जवळपास ६-७ क्रिकेटर्सनी घटस्फोट घेतले. त्यामुळे जिथे क्रिकेटपटू क्रिकेटच्या पिचवर तर रेकॉर्ड्स करत आहेतच, पण यासोबतच ते घटस्फोटांचाही रेकॉर्ड करत आहेत. (Dhanashri Chahal Divorce)