सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात कोणालाच आपल्या स्वत:ची काळजी घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. परिणामी त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. अशातच काहींना आजार ही जडतात. मात्र विद्यार्थ्यांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास त्यांना दिला जाणारा शाळेतील अभ्यास असो किंवा ट्युशनचा अभ्यास यामुळे ते काही वेळा थकतात. त्यांना यामधून थोडावेळ ब्रेक घेणे फार गरजेचे असते. अशातच विद्यार्थ्यांनी काही योगासन केली तर त्याचा तुमच्या एकूणच आरोग्यावर तर होईलच. पण तुमची एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढण्यास ही मदत होईल. त्या अनुशंगाने तुम्ही काही सोप्पी योगासने करु शकता.(yoga for sharp memory)
योगासन ही तुम्हाला मानसिक आणि शारीरिक रुपात तंदुरस्त ठेवण्यास मदत करतात. ऐवढेच नव्हे तर आरोग्या संबंधित आजारांपासून ही दूर राहण्यास योगाचा फार मोठा फायदा होतो. तुमची विचार करण्याची क्षमता वाढते, बुद्धिमत्तेला चालना मिळते.
पद्मासन
या योगासनाला लोटस पोज असे देखील म्हटले जाते. कारण हे आसन करण्यासाठी तुम्हाला फक्त तुमचे पाय एकमेकांवर ठेवून, आपण जशी मांडी घालतो त्या पद्धतीने पण पाय क्रॉस ठेवायचे आहेत. हे आसन तुमचे डोक शांत करण्यास मदत करते. त्याचसोबत एकाग्रता ही वाढते. फक्त लक्षात असू द्या हे आसन करताना तुमच्या शरिराची कोणतीही हालचाल होणार नाही आणि तुमचे डोळे बंद राहतील याची काळजी घ्या. पद्मासन तुम्ही नियमित रुपात केल्यास याचा तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो.
हे देखील वाचा- हाताची चरबी कशी कमी कराल? जाणून घ्या व्यायाम आणि सोप्प्या ट्रिक्स
वज्रासन
वज्रासन करण्यासाठी तुम्हाला तुमच्या पायांवर बसायचे आहे. फक्त यामध्ये तुम्हाला गुडघ्यांचा आधार घेत बसायचे आहे. पाठीचा कणा ताठ ठेवून हळूहळू श्वास घेत रहा. हे आसन केल्याने तुमची स्मरणशक्ती वाढवतेच. पण तणाव ही दूर करते.(yoga for sharp memory)
सर्वांगासन
सर्वांगासन हे सुरुवातीला प्रत्येकालाच जमेल असे नाही. परंतु हे करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. सर्वांगन केल्याने तुमचे एकाच ठिकाणी लक्ष राहते आणि एकाग्रता ही वाढते. विद्यार्थ्यांसाठी हे योगासन अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे बुद्धिला अधिक चालना मिळते. त्यामुळे हे योगासन नियमित रुपात करण्याचा प्रयत्न करा.
पश्चिमोत्तानासन
एकाग्रता वाढवण्यासाठी सर्वाधिक उत्तम म्हणजे पश्चिमोत्तानासन. हे आसन तुमचं डोक शांत करण्यास मदत करते. डोके दुखीची समस्या ही दूर होते. त्याचसोबत मेंदूचे कार्य उत्तम पद्धतीने पार पाडण्यासाठी सुद्धा याचा खुप फायदा होतो.