महाराष्ट्रात सध्या अनेक हत्या आणि बलात्काराच्या गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आंतरजातीय विवाहावरून झालेली हत्या असो किंवा शिळफाट्याच्या मंदिरात अक्षता म्हात्रे यांच्यावर झालेला बलात्कार आणि हत्या असो, या सर्व घटनांनी महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे, आणि त्यातच आता एक अत्यंत गंभीर घटना समोर आली आहे. उरणमध्ये २२ वर्षीय तरुणी यशश्री शिंदे हिची अतिशय निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली आहे. तिच्या शरीराचे तुकडे करून ते रस्त्यावर फेकून देण्यात आले आहेत. (Yashshree Murder case)
यशश्री शिंदे, वय २२, बेलापूरच्या कॉल सेंटर मध्ये काम करीत होती. गुरूवारी दुपारी दीडच्या सुमारास मैत्रिणीच्या घरी जाण्यासाठी यशश्री पनवेल स्टेशनकडे गेली. सायंकाळी साधारण साडेचारनंतर तिचा फोन बंद झाला. पण फोन बंद होण्याआधी, तीन साडे तीनच्या सुमारास यशश्रीने आपल्या एका मैत्रिणीला कॉल केला. “मी संकटात आहे, मला मदतची गरज” असं ती कॉलवर म्हणाली आणि त्यानंतर यशश्री बेपत्ता झाली,रात्री उशिरापर्यंत ती घरी न परतल्याने तिच्या वडिलांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला.
दोन दिवसांनी उरण तालुक्यातील कोटनाका पेट्रोल पंपाजवळ निर्जन रस्त्यावर झाडाझुडपांमध्ये एक मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडला. मोकाट कुत्रे हा मृतदेह खात होते. मृतदेहाच्या पाठीवर चाकूने केलेले वार होते, मृतदेहाचे अवयव सुद्धा कापले होते. आणि सर्वात गंभीर म्हणजे तिच्या चेहऱ्याचा चेंदा मेंदा करून गुप्तांगावर सुद्धा चाकूने वार करण्यात आले होते. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी यशश्रीच्या आई वडिलांना बोलावून घेतलं. मृत देहाची अवस्था बिकट होती त्यावरुन ओळख पटणं कठीण होतं. फाटलेले कपडे आणि शरीरावर असलेल्या एका टॅटूने तिची ओळख पटली. मृतदेह पाहून यशश्री चे वडील म्हणाले हे त्यांनीच केलंय दाऊद शेखने. (Yashshree Murder case)
२०१९ मध्ये यशश्री १४-१५ वर्षांची असताना तिने आणि तिच्या कुटुंबीयांनी दाऊद शेख विरोधात Protection of Children from Sexual Offences (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. नंतर, दाऊद शेखला जामीन मिळाला. यशश्रीच्या वडिलांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी यशश्रीचे कॉल रेकॉर्डस तपासले आणि त्यातून धक्कादायक गोष्टी समोर आल्या. कॉल डेटा रेकॉर्ड्सवरून असे दिसून आलं की, यशश्री एका विशिष्ट नंबरवर बराच काळ बोलत होती. या नंबरवरून कॉल येत आणि जात असत. या नंबरचे डिटेल्स तपासल्यावर समजले की हा नंबर दाऊद शेखचा होता. ज्या दाऊदला यशश्री आणि तिच्या कुटुंबीयांनी तुरुंगात पाठवलं होतं, त्याच्याशी यशश्री तासन्तास का बोलत होती?
===================
हे देखील वाचा : आयएएस अधिका-याची पत्नी गावगुंडाच्या प्रेमात !
====================
पोलिसांचा असा अंदाज आहे की, दाऊदने यशश्रीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचे होते आणि त्यासाठी तो गेल्या पाच वर्षांपासून याचं प्लानिंग करत होता. तुरुंगातून सुटल्यावर त्याने पुन्हा यशश्रीशी बोलायला सुरुवात केली, तिच्याशी मैत्री केली आणि प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. यशश्रीची हत्या दाऊदनेच केल्याचा तिच्या कुटुंबीयांचा आरोप होता.पोलिसांनी दाऊद शेखचा तपास घेतला आणि त्याला महाराष्ट्र-कर्नाटक बॉर्डरवरून अटक केली आहे. (Yashshree Murder case)
या घटनेनंतर यशश्रीचे नातेवाईक आणि जनतेमध्ये तीव्र आक्रोश व्यक्त करण्यात आला. उरण बाजारपेठ बंद करण्यात आली आणि संध्याकाळी उशीरा यशश्रीच्या मृतदेहाचे अंत्यसंस्कार करण्यात आले. उरणमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून निषेध मोर्चे आयोजित करण्यात आले. यशश्री शिंदे हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर, संतप्त नागरिकांनी राक्षसी कृत्य करणाऱ्याला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.त्यामुळे आता या आरोपीला फाशीची शिक्षा होईल का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. (Yashshree Murder case)