तिर्थराज प्रयागराजमध्ये महाकुंभची तयारी पूर्ण झाली आहे. आता तिथे जमलेल्या करोडो साधू संतांना आणि भाविकांना 13 जानेवारीची उत्सुकता आहे. 13 जानेवारीला महाकुंभमधील पहिले शाही स्नान होईल आणि महाकुंभाचे पवित्र पर्व सुरु होईल. 26 फेब्रुवारी पर्यंत चालणा-या महाकुंभमध्ये 45 करोड भाविक येतील अशी माहिती आहे. यासाठी उत्तरप्रदेश सरकारनं भव्य तयारी केली असून सरकारमधील प्रत्येक मंत्री आणि अधिकारी या कुंभमेळ्याच्या यशस्वीतेसाठी तत्पर रहाणार आहेत. या सर्व महाकुंभचे नियोजन आणि प्रयागराज येथील आयोजन हे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. योगी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री असले तरी ते गोरखनाथ पीठाधिश्वरही आहेत. त्यांचाही आखाडा या महाकुंभमध्ये दाखल झाला असून योगी आदित्यनाथ यांच्यावर त्याचाही जबाबदारी आहे. (Adityanath Yogi)
राज्याची, आणि महाकुंभाची जबाबदारी पार पाडतांना योगी आदित्यनाथ आपल्या आखाड्यालाही वेळ देणार आहेत. त्यांनी दोन दिवसांचा प्रयागराज दौरा करत महाकुंभच्या कामकाजाची पाहणी केली तेव्हाही आपल्या आखाड्यातील साधू संतांची भेट घेतली. योगी आदित्यनाथ यांच्या नाथ संप्रदाय आखाड्यासाठी एक स्वतंत्र तंबू बांधण्यात येत आहे. महाकुंभ सुरु झाल्यापासून पुढचे 45 दिवस योगी याच ठिकाणाहून कामकाज करणार असल्याची माहिती आहे. महाकुंभमध्ये रोज लाखो भाविक स्नान करण्यासाठी येणार आहेत. सोबत देशविदेशातले मान्यवरही महाकुंभमध्ये येणार आहेत. अशावेळी राज्याचा प्रमुख म्हणून योगी या कुंभस्थानी उपस्थित रहाणार आहेत. यासोबत नाथ आखाड्यातील आपल्या सहकार्यांसोबत ते धार्मिक कार्यातही सहभागी होणार आहे. नाथ आखाड्यातर्फे महाकुंभचे 45 दिवस भाविकांसाठी मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व व्यवस्थेचे नियोजनही योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली कऱण्यात येत आहे. (Social News)
उत्तर प्रदेश महाकुंभासाठी पूर्णपणे सज्ज झालं आहे. 13 जानेवारी पासून भारतात हजारो वर्षापासून सुरु असलेल्या या महाकुंभाचे आणखी एक पर्व सुरु होणार आहेत. प्रयागराजला तिर्थराज म्हणण्यात येते. येथे गंगा, यमुना या दोन नद्यांचा संगम झाला आहे. या दोन नद्यांमध्ये गुप्प रुपानं सरस्वती नदीही वाहते. यालाच त्रिवेणी संगम म्हणतात. या त्रिवेणी संगमावर महाकुंभकाळात स्नान करणे पवित्र मानण्यात येते. त्यामुळे करोडो भाविक या महाकुंभात हजेरी लावणार आहेत. यासर्वांची व्यवस्था निट व्हावी म्हणून गेले वर्षभर उत्तरप्रदेश सरकार प्रयत्नशील आहे. महाकुंभमध्ये आखाड्यांची भूमिका महत्त्वाची असते. साधू संतांचे हे आखाडे आणि त्यातील साधूसंत बघण्यासाठी करोडो भाविक या स्थळी येतात. (Adityanath Yogi)
या सर्वांची व्यवस्था करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर असते. सोबत महाकुंभसाठी जगभरातले व्हीआयपी येणार आहेत. या सर्वांचे स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री योगी महाकुंभस्थळी पुढचे काही दिवस मुक्कामी रहाणार असल्याची बातमी आहे. मुख्यमंत्री योगींसह त्यांचे सर्व मंत्रीमंडळही याच ठिकाणी रहाणार आहे. यासाठी मोठा तंबू बांधण्यात येत असून याच ठिकाणाहून योगी राज्याचा कारभार चालवणार आहेत. यासोबत मुख्यमंत्री योगी हे नाथ पंथाच्या आखाड्याचे प्रमुख असल्यानं त्यांच्यावर या आखाड्याची जबाबदारीही आहे. या नाथ पंथाच्या आखाड्यामध्ये जे धार्मिक सोहळे पार पडणार आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे नाथ पंथाचे आहेत. त्यांच्यासाठी महाकुंभाच्या सेक्टर 18 मधील जुन्या जीटी रोडवर भव्य तंबू उभारला जात आहे. हा नाथ आखाडा 600×400 च्या परिसरात वसवला जात आहे. यात 70 हाय-टेक कॉटेज उभारले असून ते आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहेत. नाथ पंथाच्या संतांची प्रवचनेही येथे होणार असून या नाथ आखाड्यातील साधूही याच भव्य तंबूच्या एका बाजुला रहाणार आहेत. (Social News)
तसेच येथेच भव्य असे स्वयंपाकघर तयार असून येथून हजारो भाविकांना मोफत भोजन देण्यात येणार आहे. याच तंबूच्या चौथ्या टप्प्यात योगी आदित्यनाथ रहाणार असून उत्तरप्रदेशचे अन्य मंत्रीही येथे वास्तव्यास असणार आहेत. जर्मन हँगर तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेल्या या तंबूंमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळ सहन करण्याची क्षमता आहे. मुख्यमंत्री योगी यांचे कॉटेज केरळ आधारित थीमवर बांधले आहे. योगींसाठी एकूण दोन कॉटेज असून एकात मुख्यमंत्री योगींसाठी स्वतंत्र प्रार्थना कक्ष, ग्रंथालय आणि बैठक कक्ष तयार केला आहे. नाथ आखाड्यात गृहमंत्री अमित शहा, आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्याव्यतिरिक्त, भाजपचे वरिष्ठ नेतेही रहाणार असल्याची माहिती आहे. गोरखनाथ पीठाधिश्वर योगी आदित्यनाथ यांच्याकडून भंडारा देखील आयोजित केला जाईल. कुंभमेळा काळात येथे भंडाराही आयोजित करण्यात आला आहे. (Adityanath Yogi)
================
हे देखील वाचा : Steve Jobs : स्टीव्ह जॉब्सची बायको कुंभ मेळ्यात…
Maha Khumbh Mela: महाकुंभमध्ये कल्पवास करणार या अब्जाधीशाची पत्नी !
===============
गोरखनाथ मठाचे प्रमुख हे योगी महासभेचे अध्यक्ष आहेत. या महासभेत 2 सिंहासने आहेत. एक गुरु गोरखनाथांचे आणि दुसरे भगवान शंकरांचे आहे. येथे अध्यक्षाची निवड सर्वसंमतीने होते. आधी दिग्विजयनाथ प्रमुख होते. नंतर महंत अवैद्यनाथ होते आणि आता योगी आदित्यनाथ आहेत. या महासभेची स्थापना 1939 मध्ये ब्रह्मलीन महंत दिग्विजयनाथ महाराज यांनी केली. ते आयुष्यभर महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यांच्या निधनानंतर, महंत अवैद्यनाथ महाराज यांची केंद्रीय संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली. अवैद्यनाथ महाराजांच्या समाधीनंतर, 25 सप्टेंबर 2014 रोजी, महासभेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने गोरक्षपीठाधीश्वर महंत योगी आदित्यनाथ यांची या केंद्रीय संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवड केली. योगी आदित्यनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या पंथांचे प्रमुख किंवा त्यांचे प्रतिनिधी मंदिरे, मठ किंवा प्रार्थनास्थळे चालवतात. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आणि या महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आता योगी आदित्यनाथ यांच्यावर महाकुंभमध्ये दुहेरी भूमिका आहे. यासाठीच ते पुढचे काही दिवस प्रयागराजमधील आपल्या आखाड्यात मुक्कामी रहाणार आहेत. (Social News)
सई बने