जगभरात जेवढे देश आहेत त्यांचे प्रत्येकाचे राहणे-खाणंपिणं, परंपरा, जीवनशैली, पर्यावरण ही वेगवेगळे असते. त्याचसोबत तेथील नागरिक कशा पद्धतीने वागतात हे सुद्धा फार महत्वाचे असते. कारण आई-वडिलांचे जीन्स सुद्धा लोकांच्या व्यक्तीमत्वात काही बदल घडवून आणतात. तुम्ही नेहमी पाहिले असेल क, एखाद्या देशातील लोक कृष्णवर्णीय तर काहीजण गोरे असतात. हे सर्वकाही त्यांच्या आई-वडिलांच्या जीन्स, आसपासचा परिसर आणि खाण्यापिण्यामुळे असते. मात्र तुम्हाला माहिती आहे का जगातील सर्वात उंच व्यक्ती कोण आहे? अत्यंत कमी लोकांना त्या व्यक्तीबद्दल माहिती असेल. तर याचबद्दल अधिक जाणून घेऊयात.(World Tallest Person)
ज्या प्रकारची लोक विविध रिसर्च, काही गोष्टी केल्यांमुळे आपले नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये दाखल करतात. अशाच पद्धतीने जगातील सर्वात उंच व्यक्तीने सुद्धा आपले नाव गिनीज बुकमध्ये दाखल केले आहे. त्या व्यक्तीचे नाव सुल्तान कोसेन असे आहे. त्याची लांबी ८ फूट १३ इंच आहे. सोशल मीडियात सध्या सुल्तान कोसेन अगदी चर्चेत आहे. त्याने नुकताच आपला ४० वा वाढदिवस ही साजरा केला आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार, सुल्तान कोसेन याच्या हाताची लांबी ऐवढी आहे की, जगभरातील अशा प्रकरणांमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचा हात ७.५ सेमी आहे. तो ऐवढा प्रसिद्ध झाला आहे की, लोक त्याच्या सोबत सेल्फी काढण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. सुल्तान हा गेल्या १३ वर्षांपासून जगातील सर्वात लांब पुरुषाच्या रुपात ओळखला जातो. तर त्याच्या ऐवढ्या लांबीमागील काय आहे कारण ते सुद्धा पाहूयात.
अधिक उंची वाढण्यामागील काय आहे कारणं?
सुल्तान कोसेन याची उंची ऐवढी जास्त असण्यामागील कारण म्हणजे एक्रोमेगाली कंडीशन आहे. खरंतर या कंडीशनमध्ये कोणत्याही व्यक्तीचे हात, पाय, चेहऱ्यावरील पिट्युरी ग्लँड मधून हार्मोनचे अधिक प्रोडक्शन होते. यामुळे व्यक्तीचे हात-पाय आणि लांबी ही सामान्य व्यक्तीपेक्षा अधिक वाढली जाते. सोप्प्या भाषेत बोलायचे झाल्यास जेव्हा पिट्युटरी ग्लँन्ड अधिक प्रमाणात शरिरात ग्रोथ हार्मोन तयार करतात तर याच्या कारणामुळे हाडांचा आकार वाढते आणि हात-पाय आणखी वाढतात.
काय आहेत याची लक्षणं?
हेल्थ एक्सपर्ट्स असे सांगतात की एक्रोमेगाली लक्षण प्रत्येक व्यक्तीत वेगवेगळी असतात. मुख्यरुपात याची जी लक्षणं आहेत ती पुढीलप्रमाणे-
-वाढलेले हात-पाय
-जाड त्वचा
-अधिक घाम येणे
-डोके दुखी (World Tallest Person)
जर यावर उपचार केले नाहीत तर ती गंभीर आरोग्याची समस्या म्हणून निर्माण होऊ शकते. यामुळे होणारे आजार अशा प्रकारचे आहेत
-उच्च रक्तदाब
-हाय कोलेस्ट्रॉल
-हृदयासंबंधित समस्या
-टाइप २ मधुमेह
-थायरॉइडच्या ग्रंथीत वाढ
-कॅन्सर, ट्युमरचा धोका वाढतो
-पाठीच्या कण्याला दुखापत होण्याची शक्यता
-डोळ्यांना कमी दिसणे
हे देखील वाचा- सरगमनं जिंकला मिस इंडिया वर्ल्ड 2022 चा पुरस्कार…
कोसेन याच्या परिवारातील सर्वांची उंची सामान्य
सुल्तानच्या परिवारातील सर्व अन्य लोकांची लांबी ही एकदम सामान्य आहेत. केवळ तोच एकमात्र व्यक्ती आहे ज्याला या वैद्यकीय समस्येला सामोरे जावे लागत आहे. सुल्तान याचे वडिल अब्दुल रहील कोसेन यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, त्यांची ५ मुलं आहेत. फक्त सुल्तान यालाच हा आजार आहे.