Home » येवले अमृततुल्यच्या यशाची कहाणी

येवले अमृततुल्यच्या यशाची कहाणी

by Team Gajawaja
0 comment
Yewale tea success story
Share

तुम्ही कधी विचार केलायं का, एखादा व्यक्ती आयुष्यभर चहा विक्री करुन करोडपति होईल? पण हे खरं आहे. नवनाथ येवले यांनी चहाची विक्री करत आपली मेहनत आणि युनिक आयडियाच्या जोरावर करोडोंची कंपनी उभारलीय. नवनाथ येवले सध्या येवले अमृततुल्य प्राइव्हेट लिमिटेडचे सीईओ आहेत. तर त्यांची यशाची कथा आपण पाहूयात. (Yewale tea success story)

नवनाथ येवले हे आधी वडिलांचा बिझनेस सांभाळ्यापूर्वी एक नोकरी करायचे. त्यांना आपल्या वडिलांकडून फार प्रोत्साहन मिळत होते. दशरथ येवले असे त्यांच्या वडिलांचे नाव, त्यांनी १८ वर्षांपूर्वी पुण्यात येऊन दूध विक्री सुरु केली होती. काही काळानंतर त्यांनी शहरातील एका कॅम्प डिस्ट्रकमध्ये भाड्याने दुकान खरेदी केले. याच दुकानात त्यांनी चहा विक्री सुरु केली. जेव्हा चहाची विक्री करुन अधिक पैसे येऊ लागले तेव्हा त्यांनी त्या सोबत स्नॅक्स ही विक्री करण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे त्यांनी आपला व्यवसाय वाढवण्यास सुरुवात केली होती. दशरथ येवले यांनी त्याच्या काही काळानंतर पुण्यातीलच ढंकावडिजवळ आणखी एक चहाचे दुकान सुरु केले. त्यांच्या दुकानासह त्यांच्या चहाची लोकप्रियता वाढू लागली. २००१ मध्ये दशरथ येवले यांचे निधन झाले.

वडिलांच्या निधनानंतर नवनाथ येवले यांना कळले होते की, पुणेच नव्हे तर देशात सुद्धा चहाप्रेमींची संख्या फार मोठी आहे. त्यांनी चहाचे दुकान सुरु करण्यासाठी ४ वर्ष सखोल रिसर्च केला. त्यांना त्यावेळी ही असे कळले की, पुण्यात मोठ्या गोष्टींची दुकानं ही मॉल आणि शो रुममध्ये आहेत. पण चहाचे नाही. या व्यतिरिक्त त्यांनी चहाची गुणवत्ता वाढवण्यावर ही फार जोर दिला.

दीर्घकाळ रिसर्च केल्यानंतर येवले यांनी आपल्या चार भावंडांसोबत मिळून २०११ मध्ये येवले टी हाउसची सुरुवात केली.यासाठी त्यांनी आपल्याकडील सर्व सेविंग्स यासाठी दिली. आज येवले टी हाउस ऐवढे प्रसिद्ध आहे की,पुणे शहरातच त्यांचे तीन ब्रांन्च आहेत. सध्याच्या काळात येवले हाउस महिन्याला १० ते १२ लाख रुपये कमावत आहे. जे वर्षिक उत्पन्न म्हणायचे झाल्यास तर दीड कोटी रुपये आहे. (Yewale tea success story)

हेही वाचा- आईचे दागिने गहाण ठेवून सुरु केला होता अगरबत्तीचा बिझनेस, आज 7000 कोटींची कंपनी

नवनाथ येवले यांचा फोकस येवले टी हाउसला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा आहे. देश-विदेशातील टॉप शहरांमध्ये त्यांना १००० पेक्षा अधिक ब्रांन्च सुरु करायचे आहेत. यासाठीच ते हजारो लोकांना रोजगार ही उपलब्ध करुन देत आहेत. येवले यांनी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी ऐकेकाळी नोकरी सोडली होती. पण आज ते एक यशस्वी व्यावसायिक आहेत. काही तरुणांसाठी ते प्रेरणास्थान आहेत, ज्यांना आय़ुष्यात काहीतरी हटके करायचे आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.