”प्रेमात ना रंग बघितला जातो ना रूप, ना जात बघितली जाते ना गोत्र” हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी ऐकल आहे. बरोबर ना? कारण प्रेमात महत्वाच असत ते आंतरिक सौंदर्य आहे.पण तसच प्रेमात ऊंची ही पहिली जात नाही आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे मध्येच उंचीच काय सुरु केल. तर त्या मागे कारण ही तसच आहे.जगातील सर्वात उंचीने लहान बॉडीबिल्डर म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवणारा प्रतीक मोहिते विवाहबंधनात अडकला आहे. आणि प्रेमात ऊंची गौण आहे हे त्याने सिद्ध करून दाखवल आहे. प्रतिक च्या हळदीपासून लग्नापर्यंतचे फोटो आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होऊ लागले आहेत.(World Shortest Bodybuilder).
प्रतिक मोहितेचा हा प्रेम विवाह असल्याचे समजत आहे. आणि त्याची बायको पुण्याची आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रतीकने सांगितले की, तो रायगडचा रहिवासी आहे आणि त्याची पत्नी १२० किमी दूर पुण्याची आहे. त्यांची ऊंची ३ फूट ३ इंच आहे तर त्याची पत्नी जया हिची उंची 4 फूट 2 इंच आहे. प्रतीकने सांगितले की, 4 वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांनी जयाची ओळख करून दिली होती आणि त्या दरम्यान त्याला जया आवडली होती. तसेच २०१८ साली त्याची आणि जया ची ओळख झाली आणि २०१६ पासून प्रतिक ने बॉडीबिल्डिंगची सुरुवात केली होती. तो त्या वेळेस जास्त पैसे कमवत नव्हता म्हणून त्याने जयाला सांगितले की थोडा वेळ जाऊ दे मला माझ्या पायावर उभे राहायचे आहे ते झाल्यावरच आपण लग्न करू. आणि नंतर हळूहळू प्रतिक घेत असलेल्या म्हणतीचे फळ त्याला मिळत गेले आणि त्याचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्डमध्ये सामील झाले तसेच तो जिम ट्रेनर ही झाला. (World Shortest Bodybuilder)
====================
(हे देखील वाचा: बकरी एवढी गाय तुम्ही पाहिलंय का?)
====================
प्रतिक ला त्याच्या हनिमूनला जाण्याच्या प्लॅनबद्दल विचारले गेले त्यावर तो म्हणाला की, आता बराच खर्च झाला आहे. मी स्वत:च्या कमाईतून लग्न केलं आहे आणि हे माझं स्वप्न होतं. आता मी बचत करेन आणि मग हनिमूनला जाईन. सध्या तरी आम्ही आमच्या कुलदेवतेचे दर्शन घ्यायला जाऊ. आणि त्यानंतर आजूबाजूला अनेक पर्यटनस्थळे आहेत तिथे जाऊ.वयाच्या 28 व्या वर्षी प्रतीक मोहितेने जगातील सर्वात लहान शरीरसौष्ठवपटू म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले आहे. सध्या त्याच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर पहायला मिळत आहेत. त्याच्या या फोटो आणि व्हिडिओवर त्याच्या मित्रपरिवाराकडून, नेटकऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.