जगभरातील अनेक देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे. रशिया-युक्रेन युद्ध कधी संपेल याची खात्री कोणीही देऊ शकत नाही. एकडे दक्षिण आणि उत्तर कोरियामध्येही तणावाची परिस्थिती आहे. इस्रायलनं पुन्हा गाझावर हल्ला चालू केले आहेत. या सर्व परिस्थितीवर नजर टाकली तर जग हे तिस-या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असल्याचे दिसते. अशात हे तिसरे महायुद्ध अणुयुद्ध असेल अशी भीती व्यक्त होत आहे. अणुयुद्ध झालेच तर जगातील अनेक संपन्न शहरे तात्काळ नाश पावतील. जंगलांना विनाशकारी आग लागेल, शिवाय रेडिएशनचे घातक परिणाम जे वाचले आहेत, त्या सजिवांच्या शरीरावर होतील. धूळ आणि राख वातावरणात आल्यामुळे तापमानात तीव्र घट होईल. यामुळे पुढचे कितीतरी वर्ष पृथ्वीवरील मनुष्याचे जीवन हे नरकासारखे होणार आहे. (World War III)
या सर्वांपासून वाचायचे असेल तर काय करायचे, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र जगातील जे मान्यवर अब्जाधीश आहेत, त्यांनी या प्रश्नाचे उत्तरही शोधले आहे, आणि त्यानुसार त्यांनी उपायही सुरु केले आहेत. एलोन मस्क, मार्क झुकरबर्ग यांच्यासारख्या अनेक अब्जाधीशांनाही भविष्यात कधीतरी अणुयुद्ध होणार याची खात्री आहे. हे अणुयुद्ध झालेच तर स्वतःला आणि कुटुंबाला वाचवण्यासाठी या अब्जाधीशांनी अत्यंत आधुनिक आणि सुरक्षित असे बंकर बनवले आहेत. या बंकरमध्ये किमान वर्षभर जरी राहिलं तरीही कुठलिही कमतरता होणार नाही, एवढी त्यामध्ये सर्व सामुग्री असणार आहे. सोबतच जगातील कुठल्याही कोप-यात संपर्क साधू शकेल अशी तंत्रज्ञान प्रणालीही या बंकरमध्ये विकसीत करण्यात आल्याची माहिती आहे. (International News)
जगामधील सध्याचे अस्थिरतेचे वातावरण पाहता, तिस-या महायुद्धाची सुरुवात कधीही होईल, असे काही जाणकारांचे मत आहे. हे तिसरे महायुद्ध झाल्यास जगाचा विनाश निश्चित आहे, हे सांगितले जाते. कारण या युद्धात सर्रासपणे परमाणुबॉम्बचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे जगातील अनेक शहरे बेचिराख होणार आहेत. असे युद्ध झाल्यास त्यापासून कसे वाचायचे, हा प्रश्न आहे. मात्र जगभरातील अब्जाधीशांनी हा प्रश्न स्वतःपुरता सोडवला आहे. जगातील या मोजक्या अब्जाधीशांनी भविष्यात अणुयुद्ध झाले तर स्वतःसाठी अत्यंत सुरक्षित असे घर बांधून ठेवले आहे. या अब्जाधीशांमध्ये फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग, टेस्लाचे एलोन मस्क, ओपनएआयचे सौम ऑल्टमन आदींचा समावेश आहे. यांच्यासह अनेक हॉलिवूड स्टारनीही भविष्यातील सुरक्षित घराची निर्मिती केली आहे. या सर्वांनी अणुहल्ला झालाच तर भुमिगत असे बंकर बांधले आहे. (World War III)
हे बंकर भुमिगत असले तरी ते सर्व साधनींनी परिपूर्ण असे आहेत. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग हवाईमध्ये $300 दशलक्ष खर्चून एक प्रचंड बंकर कॉम्प्लेक्स बांधत आहेत. तर झुकरबर्ग यांनी कॅलिफोर्नियातील पालो अल्टो भागात 110 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त खर्च करून 11 घरे खरेदी केली आहेत. ही सर्व घरे एकत्रित करुन खाजगी कंपाऊंड तयार केले आहे. या घरांच्या खालीच अलिशान असे तळघर उभारण्यात येत आहे. या तळघरामध्ये खेळापासून ते मनोरंजनापर्यंतच्या सर्व सुविधा आहेत. शिवाय जगभरातील सर्व देशांबरोबर कधीही संपर्क साधता येईल, अशी संपर्क प्रणालीही आहे. झुकरबर्ग यांच्याप्रमाणे टेस्लाचे एलोन मस्क टेक्सासमध्ये एक प्रचंड कॉम्प्लेक्स बांधत आहेत. एलोन मस्क यांनी टेक्सासमधील ऑस्टिनच्या बाहेर $35 दशलक्ष खर्चून 4 चौरस किलोमीटरची एक मोठी इस्टेट बांधली आहे. या कॉम्प्लेक्समध्ये त्यांच्या 12 मुलांसाठी अनेक घरे आहेत. मस्क यांनी या सर्व घरांमध्ये हायड्रोपोनिक फार्म तयार केले आहेत. (International News)
=========
Apollo 13 : ३ लाख २२ हजार किमी लांब ते अंतराळात हरवले होते पण…
=========
जिथे मातीशिवाय भाज्या आणि धान्य पिकवू शकतात. वैद्यकीय सुविधा, फिटनेस सेंटर, स्विमिंग पूल, सिनेमा हॉल आणि आलिशान निवासस्थाने या बंकरमध्ये असल्याची माहिती आहे. अर्थात तिसरे महायुद्ध सुरु झाल्यावर मस्क यांनी या बंकरमध्ये न रहाता आपण मंगळग्रहावर जाणार असल्याचे सांगितले आहे. ओपनएआयचे प्रमुख सॅम ऑल्टमन यांचा गुप्त भूमिगत बंकर आहेच. तर अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनीही युद्ध सुरु झालेच तर स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी अलिशान भूमिगत बंकर बांधला आहे. जेफ बेझाझ यांचा हा बंकर एका अलिशान महालासारखा असल्याची माहिती आहे. एकूण तिसरे महायुद्ध सुरु झाले तर, हे सर्व अब्जाधिश या बंकरमध्ये बसून युद्धाचा तमाशा बघणार आहेत, आणि सर्वसामान्य आपला जीव वाचवण्यासाठी धडपडणार आहेत. (World War III)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics