Home » मुलांची अभ्यासातील एकाग्रता वाढवायची असेल, तर त्यांना आवर्जून करायला लावा हे योगप्रकार

मुलांची अभ्यासातील एकाग्रता वाढवायची असेल, तर त्यांना आवर्जून करायला लावा हे योगप्रकार

by Team Gajawaja
0 comment
Yoga For Students
Share

गेल्या दोन वर्षांत सर्वांच्या आयुष्यात कोरोना नामक रोगानं धुमाकूळ घातला आहे. एक रोग काय आला, सर्वांचे आयुष्यच बदलून गेले. सर्वांची जीवनपद्धती बदलली. एका न दिसणाऱ्या रोगाची दहशत सर्वाधिक अनुभवली ती विद्यार्थ्यांनी. दोन वर्ष मुलं घरी बसून शाळेचा अभ्यास करत होती. शहरी भागातच नव्हे, तर ग्रामीण भागातील मुलांचीही अभ्यासाची पद्धत या कोरोनामुळे बदलली आहे आणि त्याचा त्यांच्या अभ्यास पद्धतीवरही परिणाम झाला आहे.  (Yoga For Students)

आता नव्यानं शाळा सुरु झाल्या आहेत. हळूहळू सगळं स्थिरस्थावर होतंय, तरी प्रत्येक पालकांच्या मनात कोरोनाबद्दलची भीती कमी झाली नाहीये. कारण कोरोना पूर्णपणे गेला नाही, उलट गेल्या काही दिवसात चौथी लाट आल्याच्या बातम्या वेगाने पसरल्या होत्या. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत होती. त्यामुळेच पालकांची चिंताही वाढली आहे. या सर्वात विद्यार्थ्यांना योगाचा फायदा होऊ शकतो. अभ्यासात आणि कोरोनानंतर सुरु होणाऱ्या शालेय उपक्रमांत योगासनांचा फायदा नक्कीच होऊ शकतो. (Yoga For Students)/.

काही योगासने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी मदत करतील अशी आहेत. मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासामध्ये योगाची महत्वपूर्ण भूमिका आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी अनेक आसने लाभदायक आहेत. यामध्ये दंडासन, भुजंगासन, पार्वतासन, ताडासन, धनुरासन, वृक्षासन, मर्जरी आसन, वज्रासन, वीरभद्रासन आणि शिशुआसन या योगासनांसह आणखीही काही आसनांचा समावेश होऊ शकतो.  

आता भारतासह आणखीही काही देशात शाळा भरल्यावर पहिल्या तासामध्ये विद्यार्थ्यांना योगासनांचे धडे देण्यात येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची अभ्यासातील एकाग्रकताही वाढल्याचेही लक्षात आले आहे. (Yoga For Students)

====

हे देखील वाचा – उत्तम आरोग्यासाठी लहान मुलांना ‘अशाप्रकारे’ घरच्या घरी शिकवा योगासनं… 

===[

शालेय विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासासाठी एकाग्रता अत्यंत महत्त्वाची असते. योगासनांमुळे विद्यार्थ्यांची शारीरिक वाढ योग्यपद्धतीने होते. आपण यासाठी भुजंगासनाचे उदाहरण घेऊया. भुंजगासन खांदे आणि मानेचे स्नायू मोकळे करते. पोटाच्या स्नायूंना यामुळे मजबूती मिळते. पाठ आणि खांदे मजबूत होतात. पाठीच्या वरच्या आणि मधील भागामध्ये रक्तसंचार सुधारुन त्यांना लवचिकता मिळते. तसेच तेथील तणाव आणि थकवा कमी होतो. विद्यार्थ्यांच्या पाठीवर असलेल्या दफ्तरामुळे अनेकवेळा पाठदुखीची तक्रार येते. अशावेळी नियमीत भुजंगासन जर विद्यार्थी करीत असतील, तर ही तक्रार नक्कीच दूर होण्यासाठी मदत होते.   

याबरोबरच ताडासनही विद्यार्थ्यांना फायदेशीर पडते. सूर्य नमस्कारातील बारावे आणि शेवटचे आसन म्हणूनही ताडासन ओळखले जाते. यामुळे रक्तसंचार वाढून पचनक्रीया सुधारते. तसेच उर्जा आणि उत्साहही वाढतो. शालेय विद्यार्थ्यांना या दोघांचीही गरज असते. (Yoga For Students)

विद्यार्थ्यांना धनुरासनही असेच फायदेशीर ठरते. यामुळे पाठ आणि पोटातील स्नायुंना मजबूती मिळते.  पाठ लवचिक होते. तणाव आणि थकव्यापासूनही मुक्ती मिळते. विद्यार्थ्यांसाठी वृक्षासन हे आसनही मन संतुलित करण्यासाठी उपयोगी पडते. यामुळे पाठ, हात, कंबर आणि पायांना मजबूती मिळते. मर्जरी आसन, वज्रासन आणि बालासनही आसनेही विद्यार्थ्यांना उपयोगी पडतात.

योग हा सरावाचा भाग आहे. आता कोरोनाच्या दोन वर्षाच्या काळानंतर जेव्हा शाळा पुन्हा सुरु होत आहेत, तेव्हा शालेय विदयार्थ्यांनी नियमीत योगासने करण्याची गरज आहे.  कारण अद्यापही कोरोनाचे सावट कमी झालेलं नाही. अशात आपल्या शरीरिचे आरोग्य आणि मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी योगासनांची मदत नक्की होणार आहे. (Yoga For Students)

– सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.