Home » मटारचे फायदे माहिती असतीलच पण तोटे माहिती आहे का?

मटारचे फायदे माहिती असतीलच पण तोटे माहिती आहे का?

by Team Gajawaja
0 comment
Pea Disadvantages
Share

थंडीची सुरुवात झाली की बाजारात अनेक भाज्या येतात. त्यामध्ये प्रमुख भाजी असते ती मटार(Pea Disadvantages). मटारच्या हिरव्या शेंगांचे ढिगच्या ढीग बाजारात दिसायला लागले की, गृहिणी खुश होतात. कारण या मटारचे नानाविध प्रकार होतात. अगदी गोडापासून तिखटापर्यंतचे पदार्थ या मटारपासून करता येतात. तसेच सकाळच्या नाष्टापासून रात्रीच्या जेवणापर्यंतचे अनेक पदार्थ मटारपासून तयार होतात. हा मटार आपल्या आहारात रोज असल्यास त्याचे जेवढे फायदे होतात, तेवढेच नुकसानही होऊ शकते. मटारमध्ये (Pea Disadvantages) प्रथिने आणि फायबर चांगल्या प्रमाणात असतात. त्यामुळे ह्दयासाठी ते चांगले ठरतात आणि कॉलोस्ट्रोल नियंत्रीत ठेवण्यासाठीही त्यांचा उपयोग होतो. मात्र हेच मटार ज्यांना यूरिक एसिडचा त्रास आहे, त्यांना तापदायक ठरु शकतात.  त्यामुळेच मटारपासून बनवलेले पदार्थ चवदार असले तरी ते खातांना आपल्या आरोग्याचा विचार नक्कीच करावा.  

हिवाळ्याच्या मोसमात मटार (Pea Disadvantages) ही हक्काची भाजी आहे.  मटार फक्त चवीलाच चांगले लागतात असे नाही तर हे पदार्थ आरोग्याला फायदेशीरही ठरतात. यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन सी, के, प्रथिने, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स यासारखे पोषख घटक आहेत.  यामुळे रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात  ठेवण्यास मदत होते.  मटारचा (Pea Disadvantages) वापर आहारात असल्यास शरीरात जाणवणारी जळजळ, रक्ताशी संबंधित विकार, श्वसनाचे आजार, खोकला, भूक न लागणे यापासून आराम मिळू शकतो.  मटारसोबत (Pea Disadvantages) आलं, लसूण, सुंठ, दालचिनी, काळीमिरी यांचेही सेवन केले जाते.  हे सर्व पदार्थ थंडीसाठी उपयोगी आहेत.  यामुळे शरीरात उष्णता तयार होते.  त्यामुळे मटारचे सेवन चांगले मानण्यात येते. फार काय मटारचा उपयोग फेसपॅकसारखाही केला जातो. मटार (Pea Disadvantages) आणि संत्र्याची साल हे दुधात मिसळून चेह-याला लावल्यास त्यामुळे चेह-याला पोषण मिळते. ज्यांना भूक लागत नाही, अशांनी मटारचा वापर जेवणात केल्यास, त्यामुळे भूकही वाढू शकते.   मटारचा वापर जखम सुकवण्यासाठीही खूप फायदेशीर ठरतो. त्वचेच्या आजारातही मटारचा वापर फायदेशीर ठरतो.  मटारमुळे कोलेस्ट्रॉल सामान्य राहण्यास मदत होते. यासोबतच यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने त्यांनी पचनक्रियाही सुधारते.  मटारमध्ये कॅन्सरविरोधी गुणधर्मही आहेत.  एका संशोधनानुसार यामध्ये असे पोषक तत्व आढळतात ज्यामुळे कर्करोगाची लक्षणे कमी होण्यास मदत होते. मटारमध्ये एवढे फायदे सामावलेले असले तरी मटार (Pea Disadvantages) खाण्याचे अनेक तोटेही आहेत. त्याचाही विचार करणे गरजेचे आहे.  

ज्यांना यूरिक अॅसिडचा त्रास जाणवत असेल त्यांच्यासाठी मटार (Pea Disadvantages) खाणे त्रासदायक ठरू शकते. मटारमध्ये प्रथिने, अमीनो अॅसिड, व्हिटॅमिन डी आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. या पोषक घटकांमुळे हाडे मजबूत होतात. पण मटारचे सेवन जास्त प्रमाणात केल्यानं शरीरात यूरिक अॅसिडचे प्रमाण वाढत असल्याचे लक्षात आले आहे. ज्यामुळे सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. ज्यांना आधीच सांधेदुखीचा त्रास आहे, आणि अशांनी मटारचे (Pea Disadvantages) सेवन जास्त प्रमाणात केल्यास त्यांचा त्रास वाढू शकतो. कारण मटार ज्या ऋतूत येतात तो ऋतूही संधीवाताला पुरक असतो.  त्यामुळे ज्यांना सांधेदुखी आहे, आणि युरीक अॅसिडचा त्रास आहे, त्यांनी मटारचे सेवन थोड्या कमी प्रमाणातच करावे.  

=======

हे देखील वाचा : संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे…

=======

किडनी स्टोन किंवा किडनीशी संबंधित इतर कोणतीही समस्या असली तरी मटार (Pea Disadvantages) खाणे टाळावे. यामध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असल्याने किडनीच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. मटारचे जास्त सेवन केले तर गॅसचाही त्रास होऊ शकतो.  मटारमध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असते.  शिवाय त्यात असलेली साखरही घातक ठरते. अशावेळी बद्धकोष्ठता किंवा गॅसच्या समस्या निर्माण होऊ शकतात. मटार खाण्याचे अनेक फायदे आहेत. पण त्यापेक्षाही मटारचे (Pea Disadvantages) अतीसेवन केल्यास त्यापासून होणारे नुकसान जास्त आहे.  मटार चवीसाठी चांगले असतात. पण कुठलीही गोष्ट जेवढी चांगली तेवढीच ती त्रासदायकही ठरू शकते.  त्याचे मर्यादेत सेवन हे कधीही चांगले.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.