योगिता चव्हाण ही मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. कलर्स मराठी वाहिनीवरील ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेतून योगिता प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
योगिताने आपल्या पहिल्याच मालिकेतून प्रेक्षकांवर छाप सोडली आणि तुफान प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवली. या मालिकेत तिने अंतरा ही भूमिका साकारली.
‘जीव माझा गुंतला’ या मालिकेतील भूमिकेमुळे ती महाराष्ट्राच्या घरांघरात पोहचली. त्यानंतर योगिता चव्हाण ‘राडा’ या सिनेमात देखील दिसली होती.
नुकतीच योगिता बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात देखील दिसली होती. या पर्वामध्ये ती जास्त काळ टिकू शकली नाही. बिग बॉसमधून ती काही आठवड्यातच बाहेर पडली.
योगिता सध्या कुठल्याही प्रोजेक्ट्समध्ये दिसत नसली, तरी ती सोशल मीडियावर कमालीची सक्रिय आहे. ती सतत इंस्टाग्रामवर तिचे विविध फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.
योगिताने नुकतेच तिचे सुंदर असे दिवाळी फोटोशूट केले आहे. या फोटोंमध्ये तिचा पारंपरिक गोड लूक पाहायला मिळत आहे. जांभळ्या रंगाची साडी नेसली असून, त्यावर तिने साजेसे दागिने घातले असून, केस मोकळे ठेवले आहे.
तर योगिताच्या दुसऱ्या लुकबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये तिने गोल्डन आणि हिरव्या रंगाची साडी नेसली असून त्यावर मोत्याचे दागिने घालत मेसी अंबाडा घातला आहे. या लूकमध्ये देखील योगिता कमाल दिसत आहे.
योगिताच्या या दोन्ही लूकचे नेटकऱ्यांकडून जोरदार कौतुक होताना दिसत आहे. तिच्या या सुंदर लूकसाठी तिला अनेक कॉम्प्लिमेंट्स देखील मिळत आहे. दरम्यान योगिताची ही लग्नातरची पहिली दिवाळी असून, ती तिच्यासाठी खूपच खास आहे.