Home » जेव्हा चीनने खुलेपणाने केली होती चिमण्यांची हत्या…

जेव्हा चीनने खुलेपणाने केली होती चिमण्यांची हत्या…

by Team Gajawaja
0 comment
World Sparrow Day
Share

गेल्या १०० वर्षांच्या इतिहासावर नजर टाकल्यास तर चीनच्या नेत्यांनी असे काही निर्णय घेतले जे देशाला काही दशक मागे घेऊन जातील. असाच एक निर्णय त्यांनी चिमण्यांबद्दल घेतला होता की, चीन मधील चिमण्या नष्ट करायच्या. चीनने हा निर्णय इतक्या वेगाने लागू केला की तेवढीच त्यांना भरपाई ही करावी लागली. पश्चिम देशांप्रमाणे प्रगती करणे, सामूहिक शेती करणे आणि उद्योग वाढवण्यासाठी चीनमध्ये वामपंथीचा पाया घालणाऱ्या माओत्से तुंग यांनी एका अभियानाची सुरुवात केली होती. (World Sparrow Day)

चीनमध्ये १९५८ ते १९६२ दरम्यानच्या काळाला नरकाचा काळ असे म्हटले जाते. याला ‘ग्रेट लीप फॉरवर्ड’ अशा नावाने ओळखले जाते. या दरम्यान, ऐतिहासिक दुष्काळ पडला. इतिहासकारांचे असे मानणे आहे की, या काळात जवळजवळ सव्वा तीन कोटी लोकांचा मृत्यू झाला. याचे मोठे कारण असे होते की, चिमण्यांची खुलेआम कत्तल करण्याचे अभियान. आज जागतिक चिमणी दिन साजरा केला जात आहे. जाणून घेऊयात चीन मधील चिमण्यांच्या विरोधात चालवण्या आलेल्या अभियानाबद्दल अधिक.

माओ देशाला पुढे नेण्यासाठी कोणत्याही स्तराला जाऊ शकत होते. त्यांना जनावरे ही देशाच्या प्रगतीमध्ये अडथळा आहेत असे वाटत होते. त्यामुळेच माओ यांनी चार प्रकारच्या जनावरांना त्यांच्या प्रगतीच्या मार्गातील अडथळा असल्याचे मानले. यामध्ये उंदीर, मच्छर, माश्या आणि चिमण्यांचा समावेश होते. माओ यांनी आधी उंदीर, मच्छर आणि माश्या यांचा खात्मा करण्यासाठी पुरेपुर प्रयत्न केला. त्यानंतर चिमण्या नष्ट करण्याची रणनिती आखली.

नेचर हिस्ट्रीवर पुस्तक लिहिणारे जिम टोड असे म्हणतात की, तेव्हा असा तर्क दिला गेला की चिमण्यांना या लिस्टमध्ये अशा कारणास्तव टाकले कारण त्या खुप धान्य खातात. माओ यांचे असे मानणे होते की, धान्याचा एक-एक कण केवळ व्यक्तींसाठीच असावा ना की चिमण्यांसाठी. परंतु चिमण्यांना मारण्यासाठी चीनला मोठी रक्कम ही खर्च करावी लागली. चिमण्यांना नष्ट करण्याच्या अभियानमुळे त्यांची हत्या केली खरी पण त्यांना दुसऱ्या देशांमधून ही चिमण्यांना आणावे लागले.

माओ यांचा निर्णय लागू झाल्यानंतर चीनमध्ये चिमण्यांना नष्ट करण्याचे काम सुरु झाले. त्यासाठी त्यांच्यावर गोळीबार करण्यास सुरुवात झाली होती. चिमण्यांची अंडी ही फोडली जात होती. ऐवढेच नव्हे तर चिमण्यांना नष्ट करण्यासाठी अन्य काही मार्ग वापरले जे सर्वांना हैराण करणारे होते.

वैज्ञानिकांनी असे म्हटले होते की, जेव्हा चिमण्यांना थकवा येतो तेव्हा त्या आपल्या घरट्यात येऊन बसतात. अन्नाच्या शोधात दिवसभर फिरणे थकवण्यासारखेच काम आहे. पर्यावरण संरक्षक असे म्हणतात की, लोक ऐवढा आवाज करायचे की, चिमण्या त्यांच्या घरापर्यंत यायच्याच नाही आणि उडता-उडताच त्या थकवून मरायच्या. याचा परिणाम चिमण्यांवरच नव्हे तर दुसऱ्या पक्षांना सुद्धा झाला.(World Sparrow Day)

याचा परिणाम असा झाला की, दोन वर्षाच्या आतच चीन मध्ये सर्वाधिक आढळणाऱ्या चिमण्या विलुप्त होण्याच्या मार्गावर पोहचल्या. चीनी पत्रकार डाई किंग यांनी या अभियानाचा उल्लेख करत असे म्हटले की, माओ यांना ना जनावरांबद्दल माहिती होती ना त्यांना एखाद्या तज्ञांचा सल्ला ऐकून घेण्यास तयार होते. त्यांनी केवळ चिमण्यांना नष्ट करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा परिणाम संपूर्ण देशावर पडला.

टोड असे म्हणतात की, ज्या धान्याच्या दाण्यांसाठी माओ यांनी चिमण्यांना नष्ट करण्याचा निर्णय घेतला तेच धान्य धोक्यात येऊ लागले होते. चिमण्यांची संख्या वेगाने कमी होत चालल्याने धान्यावर किटकांचा हल्ला होऊ लागला होता. लोकांना ही गोष्ट कळली की देशात किती चुकीचा निर्णय घेतला गेला आहे. माओ यांनी चार जीवांपैकी चिमण्यांना नष्ट केलं खरं त्या जागी ढेकणांचा समावेश केला. चिमण्यांची संख्या कमी झाल्याने किड्यांमुळे प्लेगच्या आजारात वाढ झाली. निर्णय चुकला गेला आणि भयानक दुष्काळ आल्याने लाखो लोकांचा मृत्यू झाला.

हे देखील वाचा- आता भारतात चित्यांपाठोपाठ पाणघोडे येणार…

रशियातून मागवाव्या लागल्या चिमण्या
चीनने पुन्हा नैसर्गिक संतुलन ठेवण्यासाठी रशियातून चिमण्या मागवल्या. या संपूर्ण अभियानादरम्यान केवळ चिमण्याच नव्हे तर त्यांच्या दुसऱ्या प्रजाति सुद्धा निशाण्यावर आल्या गेल्या. यालाच चीनमध्ये आलेल्या दुष्काळाचे मोठे कारण मानले गेले आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.