Home » Period Cramps : पीरियड्समधील वेदना कमी करतील ही योगासने, मिळेल आराम

Period Cramps : पीरियड्समधील वेदना कमी करतील ही योगासने, मिळेल आराम

by Team Gajawaja
0 comment
Period Pain Home Remedies
Share

Period Cramps : महिलांमध्ये मासिक पाळीच्या काळात पोटदुखी, कंबरदुखी, थकवा, चिडचिड, डोकेदुखी आणि मूड स्विंग्स यांसारख्या समस्या सामान्य असतात. अनेक महिला वेदनाशामक औषधांचा आधार घेतात, पण त्याचा सतत वापर आरोग्यासाठी योग्य नसतो. अशावेळी योगासने हा एक नैसर्गिक, सुरक्षित आणि प्रभावी उपाय ठरू शकतो. योग्य पद्धतीने केली जाणारी योगासने शरीरातील रक्तप्रवाह सुधारतात, स्नायूंना आराम देतात आणि हार्मोन्स संतुलित ठेवण्यास मदत करतात. नियमित सराव केल्यास पीरियड्समधील वेदना लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतात.

१) भुजंगासन – पोटदुखीवर प्रभावी उपाय

भुजंगासन म्हणजे सर्पासन. हे आसन पोटाच्या खालच्या भागातील स्नायूंना ताण देते आणि गर्भाशयातील रक्तप्रवाह सुधारते. पीरियड्सदरम्यान होणारी तीव्र पोटदुखी आणि कंबरदुखी कमी करण्यासाठी हे आसन खूप उपयुक्त ठरते. पोटावर झोपून, हातांच्या मदतीने छाती वर उचलून हा आसन केला जातो. श्वास हळूहळू घेत ठेवत २०–३० सेकंद या स्थितीत राहावे. हे आसन शरीराला ऊर्जा देते आणि थकवा कमी करते.

२) बालासन – मन आणि शरीराला शांतता

पीरियड्समध्ये मानसिक तणाव आणि चिडचिड वाढते. बालासन केल्याने मन शांत होतं आणि पोट, कंबर व मांड्यांवरचा ताण कमी होतो. हे आसन विशेषतः तीव्र वेदनांच्या वेळी आराम देते. गुडघ्यावर बसून शरीर पुढे वाकवून कपाळ जमिनीवर टेकवावे आणि हात पुढे किंवा शरीराशेजारी ठेवावेत. काही मिनिटे या स्थितीत राहिल्यास शरीराला खोलवर आराम मिळतो आणि वेदना कमी होतात.

Health

३) बद्धकोणासन – हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठी

बद्धकोणासन हे गर्भाशय, अंडाशय आणि पेल्विक भागासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. पायांची तळवे एकमेकांना लावून गुडघे खाली जमिनीच्या दिशेने सोडावे आणि पाठ सरळ ठेवून बसावे. नियमित सराव केल्यास मासिक पाळीतील अनियमितता, वेदना आणि जडपणा कमी होतो. हे आसन रक्तप्रवाह वाढवते आणि हार्मोनल संतुलन सुधारण्यास मदत करते.

४) सुप्त मत्स्येंद्रासन – कंबरदुखी आणि ताण कमी करणारे आसन

पीरियड्समध्ये कंबरदुखी ही मोठी समस्या असते. सुप्त मत्स्येंद्रासन हे आसन पाठीच्या कण्याला लवचिकता देते आणि स्नायूंवरील ताण कमी करते. पाठीवर झोपून, एक पाय वाकवून दुसऱ्या बाजूला वळवावा आणि हातांनी संतुलन ठेवावे. या आसनामुळे पोटातील गॅस, सूज आणि वेदना कमी होतात. तसेच शरीराला सैलपणा आणि हलकेपणा जाणवतो. (Period Cramps)

=============

हे देखील वाचा : 

Sleep : झोपेत उंचावरून पडत असल्याचा आभास का होतो?

Belly Fat : पोटाची चरबी कमी करण्यासाठी करा ‘हे’ रामबाण उपाय

Health : योगाभ्यासाची सुरुवात ‘या’ योगासनांनी करा

================

५) शवासन – पूर्ण विश्रांतीसाठी सर्वोत्तम

पीरियड्समध्ये शरीराला जास्त विश्रांतीची गरज असते आणि शवासन हे त्यासाठी सर्वोत्तम आसन आहे. पाठीवर सरळ झोपून डोळे बंद करावेत आणि श्वासावर लक्ष केंद्रित करावे. ५–१० मिनिटांचा शवासन सराव शरीर आणि मन दोन्हीला खोल विश्रांती देतो. यामुळे थकवा कमी होतो, तणाव दूर होतो आणि वेदनांवर नियंत्रण मिळते.

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.