Home » येऊरच्या जंगलातला कचरा आणि प्लास्टिक विकून तृतीयपंथाला मदत करणारा… कपिल

येऊरच्या जंगलातला कचरा आणि प्लास्टिक विकून तृतीयपंथाला मदत करणारा… कपिल

by Correspondent
0 comment
K Facts
Share

आपण आजपर्यंत अनेकदा मदत करणाऱ्या हातांबद्दल वाचलं असेल, ऐकलं असेल मात्र निसर्गाप्रती कृतज्ञता बाळगून त्याला जपत केलेली मदत कधी ऐकली आहे का? स्वतः बेरोजगार असूनही एका कृतीत आपले दोन हेतू साध्य करणारा हा येऊरमधला तरुण….

ठाणे शहरालगत असलेले येऊरचे जंगल (Yeoor Hills) हे जैवविविधतेने नटलेले आहे. पण माणसांच्या हलगर्जीपणामुळे दिवसेंदिवस या पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. कोविड काळात प्रत्येकाला पर्यावरणाचे महत्त्व पटले आहे. तरुण मंडळी पर्यावरण रक्षणासाठी पुढे सरसावताना दिसत आहेत. कपिल मांढरे हा तरुण गेली एक वर्षे येऊरचे जंगल साफ करण्यासाठी आठवड्यातून किमान तीन वेळा तर कधी दररोज मुंबईहून ठाण्यात येत आहे. येऊरच्या जंगलात बेजबाबदार नागरिकांनी फेकलेल्या काचेच्या, प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या हे सगळे वेचून ते संकलित करतोय.

कपिलला लॉकडाऊनमुळे नोकरी गमवावी लागली. त्यामुळे गरजूंना मदत करण्यासाठी त्याच्याकडे पैसे नसल्याने तो हा कचरा विकून येणाऱ्या पैशातून मदत करतो आहे. या पैशातून त्याने दिव्या या तृतीयपंथीसह टिटवाळा कोनेगाव येथील आदिवासी भागातदेखील मदत केली आहे. त्याला या कामासाठी ‘जाणता राजा सामाजिक संस्था’ आणि ‘रोट्रॅक्ट क्लब ऑफ ठाणे प्रीमियम’ अशा  दोन सामाजिक संस्थांनी देखील मदत केली आहे.

या संदर्भात व्यक्त होताना कपिलने सांगितले,

“कोरोनाकाळात माझी नोकरी गेली. नोकरी असताना सढळ हाताने मदत करत होतो. पण आता ती नसताना समोर आलेल्या रिकाम्या हातात काय द्यायचे? मी नेहमी बघतो स्टेशन आणि रस्त्यावर कचरा वेचक कचरा विकून पैसे कमावतात आणि जगतात. तिथून मला ही युक्ती सुचली. जंगलातील प्लास्टिक कचरा बॉटल गोळा करून त्या एका भंगार वाल्याला विकल्या. त्यातून मिळणाऱ्या पैशाने गरजू लोकांना थोडी का होईना मदत करीत आहे.”

आपण सगळेच आम्ही निसर्गावर प्रेम करतोय असं म्हणतोय… पण ते प्रेम व्यक्त करण्याची कला कपिलकडून शिकण्यासारखी आहे. दान बरेचजण करतात, पण स्वतःकडे काहीच संपत्ती नसताना त्यातून मार्ग काढून दान करणारा कधी रीता होत नसतो….

शब्दांकन – शामल भंडारे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.