Home » पिवळी हळद चक्क निळ्या रंगात

पिवळी हळद चक्क निळ्या रंगात

by Team Gajawaja
0 comment
Blue Turmeric
Share

हळद हा भारतीय स्वयंपाकघरातला प्रमुख घटक आहे. प्रत्येक भारतीय पदार्थात हळदीचा वापर करण्यात येतो. हळद ही बहुगुणी आहे.  अगदी रंग उजळण्यापासून ते कफ खोकल्यासारख्या आजारावर हळदीच्या वापरानं मात करता येते. अलिकडे हळदीवर अधिक संशोधन झाले आहे,  त्यात हळद ही कर्करोगासारख्या असाध्य रोगावरही फायदेशीर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.  हळदीचा पिवळा रंग जेवढा गडद तेवढी हळद चांगली असल्याचे मानण्यात येते. त्यामुळेच पी हळद आणि हो गोरी अशी म्हणही आपल्या बोलीभाषेत वापरण्यात येते.  मात्र आता ही म्हण बदलण्याची वेळ आली आहे. कारण आता पिवळी हळद चक्क निळ्या रंगात यायला लागली आहे. त्यामुळे पी हळद आणि हो निळी असं म्हणण्याची वेळ येणार आहे. ही निळ्या रंगाची हळद पिवळ्या हळदीपेक्षा अधिक गुणकारी असल्याचे स्पष्ट झाले आहे.  त्यासोबत त्याची शेतीही अधिक फायदेशीर असल्याचेही स्पष्ट झाले आहे. निळ्या हळदीतील गुण पाहता त्याची मागणी जास्त आहे. त्यामुळेच त्याची किंमतही जास्त आहे.  त्यामुळे या निळ्या हळदीची लागवड करणा-या शेतक-यांना भरघोस फायदा मिळत आहे.(Blue Turmeric)   

भारतात हळदीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. हळदीची शेती, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, ओरिसा, गुजरात, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, मेघालय या राज्यात मोठ्या प्रमाणात होते. 30 ते 35 अंश सेल्सिअस एवढे तपमान हळदीसाठी उत्कृष्ठ समजले जाते.  असे असले तरी हळद लागवडीसाठी कोणत्याही प्रकारची माती उपयुक्त समजली जाते. भारतात हळदीच्या 30  हून अधिक प्रजाती आहेत.  त्यामध्ये लकाडोंग हळद, अलेप्पी हळद, मद्रास हळद, इरोड हळद, सांगली हळद, बोंड हळद, कस्तुरी, पितांबरा, रोमा, सूरमा, सोनाली अशा हळदीच्या जाती प्रमुख आहे.  या सर्व प्रकारच्या जातींची हळद वेगवेगळ्या वापरासाठी वापरली जाते.  काही प्रकारची हळद ही फक्त मसाल्यामध्ये वापरली जाते.  तर काही हळद ही दुधासोबत घेतली तर आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते.  मात्र या सर्व हळदींचा रंग एकच आहे,  आणि तो रंगच त्या हळदीची ओळख आहे.  हा रंग आहे पिवळा. मुळात हळद अन्य कुठल्या रंगात येऊ शकेल याची कल्पनाच कोणी करु शकत नाही.  त्या सर्वांसाठीच निळ्या रंगाच्या हळदीचे फायदे आश्चर्यचकीत करतील असेच आहे. (Blue Turmeric) 

अलिकडे निळ्या रंगाची (Blue Turmeric) बाजारात उपलब्ध झाली आहे.  ही निळ्या रंगाची हळद जेवढी गुणकारी आहे, तशीच तिची लागवड थोडी अवघड आहे. निळ्या हळदीची लागवड (Blue Turmeric) पिवळ्या हळदीपेक्षा थोडी काळजीपूर्वक करावी लागते. पिवळी हळद कुठल्याही प्रकारच्या मातीमध्ये लावता येते. मात्र निळ्या रंगाची हळद लावण्यासाठी  भुसभुशीत चिकणमातीची गरज असते. असे असले तरी या निळ्या हळदीची लागवड करून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे.  त्यामुळेच निळ्या रंगाच्या लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. निळी हळद ही पिवळ्या हळदीपेक्षा जास्त गुणकारी असून बाजारात तिची किंमतही जास्त आहे.  मुख्य म्हणजे, हे लक्षात घेतले पाहिजे की, निळी हळद खाण्यासाठी नाही तर औषधांसाठी वापरली जाते. आयुर्वेदिक औषधात या निळ्या हळदीचा वापर करण्यात येत आहे. (Blue Turmeric) 

=======

हे देखील वाचा : गीता प्रेसचे सुवर्ण वर्ष

=======

निळ्या हळदीची लागवड करण्यासाठी भुसभुशीत चिकणमाती माती लागते. या हळदीची लागवड करताना त्याच्या शेतात पाणी साचणार नाही याची सर्वाधिक काळजी घ्यावी लागते. या हळदीचे पिक नाजूक असते. जर शेतात पाणी साचले आणि पाण्याचे प्रमाण साजले तर  या पाण्यामुळे हळदीची रोपं कुजतात. पण एकदा हे निळ्या हळदीचे पीक तयार झाल्यावर त्यापासून नेहमीच्या पिवळ्या हलधीपेक्षा चारपट किंमत मिळत आहे. कारण या हळदीचे पीक पिवळ्या हळदीच्या तुलनेत कमी जमिनीत जास्त उत्पादन देते.  निळी हळद 500 ते 3000 रुपये किलोपर्यंत विकली जाते.  एका एकरात निळ्या हळदीचे (Blue Turmeric) उत्पादन सुमारे 12 ते 15 क्विंटल पर्यंत घेण्यात येत आहे. या निळ्या हळदीचा रंग सुकल्यावर काही वेळा काळाही होतो.  त्यामुळे या निळ्याहळदीला काळी हळदही म्हणण्यात येतं. मात्र ही हळद बारीक केल्यावर तिचा रंग निळा येतो.  या हळदीचे अनेक फायदे आहेत. निळी हळद दातदुखीवर वापरली जाते. दातदुखीच्या औषधांमध्ये या हळदीचा वापर होतो.  निळ्या हळदीचा वापर फुफ्फुसांशी संबंधित रोगांवर फायदेशीर ठरतो.  तसेच या निळ्या हळदीमुळे अंगावर पुरळ उठणे, ओटीपोटात दुखणे, ऑस्टियोआर्थराइटिसची समस्या कमी होते. या हळदीमध्ये असलेले कर्क्यूमिन कर्करोगाच्या पेशींची वाढ थांबवण्यास मदत करते.  महत्त्वाचे म्हणजे, निळ्या रंगाची हळद शरीरातील चरबी कमी करते.  त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.  यामुळे मधुमेहासारख्या रोगावरही आराम पडतो.  ही निळी हळद बाजारात आता उपलब्ध होत असून त्याचा वापर औषधांसाठी होत आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.