भारताला यंदाच्या वर्षात (2023) नव्या संधी उपलब्ध झाल्या. यामध्ये भारतातील उद्योग व्यवसाय आणि व्यावसायिकांचा फार मोठा वाटा होता. पण हेच ते वर्ष आहे यादरम्यान काही व्यावसायिकांना मोठे आर्थिक नुकसानही सहन करावे लागले आहे. यामुळे या व्यावसायिकांच्या संपत्तीही घट झाली. अशाच व्यावसायिकांबद्दल जाणून घेऊया सविस्तर… (Year Ender 2023)
संपत्तीत घट झालेल्याअरबपतींमधील सर्वाधिक टॉपचे नाव गौतम अदानी यांचे आहे. अन्य व्यावसायिकांना देखील यंदाच्या वर्षात आर्थिक नुकसानीचा फटका बसला आहे. त्यांच्या संपत्तीत फार मोठी घट झाल्याचे दिसून आले.
संपत्तीत घट झालेले अरबपती
भारतात सध्या 169 व्यावसायिक आहेत. यामध्ये एशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानींचे नाव आहे. तर एकेकाळी जगातील तिसऱ्या क्रमांकावर असणारे सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानीही होते. पण संपत्तीत घट झालेल्या व्यावसायिकांपैकी ते एक आहेत.
गौतम अदानी
गौतम अदानी यांनी जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत तिसरे स्थान मिळवले होते. पण 2023 च्या सुरुवातीला जारी करण्यात आलेल्या हिंडनबर्ग रिपोर्टमुळे अदानी यांना फार मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. त्यांचे नेटवर्थ झपाट्याने कमी झाले. यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत त्यांच्या संपत्तीत 35.4 अब्ज कोटींची घट झाली आहे. ही घट जगातील एखाद्या व्यावसायिकाच्या नेटवर्थमधील सर्वाधिक घट आहे. मात्र भारतातील ते सर्वाधिक दुसरे श्रीमंत व्यक्ती आहेत. (Year Ender 2023)
अजीम प्रेमजी
जगातील सर्वाधिक मोठ्या देणगीदारांपैकी एक असलेले अजीम प्रेमची भारतातील सर्वाधिक मोठी इंर्फोमेशन टेक्नॉलॉजी कंपनी विप्रोचे फाउंडर आहेत. यांच्या संपत्तीत यंदाच्या वर्षात 1.48 कोटी डॉलरची घट झाली. त्यांचे नेटवर्थ 24 अब्ज डॉलर आहे. खरंतर ते भारतातील असे दुसरे व्यावसायिक आहेत ज्यांच्या संपत्ती फार मोठी घट झाली आहे. (Year Ender 2023)
दरम्यान, संपत्तीचे हे आकलन ब्लूमबर्गच्या बिलेनियर इंडेक्सनुसार करण्यात आलेले आहे. ही आकडेवारी 10 डिसेंबर संध्याकाळी 7 वाजताच्या हिशोबाने आहे. शेअर मार्केटमध्ये काही चढउतार झाल्यास ही आकडेवारी बदलली जाऊ शकते.
आणखी वाचा: भारताला धमकी देणारा पन्नू आहे तरी कोण ?