इस्रायल गाझा पट्टीत करत असलेल्या हल्ल्यामुळे तेथील जनतेचे किती हाल होत आहेत, याच्या बातम्या सध्या दाखवण्यात येत आहेत. पण याच गाझामधील एका बातमीनं हमासचा दुहेरी चेहरा जगासमोर आणला आहे. हमासचे नेते आणि त्यांचे कुटुंब गाझामधील नागरिकांची उपासमार होत असली तरी सुखासीन आयुष्य जगत आहेत. याचेच एक उदाहरण म्हणजे, इस्रायली हल्ल्यात मारले गेलेले हमास नेते याह्या सिनवार यांची माजी पत्नी समर अबू जमेर. समर अबू जमेर ही वर्षाभरापूर्वी तिच्या अलिशान रहाणीनं चर्चेत आली होती. या समरला अत्यंत महागड्या ब्रॅण्डेड वस्तू वापरलायला आवडतात. (Samar Abu Jamer)
तिचा एक फोटो समोर आला त्यात तिच्याजवळ 27 लाखांची बॅग होती. यावरु हमासचे नेते आणि त्यांचे कुटुंब अलिशान जीवन कसे जगातात हे स्पष्ट झाले. आता हिच समर पुन्हा चर्चे आली आहे. कारण हमासचा नेता असलेल्या याह्या सिनवारच्या या पत्नीनं आपल्या पतीच्या मृत्युला अवघे नऊ महिने झाले असतांना दुसरे लग्नही केले आहे. यासाठी ही समर गुप्त मार्गानं तुर्कीयेला पळून गेली तेथील एका अलिशान हॉटेलमध्ये तिनं दुसरं लग्न केलं आहे. गाझामध्ये इस्रायली हल्ल्यानं बेजार झालेल्या लहान मुलांचे फोटो सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मात्र या सर्वाला जबाबदार असलेले हमासचे नेते आणि त्यांचे कुटुंबिय मात्र अजूनही ऐशोआरामात रहात आहेत. याचेच एक उदाहरण म्हणून हमासचा नेता याह्या सिनवार याच्या पत्नीच्या दुस-या लग्नाचा उल्लेख करण्यात येतो. (International News)
याह्या सिनवार याचा मृत्यू झाल्यावर अवघ्या नऊ महिन्यांनी त्याची पत्नी समर अबू जमेर हिने दुसरे लग्न केले आहे. आता समर तुर्कीयेमध्ये स्थायिक झाली आहे. समर अबू जमेर ही याह्या सिनवारपेक्षा सुमारे 18 वर्षांनी लहान होती. लग्नाच्या वेळी याह्या सिनवार 49 वर्षांचे होते. समर एका श्रीमंत आणि धार्मिक पॅलेस्टिनी कुटुंबातील आहे. समरच्या कुटुंबातील अनेक सदस्य हमासच्या सशस्त्र गटांशी संबंधित आहेत. हमास संघटनेमध्ये अनेक उच्चपदावर समर अबू जमेरचे कुटुंबिय आहेत. शिवाय हमासला आर्थिक पाठबळ देण्यामध्येही तिचे कुटुंब पुढे असते. या सर्वांमुळेच समर अबू जमेरची रहाणी ही अलिशान राहिली आहे. (Samar Abu Jamer)
समरने गाझा इस्लामिक विद्यापीठातून धार्मिक अभ्यासात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. याह्या सिनवारबरोबर लग्न होण्यापूर्वी समर त्याच विद्यापीठात शिकवत असे. समरने 2011 मध्ये याह्या सिनवारशी लग्न केले. त्यावेळी सिनवारची इस्रायली तुरुंगातून, इस्रायली सैनिक गिलाद शालितच्या बदल्यात सुटका करण्यात आली होती. याह्या सिनवर आणि समर अबू जमेर यांना तीन मुले आहेत. इस्रायलनं याह्या सिनवारला मारल्यावर समर अबू जमेर हमासची सुत्रे हाती घेईल अशीही बातमी होती. मात्र याह्या सिनवारच्या मृत्यूनंतर, समरने काही काळ गाझामध्ये गुप्तपणे राहण्याचा प्रयत्न केला. (International News)
जानेवारी 2025 मध्ये इस्रायली लष्कराने मुलांसह बोगद्यात असणा-या समरचे छायाचित्र प्रसिद्ध केले होते. समरच्या दुर्मिळ छायाचित्रांपैकी हे एक छायाचित्र ठरले. त्यात तिच्याकडे महागडी हर्मेस बर्किन बॅग दिसली. या बॅगची किंमतच 27 लाखाच्या पुढे आहे. यावरुन समरवर मोठी टिका करण्यात आली. याह्या सिनवारच्या मृत्यनंतर या समरनं बनावट पासपोर्टच्या आधारे गाझापट्टी सोडल्याचे सांगण्यात येते. त्यासाठी तिला हमासचे वरिष्ठ नेते फाथी हम्मद यांनी मदत केली. समर तिच्या तीन मुलांसह इजिप्तमार्गे तुर्कीयेला गेली. तिथे गेल्यावर काही दिवसातच तिनं दुसरा विवाहही केला. याची सर्व व्यवस्था फाथी हम्मद यांनी केली. ही बातमी गाझामध्ये आल्यावर हमासवर मोठी टीका झाली. गाझामध्ये नागरिकांची उपासमार होत असतांना हमासच्या नेत्यांची कुटुंब सुरक्षित असून त्यांच्या विलासी जीवनात कुठलाही फरक झाला नसल्याचे बोलले जात आहे. (Samar Abu Jamer)
===================
हे देखील वाचा : Donald Trump : ट्रम्प लवकरच बराक ओबामांना अटक करणार?
===================
समर अबू जमेर हिच्यासह हमासचा नेता मोहम्मद सिनवार याची पत्नी नजवा सिनवार देखील मुलांसह तुर्कीयेमध्ये गेली आहे. तिथे या दोन्ही महिलांसाठी स्वतंत्र राहण्याची व्यवस्था असल्याचीही माहिती आहे. याह्या सिनवार हा ऑक्टोबर 2023 मध्ये इस्रायलवर झालेल्या हमास हल्ल्याचा मास्टरमाइंड होता. ऑक्टोबर 2024 मध्ये इस्रायली सैन्याने त्याला ठार मारले. यासर्वात इस्रायलनं केलेल्या हल्ल्यामुळे सामान्य पॅलेस्टिनी नागरिंकाचे जीवन हे वेदनामयी झाले असले तरी हमासच्या नेत्यांचे कुटुंबिय परदेशात अलिशान हॉटेलमध्ये रहात असल्याचे इस्रायलनं अनेकवेळा दाखवून दिले आहे. त्यातच आता समर अबू जमेरच्या दुस-या लग्नाची बातमी आल्यामुळे हमासबाबत त्यांच्याच पाठिराख्यांमध्ये नाराजी वाढत आहे. (International News)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics