Home » कोट्यावधी Views मिळाल्यानंतरही युट्यूब करू शकतो तुमचा व्हिडीओ डिलीट, जाणून घ्या नियम

कोट्यावधी Views मिळाल्यानंतरही युट्यूब करू शकतो तुमचा व्हिडीओ डिलीट, जाणून घ्या नियम

जगभरात युट्यूब व्हिडीओ स्ट्रिमिंगसाठी सर्वाधिक मोठा प्लॅटफॉर्म ओखळला जातो. येथे कोट्यावधींच्या संख्येने युजर्स व्हिडीओ पाहतात आणि अपलोडही करतात. पण युट्यूब तुमचे व्हिडीओ डिलीट करू शकतो का?

by Team Gajawaja
0 comment
YouTube Video Advertisement
Share

YouTube Rules : युट्यूब व्हिडीओ स्ट्रिमिंगसाठी एक सर्वाधिक मोठा प्लॅटफॉर्म आहे. प्रत्येक दिवशी कोट्यावधींच्या संख्येने युजर्स युट्यूबव व्हिडीओ पाहतात. याशिवाय व्हिडीओ अपलोडही केले जातात. पण तुम्हाला माहितेय का, कधीकधी लाखो-कोट्यावधी व्हूज मिळाल्यानंतरही युजर्सचे युट्यूबवरील व्हि़डीओ डिलीट केले जाऊ शकतात. यामागील कारण काय जाणून घेऊया…

गुगलचे मालकी हक्क असणाऱ्या युट्यूबकडून कधीकधी काही व्हिडीओ डिलीट केले जातात. अशातच असा प्रश्न उपस्थितीत राहतो की, युट्यूब कोणत्या नियमाअंतर्गत व्हिडीओ डिलीट केले जातात. खरंतर, युट्यूबने चाहत फतेह अली खान यांचे गाणे बदो बदी युट्यूवरुन डिलीट केला आहे. चाहत फतेह अली खान यांच्या अधिकृत युट्यूब चॅनलवरुन पोस्ट करण्यात आलेल्या गाण्याला 25 मिलियनपेक्षा अधिक व्हूज मिळाले होते.

कधी डिलीट केले जाते गाणे
ताजे प्रकरण फतेह अली खान यांचे बदो बदी गाण्याचे आहे. या गाण्यावर कॉपीराइटचे इश्यू झाल्याने युट्यूबवरुन हटवले आहे. हे गाणे वर्ष 1973 मध्ये आलेल्या बनारसी ठग सिनेमासाठी नूर जहान यांनी गायले होते. या दोन्ही गाण्यांचे बोल समान होते. याच कारणास्तव चाहत फतेह अली खान यांचे गाणे युट्यूबवरुन काढण्यात आले. रिपोर्ट्सनुसार, गाण्याचे मूळ कंपोजिशनचे राइट्स असणाऱ्या नूर जहानची टीम कॉपीराइटचा क्लेम करु शकते. (YouTube Rules)

युट्यूबवरुन व्हिडीओ काढणे सामान्य बाब
युट्यूब कोणत्याही व्हिडीओचे कॉपीराइट इश्यू झाल्यानंतर काढू शकतो. याशिवाय तुम्ही एखाद्या मर्जीशिवाय त्याचा फोटो अथवा क्लिप आपल्या व्हिडीओमध्ये वापरल्यासही युट्यूबवरील व्हिडीओ डिलीट केला जातो. युट्यूबच्या गाइडलाइन्सनुसार ज्या व्हिडीओमध्ये काही समस्या असल्यास त्याच्या विरोधात कारवाई करु शकतो. युट्यूबने नुकत्याच भारतातील 22 लाखांहून अधिक व्हिडीओ हटवले आहेत. याशिवाय लाखो चॅनल्सवरही बंदी घातली.


आणखी वाचा :
ChatGPT चा वापर करता का? अशी डिलिट करा सर्च हिस्ट्री
गुगल मॅपमध्ये EV Charging स्टेशन शोधणे होणार सोपे, जाणून घ्या ट्रिक

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.