Home » Pregnancy : ४० शी नंतर प्रेग्नंसी प्लॅन करत असाल तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

Pregnancy : ४० शी नंतर प्रेग्नंसी प्लॅन करत असाल तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

by Jyotsna Kulkarni
0 comment
Pregnancy
Share

प्रत्येक स्त्रीला आई होण्याची इच्छा असतेच असते. लग्न झाल्यानंतर तर आपसूकच स्त्रीच्या मनात आई होण्याच्या भावना निर्माण होण्यास सुरुवात होते. आई होणे हे स्त्रीला निसर्गाने दिलेले एक मोठे वरदान आहे. नऊ महिने आपल्या पोटात एका जीवाला सांभाळायचे आणि नंतर त्याला जन्म द्यायचा ही भावनाच सुंदर आहे. मात्र आजच्या आधुनिक काळात स्त्रीला आई होणे वाटते तितके सोपे नाही. प्रत्येक स्त्रीला या प्रवासात कोणत्या ना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो. खूप कमी स्त्रिया असतात ज्यांना कोणताही त्रास न होता प्रेग्नन्सी राहते. स्त्रीला प्रेग्नेंट होण्यासाठी काही मोजकीच वर्ष हातात असतात. ती कधीही आई होऊ शकत नाही. यासाठी निसर्गाने काही नियम आणि मर्यादा आखून दिल्या आहेत. त्यात राहूनच तिला आई होण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. (Marathi)

पण आज प्रत्येक स्त्री ही स्वालंबी झाली आहे. तिला तिचे करियर घडवायचे आहे, स्वतःच्या पायावर उभे राहायचे. यासाठी अनेकदा मुली लग्न तर वेळेत करता मात्र लवकर आई होण्याचा निर्णय घेत नाही. अनेकदा काही स्त्रिया विशिष्ट वेळेपर्यंत आई होण्यासाठी मानसिक, शारीरिक किंवा आर्थिकदृष्ट्या तयार नसतात. त्यामुळे यात त्यांचे वय मात्र वाढत जाते आणि जेव्हा त्यांना आई होण्याची इच्छा निर्माण होते तेव्हा वाढलेल्या वयामुळे अडचणी येतात. (Marathi Headline)

डॉक्टर आणि तज्ज्ञांच्या मते आई होण्याचा सर्वात चांगला काळ म्हणजे वयाच्या २१ ते ३० चा. जशी स्त्रियांची तिशी पार होते तसे त्यांना आई होण्यास त्रास होऊ शकतो. मात्र आजच्या काळात स्त्रिया वयाच्या तिशी काय तर ३५ आणि ४० नंतर देखील आई झाल्याचे चित्र दिसते. मनोरंजनक्षेत्रात तर अशी भरपूर उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील. सध्या कॅटरिना कैफ कमालीची चर्चेत आली आहे. याचे कारण म्हणजे ती लवकरच आई होणार असल्याचे तिने जाहीर केले आहे. (Pregnancy News)

कॅटरिना आणि विकी कौशल हे आई-बाबा होणार असल्याचे त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करून सांगितले आहे. कॅटरिना ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये ती तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार असल्याचं म्हटलं जात आहे. अनेकांना या बातमीमुळे आनंद तर झाला मात्र सोबतच आश्चर्य देखील वाटले की कॅटरिनाला वयाच्या ४२ व्या वर्षी नैसर्गिकरित्या प्रेग्नन्सी राहिली. कारण ४० शिनंतर नैसर्गिकरित्या प्रेग्नन्सी राहणे अतिशय अवघड आहे. अगदी मोजक्या केसेसमध्ये हे शक्य होऊ शकते. मात्र यादरम्यान खूपच काळजी घेणे आवश्यक आहे. मग वयाच्या चाळिशीनंतर आई होणे खरंच शक्य आहे का? असल्यास काय काळजी घ्यावी? जाणून घेऊया याबद्दल. (Marathi News)

Pregnancy

जसजसं स्त्रीचं वय वाढतं तसतशी तिची प्रजनन क्षमता कमकुवत होते आणि गर्भधारणेची शक्यता कमी होते. असे असले तरी जर अशा स्त्रियांनी आपल्या आहार आणि आरोग्याकडे योग्य लक्ष दिल्यास, डॉक्टरांच्या सर्व गोष्टींचे पालन केल्यास हे शक्य आहे. शिवाय योग्य ते उपचार घेतल्यानंतर या सर्व समस्यांवर मात करून गर्भधारणा होऊ शकते. मुख्य म्हणजे आजच्या काळात वैद्यकीय शास्त्रात झालेल्या मोठ्या विकासामुळे असे तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे, ज्याच्या मदतीने अगदी मोठ्या वयातील स्त्रीही सहज गर्भधारणा करू शकते. आणि जरी दुर्दैवाने हे श्य्क झालेच नाही तर तज्ञांच्या मते, वयाच्या ४५ वर्षानंतरही, IVF चे यश १००% असू शकत नाही. अशा परिस्थितीत, तुम्हाला डॉक्टरांच्या मदतीची आणि योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असेल आणि त्यानुसार तुम्ही आयव्हीएफ प्रक्रियेस पुढे जाऊ शकता.(Todays Marathi Headline)

४० शी नंतर आई होण्यासाठी प्रयत्न करत असाल तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
– सामान्य प्रसूतीची शक्यता कमी आणि सी-सेक्शनची शक्यता जास्त (Top Marathi HEadline)
– प्री-एक्लॅम्पसियाचा धोका वाढतो. हा उच्च रक्तदाबाचा एक प्रकार आहे, जो कधीकधी प्राणघातक ठरू शकतो.
– गर्भावस्थेतील मधुमेहाचा धोका वाढू शकतो.
– मुदतपूर्व प्रसूती किंवा प्री-मॅच्युअर डिलिव्हरी होण्याचा धोका वाढतो.
– एक्टोपिक गर्भधारणेचा धोका वाढतो. या प्रकारच्या गर्भधारणेमध्ये, गर्भ गर्भाशयाच्या बाहेर विकसित होऊ लागतो – मूल आणि आई दोघांसाठीही खूप गंभीर आणि प्राणघातक ठरू शकते. (Latest Marathi News)
– बाळामध्ये जन्म दोष येण्याची शक्यता असते
– बाळाची वाचण्याची आणि लिहिण्याची आणि शिकण्याची आणि समजून घेण्याची क्षमता कमी होऊ शकते.
– डाऊन सिंड्रोमचा धोकाही वाढू शकतो.
– बाळाचे जन्म वजन कमी असते.
– 35 वर्षांनंतर गर्भवती होणाऱ्या महिलांना गर्भपात होण्याचा धोका जास्त असतो.
– या वयात लठ्ठपणा देखील वेगाने वाढतो, ज्यामुळे उच्च रक्तदाबचा धोका थोडा जास्त होतो. (Top Trending News)

========

Skin Care : नाइट स्किनकेअर रुटीनमध्ये कोणत्या चुका टाळाव्यात

========

४० शी नंतर गर्भधारणेसाठी प्रयत्न करतात ‘या’ गोष्टी अवश्य करा
– ​डॉक्टरांकडून समुपदेशन​
​- आरोग्याची तपासणी करून घ्यावी​
​- निरोगी आहाराची गरज ​
​- स्तनांची तपासणी आणि PAP टेस्ट करा
– STI चाचणी घ्या
​- नियमित व्यायामाकडे लक्ष द्या​ (Social News)

(टीप : ही देण्यात आलेली माहिती आणि उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. कायम कोणतेही उपाय अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.