Home » PCOS : पीसीओएस (PCOS) मुळे आहात त्रस्त? मग आजपासूनच करा ‘ही’ योगासने

PCOS : पीसीओएस (PCOS) मुळे आहात त्रस्त? मग आजपासूनच करा ‘ही’ योगासने

by Jyotsna Kulkarni
0 comment
PCOS
Share

आजच्या धावपळीच्या युगात कोणालाच स्वतःच्या आरोग्याकडे नीट लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. चुकीची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या पद्धती, व्यायामाचा अभाव यामुळे अनेक आजार होताना दिसत आहे. या आजारांवर विविध उपचार करणे आवश्यकच आहे. मात्र आजारांवर जास्त गोळ्या औषधं खाण्यापेक्षा नियमीत योगा केला तर नक्कीच फायदा होऊ शकतो. महिलांनी तर आपल्या आरोग्याकडे सर्वात जास्त लक्ष देणे आवश्यक आहे. कारण त्यांना हार्मोन्सशी संबंधित अनेक आजारांचा सामना करावा लागतो. मासिक पाळीशी संबंधित अनेक आजार आता मोठ्या प्रमाणावर डोके वर काढताना दिसत आहे. खूपच कमी वयात मुलींना PCOS (पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम) सारख्या गंभीर आजाराचा सामना करावा लागत आहे. यावे उपचार घेऊन देखील बऱ्याच महिलांना तात्पुरता फरक पडतो, मात्र कायम स्वरूपी त्यांना यातून मुक्तता मिळत नाही. अशावेळेस काय करावे हा प्रश्न समोर उभा असतो. यावर एक सोपे आणि प्रभावी उत्तर म्हणजे योगा. (Yoga)

PCOS म्हणजे काय?
पॉलीसिस्टिक ओव्हेरीज सिंड्रोम (PCOS) हा स्त्रियांमधील जीवनशैलीशी संबंधित सर्वात सामान्य आजारांपैकी एक आहे. या आजारात हार्मोनल असंतुलन होते. त्यामुळे वजन वाढते, मासिक पाळी अनियमित होते, चेहऱ्यावर केसांची वाढ होऊ लागते. या रोगात, अंडाशयात लहान गाठी तयार होतात. यामुळे मासिक पाळीच्या चक्रावर परिणाम होतो आणि वंध्यत्व देखील होऊ शकते. या आजारात लठ्ठपणा आणि मधुमेह वाढण्याचीही शक्यता असते. (PCOS)

PCOS आजार पूर्णपणे बरा होऊ शकत नाही परंतु योग्य काळजी घेतल्यास यावर नियंत्रण मिळवता येते. यासाठी योग्य आहार, नियमित व्यायाम आणि औषधं घेणे अतिशय महत्वाचं आहे. हा आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी तंदुरुस्त राहणं सर्वात आवश्यक आहे. वजन कमी झाल्यामुळे PCOS कमी होण्यास सुरुवात होते आणि जास्त वजनामुळे PCOS वाढते. त्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात ठेवणं गरजेच आहे. (Health)

आज जिथे बऱ्याच लोकांकडे आरोग्यकडे लक्ष द्यायला वेळ नाही, तिथे काही लोकं हळूहळू का होईना, आपल्या तब्येतीच्या बाबतीत सजग झाले आहेत. योगाचे महत्त्व लक्षात घेऊन छोटे छोटे योगा प्रकार करून लोकं स्वतःला फिट ठेवण्यासाठी प्रयत्नशील दिसत आहे. PCOS (पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम) या आजारामध्ये देखील अनेक योगासनाचे प्रकार अतिशय प्रभावी आणि लाभदायक ठरत आहे. ज्या महिला या आजाराचा सामना करत आहे त्यांनी नक्कीच खाली दिलेले योगा प्रकार दररोज करा आणि काही दिवसातच तुम्हाला याचा फरक दिसून येईल. (Marathi News)

​बद्धकोणासन / बटरफ्लाय पोझ
बद्धकोणासनासाठी सर्व प्रथम आपले दोन्ही पाय पसरून आरामदायी स्थितीमध्ये बसावे. दोन्ही पाय गुडघ्यात मोडून पायांचे तळवे एकमेकांजवळ आणावे. दोन्ही हातांनी आपल्या पायाचे तळवे पकडावे. आपली पाठ ताठ राहील याची काळजी घ्यावी आणि दोन्ही गुडघे जमिनीवर ठेवण्याचा प्रयत्न करावा. यानंतर आपले दोन्ही गुडघे वर आणि खाली करा. ही सर्व प्रक्रिया संथ गतीने करावी. या आसनामुळे यामुळे शरीराच्या खालच्या भागाच्या नसा मजबूत होतील आणि जघन भागात रक्ताभिसरण वाढेल, ज्यामुळे हार्मोन्स नियंत्रणात राहतील. मात्र लक्षात ठेवा तीव्र गुडघे दुखी, पायदुखीच्या समस्या असतील तर हे आसन करू नये. (Todays Marathi Headline)

PCOS

सूर्यनमस्कार
१) दोन्ही हात जोडून सरळ उभे राहा. डोळे बंद करावे. आपले लक्ष ‘आज्ञा चक्रावर’ केंद्रित करावं. सूर्याचे आव्हान करून ‘ॐ मित्राय नमः’ मंत्र म्हणावे.
२) श्वास धरून दोनी हात कानाच्या बाजूने घेत वर ओढा. हात आणि मान मागील बाजूस वाकवा. लक्ष मानेच्या मागील बाजूस असलेल्या ‘विशुद्धी चक्रावर’ केंद्रित करावं.
३) तिसऱ्या स्थितीमध्ये श्वास हळुवार बाहेर सोडत पुढे वाकावे. हात मानेसकट कानाला लागून खाली घेऊन जाऊन पायाच्या उजव्या आणि डाव्या बाजूच्या जमिनीला स्पर्श करावे. गुडघे ताठ असायला हवे. कपाळ गुडघ्यांना स्पर्श करता करता लक्ष नाभीच्या मागील ‘मणिपूरक चक्र’ वर केंद्रित करतं काही काळ तश्याच स्थितीत थांबावे. कंबर आणि मणक्याचा त्रास असणाऱ्यांनी हे व्यायाम करू नये. (Top Marathi Headline)
४) याच स्थिती मध्ये श्वास धरून डावा पाय मागे घेऊन जा. छातीला पुढे करा. मानेला मागे वाकवा, पाय ताठ, मागे वाकवलेले तळपाय सरळ उभ्या स्थितीत. या स्थितीत काही वेळ थांबा. लक्ष स्वाधिष्ठान किंवा विशुद्धी चक्राकडे लावावे. चेहरा सामान्य ठेवा.
५) श्वासाला हळू हळू सोडत उजवा पाय मागे करा दोन्ही पायाचे टाच जोडलेले. शरीराला मागील बाजूस ओढा. टाचांना जमिनीवर लावायचा प्रयत्न करा. शक्य असल्यास नितम्ब उचलावे. मानेला वाकवून हनुवटी गळ्यापर्यंत लावा. लक्ष ‘सहस्त्रार चक्रा’ कडे केंद्रित करण्याचा सराव करा.

PCOS
६) श्वास घेताना शरीराला पृथ्वीच्या समांतर, सरळ साष्टांग दंडवत करा. प्रथम गुडगे, छाती, कपाळ जमिनीला लावावे. मागील भाग थोडंसं उंच उचलून श्वास सोडून द्या. लक्ष ‘अनाहत चक्र’ कडे केंद्रित करा. श्वासाची गती सामान्य करा.
७) या स्थितीत हळू हळू श्वास धरून, छातीला पुढे खेचून हात सरळ करावे. मान मागे टाकावी. गुडघे जमिनीला लावून तळ पाय सरळ ठेवा. शरीर ताठ करून लक्ष केंद्रित करा. (Top Stories)
8) आता ५ व्या क्रमांकाची प्रक्रिया पुन्हा करावी.
९) आता ४ थ्या क्रमांकाची प्रक्रिया पुन्हा करावी.
१०) आता ३ ऱ्या क्रमांकाची प्रक्रिया पुन्हा करावी.
११) आता क्रमांकाची प्रक्रिया पुन्हा करावी.
१२) आता पहिल्या क्रमांकाची प्रक्रिया पुन्हा करावी.

सूर्यनमस्कार हे योगासनांपैकी सर्वोत्तम आहे. ‘सूर्यनमस्कार’ महिला, पुरुष, लहान मुले, तरुण आणि वृद्ध सर्वांसाठी उपयुक्त असल्याचे सांगितले जाते. सूर्यनमस्‍कार केल्‍याने जघनाच्‍या क्षेत्राचे स्‍नायू, लघवीच्‍या शिरा आणि पोटच्‍या खालच्‍या स्‍नायूंना मसाज करून बळकटी मिळते. पीसीओडी दूर करण्यासोबतच मासिक पाळी नियमित करण्यासाठीही हे फायदेशीर आहे. (Marathi Trending Headline)

​भुजंगासन
सर्व प्रथम छातीवर झोपावे. दोन्ही गुडघे, दोन्ही टाचा आणि चवडे एकमेकांजवळ आणा. आपले कपाळ जमिनीवर ठेवा. दोन्ही हात कोपरामध्ये दुमडून हातांचे तळवे छातीच्या रेषेत ठेवा. अंगठा वगळता हाताची चार बोटे एकत्र ठेवा. हातांचे कोपर आतील बाजूस झुकवा. कपाळ पुढे घेऊन नाकाने जमिनीला स्पर्श करावा. यानंतर हनुवटीने जमिनीस स्पर्श करत शक्य होईल तितकी मान वर न्यावी. डोके वर नेऊन मागील बाजूस झुकवावे. खांद्यांची हाडे एकमेकांजवळ आणण्याचा प्रयत्न करा. नाभीपासून शरीराचा वरचा भाग वरील बाजूस आणा आणि मागे झुकवा. ही आहे भुजंगासनाची अंतिम स्थिती. (Top Trending News)

PCOS

========

Pedicure : घरीच करा डीप क्लीनिंग! पेडिक्योरसारखा रिजल्ट मिळवण्यासाठी सोपी होम केअर टिप्स

Beauty Tips : ‘या’ घरगुती उपायांनी तुम्ही पिंपल्सपासून सुटका करून घेऊ शकता

========

मलासन
मलासन थेट तुमचा गाभा आणि नितंब तसेच तुमच्या मांड्या आणि ग्लूट्सला गुंतवते. हे करण्यासाठी पाय रुंद करून पूर्ण सॉक्ट स्थितीत बसावे. तुमचे तळवे दोन वेगवेगळ्या दिशेला असावे आणि तुमच्या मांड्या या हाताच्या कोपऱ्या पाठिमागे असावे. यामुळे चांगला फायदा होतो. (Social News)

PCOS

(टीप : कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांनाच सल्ला नक्की घ्या)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.